पान:निवडक अंतर्नाद.pdf/४६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंगी उत्तम गुणवत्ता असूनही फारसे नाव न झालेले व्ही. व्ही. मांजरेकर हे यातील कलात्मक सौंदर्य, यामागे अर्थातच शिल्पकाराचा अभ्यास आहे. पाश्चात्त्य व भारतीय शिल्पकलाशैलींच्या त्यांच्यात झिरपलेल्या सखोल संस्कारांचा संयोग आहे कलाशिक्षण व कलासंस्कार व्ही. व्ही. मांजरेकरांचे जे. जे. स्कूलमधे झालेले स्कल्पचर- मॉडेलिंगचे औपचारिक कलाशिक्षण पाश्चात्त्य धाटणीचे आहे, तसेच त्यांच्यावर परंपरागत भारतीय कला कारागिरीचाही सखोल संस्कार तेथे झाला. त्यांचा स्टोन काव्हिंगचा 'आर्ट अँड क्राफ्ट विभागातील तीन वर्षांचा कालावधी असणारा शिक्षणक्रम, दोन वर्षातच म्हणजे १९४४ मधे पूर्ण झाला. ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. तेथे खिमजी मास्तरांच्या हाताखाली शिक्षण घेण्याची मोठीच संधी त्यांना मिळाली. खिमजी हे काठेवाडमधील परंपरागत कारागीर, दगडातील खोदकामात ते अत्यंत निष्णात होते. वास्तववादी पद्धतीपासून ते अगदी परंपरागत आलंकारिक पद्धतीपर्यंतच्या सर्वच कामांवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. मांजरेकर यांचा पुढील कलाप्रवास पाहता लक्षात येते, की खिमजी यांच्याकडून कळत नकळत, परंपरागत कलेचा अमीट छाप त्यांच्यावर उमटला. ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या या कलाशाळेत, त्यांच्या अॅकेडमिक म्हटल्या जाणाऱ्या पद्धतीचे शिक्षण दिले जायचे. त्यासाठी त्यांनी इंग्लंडहून काही शिक्षकांना येथे मुद्दाम पाचारण केले. मांजरेकरांच्या एकंदरीत शिल्पनिर्मितीचा मागोवा घ्यायचा, तर ती परंपरा या शिक्षकांपैकी जॉन लॉकवुड किपलिंग (१८३७- १९११) यांच्यापर्यंत पोचते. हे किपलिंग म्हणजे 'जंगल बुक' लिहिणारे सुप्रसिद्ध इंग्लिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचे वडील होय, ते जमशेटजी जीजीभॉय यांचे चिरंजीव रुस्तुमजी जीजीभॉय यांच्यामुळे येथे आले व जे. जे स्कूलमधे शिक्षण देऊ लागले. त्या दरम्यान मुंबईत क्रॉफर्ड मार्केट, व्ही. टी स्टेशन, बॉम्बे हायकोर्ट, अशा बऱ्याच इमारतींची बांधकामे सुरू होती. या वास्तूंच्या दर्शनी भागावरच्या अलंकरणाचे व अंतर्भागातील अलंकरणाचे काम करण्यात जॉन किपलिंग यांच्याबरोबर अन्य सहकाऱ्यांचा व जे. जे. स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. किपलिंग यांच्या दर्जेदार कौशल्याची साक्ष देणारी दोन दर्जेदार उत्थित शिल्पे, क्रॉफर्ड मार्केटच्या प्रवेशद्वारावर आजही विराजमान आहेत. १८७५ मधे किपलिंग लाहोरच्या मेयो कॉलेज ऑफ आर्टचे प्रिन्सिपॉल झाले व मुंबई सोडून तिकडे गेले. परंतु त्यांच्यामुळे स्टोन काव्हिंग व शिल्पकला या विषयांचा प्रभावी प्रारंभ मुंबईत झाला. जे. जे. स्कूलमधे शिकणाऱ्या पुढील परंपरेत रावबहादूर गणपतराव म्हात्रे, बी. के. गोरेगावकर आणि प्रस्तुत शिल्पकार व्ही. व्ही. मांजरेकर ही नावे प्रामुख्याने आहेत. मांजरेकरांनी ही परंपरा सुरू ठेवत प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार, सदाशिव साठे व नारायण सोनावडेकर यांसारख्यांना विद्यार्थिदशेत त्यात पारंगत केले. व्ही. व्ही. मांजरेकर यांचे पाषाण माध्यमावरील प्रभुत्व पाहता, त्यांची नियुक्ती १९४७ मधे स्कल्पचर मॉडलिंग विभागात नव्याने निर्माण केलेल्या स्टोन कार्व्हरपदी झाली. ही नियुक्ती जे. जे. स्कूलचे पहिले भारतीय संचालक श्री. अडूरकर यांनी केली. (या आधीचे संचालक ब्रिटिश होते.) या दरम्यान त्यांनी प्रायव्हेट विद्यार्थी म्हणून स्कल्पचर मॉडेलिंगच्या परीक्षाही दिल्या. त्यात पहिला वर्ग मिळून १९५१ मधे ही पदविका प्राप्त झाली. वेळ काढून ते वेगवेगळ्या ओतकामांच्या भट्ट्यांवर, त्या कामांचा अनुभव घ्यायला जात अधिक सराव, अनुभव यासाठी त्यांनी विनायक वाघ या शिल्पकाराकडे चार वर्षे काम केले. पाश्चात्त्यांच्या वास्तववादी कलाशैलीच्या शिक्षणाबरोबर, १९२० च्या दरम्यान जे. जे. स्कूलमधे कॅ. सॉलोमन यांच्या प्रेरणेने भारतीय कला तत्त्वांना उजाळा देणारा उपक्रम 'इंडियन क्लास' म्हणून सुरू झाला होता. त्यातून 'बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल ही शैली निर्माण झाली. भारतीय कलातत्त्वांचा अंगीकारलेल्या त्या शैलीतही मांजरेकर उत्कृष्ट काम करीत. राम-सीतामधे वास्तववादी पाश्चात्त्यशैली व भारतीय कलेतील लयदारता, अलंकृतता, आत्मिक सामर्थ्य यांचा संयोग आहे या पद्धतीच्या आणखीही काही कलाकृती त्यांनी, पौराणिक व्यक्तिरेखा व पौराणिक कथांवर आधारित केल्या. उदाहरणार्थ, विविध मुद्रांतील (पोझेस) भगवान शिवशंकर, नृत्यमान शिव-पार्वती, वनवासी राम-लक्ष्मण इत्यादी. इतकेच काय, शिवलिंग हलवू पाहणाऱ्या दहातोंडी रावणाची निवडक अंतर्नाद • ४६१