पान:निवडक अंतर्नाद.pdf/४६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिशिल्प शिकवताना आवश्यक त्या प्राथमिक व सूक्ष्मही बाबतीतले मार्गदर्शन, ते त्या त्या विद्यार्थ्यांच्या पातळीवर जाऊन करीत माती एकदम चिकट, बरीच कडक अथवा हाताला चिकटणारी उपयोगी नसते. त्यासाठी ती योग्य प्रकारे मळून विशिष्ट दर्जाची म्हणजे कशी असावी हे ते सांगायचे, दाखवायचे. प्लास्टरसाठी पाणी किती घालायचे, त्यात ह्यत कधी घालून चालेल, मोल्डच्या वेळी प्लास्टर वाया जाऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायची इत्यादी अनेक तांत्रिक बाबींचे ते मार्गदर्शन करीत. व्यक्तीची बाह्यरेषा महत्त्वाची असते व म्हणून ती जाणून आपल्या कामात आणली पाहिजे, शरीराकृती घडत असताना त्यात सतत तोल राखला गेला पाहिजे, असे ते विद्यार्थ्यांना सांगत, उत्तम शिक्षक म्हणून त्यांचे नाव होते. त्यांच्या तांत्रिक प्रभुत्वामुळे विनायक करमरकरांसारखा मातब्बर शिल्पकार आपले काम पाहण्यास मांजरेकरांना बोलावून नेत असे व त्यांचे मत विचारात घेत असे. अंगी गुणवत्ता असून त्यांचे नाव फारसे न होण्याचे कारण त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यात आहे; तसेच ते सभोवतालच्या कलाक्षेत्रातील बदलांशी निगडित आहे. ते जे. जे. स्कूलच्या म्हणजे सरकारी नोकरीत असल्याने त्या नियमांचे काटेकोर पालन झालेच पाहिजे, ही त्यांची स्वयंशिस्त नोकरी सुरू असताना शासनाची अन्य कलात्मक कामे दिली गेल्यास नियमाप्रमाणे त्याचा मोबदला नसतो. नोकरीच्या वेळेव्यतिरिक्तच्या वैयक्तिक कामांसंदर्भातही काही अडनिडे नियम असतात. ते कलावंतांच्या उन्नतीला बाधक ठरू शकतात. शासनातर्फे विविध ठिकाणी पुतळे उभारले जातात. त्यासाठी टेंडर मागविली जातात. ही पद्धती त्यांना अमान्य होती. त्यांनी कधीही ते केले नाही. शिवाय काम मिळण्यासाठी सरकारदरबारी शिफारस करणारे फोन वा अन्यही वहिवाटा असणाऱ्या आडवाटेने जाणाऱ्यापैकी ते नव्हते. त्यांच्याकडे कामे आली नाहीत म्हणून किंवा केलेल्या कामाचे पैसे वेळेवर न येणे किंवा मिळालेही नाहीत, काम दुसऱ्या साध्या शिल्पकाराकडे गेले, तरी या कशानेही ते कधीही विचलित झाले नाही. त्याबद्दलची खंतच नव्हती. त्यांना करावीशी वाटणारी कलानिर्मिती ते मनःपूर्वक करीत राहिले. मांजरेकरांच्या कारकीर्दीच्या सुरवातीच्या काळात पाश्चात्त्य वास्तववादी कलाशैली येथे स्थिरावून बहरली होती. त्यात उत्तम काम करणाऱ्यांची परंपरा निर्माण झाली. ती बॉम्बे स्कूल परंपरा म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्यचळवळीच्या परिणामी येथे भारतीय कलामुल्यांची जोपासना करणाऱ्या भारतीय पुनरुज्जीवनवादी कलाचळवळींनी जोर धरला होता. या कलाचळवळींचे फलित म्हणजे, त्या प्रकारच्या चित्रांनी अखिल भारतीय पातळीवरच्या प्रदर्शनातून यश, लोकप्रियता संपादन केली. त्यांच्यात काही प्रमाणात प्रयोगशीलता होती. मात्र पाश्चिमात्य कलाशैलीने भारावलेल्या अनेक चित्रकार- शिल्पकारांचा या प्रकारच्या आविष्काराला विरोध होता. इतकेच नाही तर त्याचा उपहास, टिंगल होत असे. एक प्रकारे ही ४६४ • निवडक अंतर्नाद दुफळी निर्माण झाली होती. १९३६ नंतर या दोन्ही गटांपेक्षा आधुनिक पद्धतीच्या प्रयोगशील व जोमदार कलाविष्काराने तरुण पिढीला आकर्षित केले व कलेचा प्रवाह वेगाने, तिकडे वाहत गेला. या घुसळणीत मांजरेकरांसारखे काही कलाकार मागे पडले. खायचे. त्यांचा जन्म रत्नागिरीतील आकरे या गावी झाला. आईचे नाव चंद्रभागा शालेय शिक्षण वेंगुर्ले येथे झाले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी कलाशिक्षणासाठी मुंबई गाठली ती स्वतःच्या हिमतीवर मुंबईत आले त्यावेळी ते कुठेतरी राहायचे, कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना टक्केटोणपे सोसत पुढे गेले. आवडीच्या क्षेत्रात उत्तम शिकले. परिश्रम केले. कलाक्षेत्रात स्वतःला प्रस्थापित केले. विवाह १९५७मधे सुशीला खोत यांच्याबरोबर झाला. २ फेब्रुवारी २०२० साली वयाच्या ८७व्या वर्षी सुशीलाताईंचे दीर्घ आजाराने निधन झाले. मात्र तोवर त्यांनी कौटुंबिक संसाराची आणि कलेच्या संसाराचीही भरपूर उस्तवार केली. उत्तम स्वयंपाक करणाऱ्या या गृहिणीने आपल्या शिल्पकार नवऱ्याला अनेकदा माती मळून देण्याचे काम केले. मांजरेकर पूर्वीपासून वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत घरातही शिल्पकामात मग्न असत, 'जेवायला या सांगताना त्यांना शब्दशः हलवावे लागे. घरी सतत असणारी पाहुण्यांची वर्दळ, वाढत्या वयाची दोन अपत्ये, या धामधुमीतही ते कामात एकाग्र असत. स्वतः शिस्तीचे, टापटीपीचे असल्याने कामाची माती, प्लास्टर यामुळे घर कधी माखलेले, अस्ताव्यस्त नसे. त्यांचा पुत्र विभव प्रिंटिंग- ग्राफिक डिझाइन क्षेत्रात आहे. कन्या भारती नृत्यकलेचे वर्ग घेते, सून, जावई, नातवंडे या प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगळे आहे. कन्या भारतीमुळे ते गानसम्राज्ञी किशोरीताई आमोणकर यांचे व्याही आहेत. किशोरीताईंनाही त्यांच्या कलेबद्दल आदर होता. ते मूर्तिकार होते. आध्यात्मिक मार्गातील गुरूंची व्यक्तिशिल्पे केली, ती कलेच्या ओढीने व्यक्तिगत, कौटुंबिक जीवनात कर्मकांडे पाळणारे, अंधश्रद्ध अजिबात नव्हते. राहणी, जीवनमान साधे, सचोटीचे होते. कलाक्षेत्रातील वावरही मर्यादित ये-जा मोजक्या मित्रमंडळींकडे असे. ते स्वभावाने तापट पण मदतीसाठी तत्पर होते. वयाच्या पंचाहत्तरीच्या सुमारास प्रकृत्ती अधूनमधून बिघडू ● लागली. दृष्टी क्षीण झाली. ती सुधारण्यासाठी बरेच उपचार केले. तथापि वाचणे, काम करणे बंद पडले, प्रकृतीचीही गुंतागुंत वाढत गेली. अखेरीस १ मार्च १९९७ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे एका काळाचे प्रतिनिधित्व करणारी त्यांची दर्जेदार शिल्पसंपदा आहे. काही सार्वजनिकरित्या स्थापित, तर काही घरगुती चार भिंतींत सीमित असणारी ती अमूल्य आहेत. त्या शिल्पाकृती कायम स्वरूपात एखाद्या योग्य दालनात प्रदर्शित झाल्या पाहिजेत. (आभार विभव मांजरेकर, भारती आमोणकर, विक्रांत मांजरेकर, दत्तात्रेय पाडेकर, श्रीकांत देवधर, प्रशांत इप्ते) (दिवाळी २०१९)