पान:निवडक अंतर्नाद.pdf/४६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वा. वि. मांजरेकर एक आत्ममग्न, संयत शिल्पकार

साधना बहुळकर उत्तम चित्रकृती वाचकांसमोर आणणारी मुखपृष्ठे हे अंतर्नादचे एक मोठे वैशिष्ट्य होते. या प्रयत्नांत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे आणि साधना बहुळकर यांनी मोलाची साथ दिली. चित्रसंवाद ह्या साधना बहुळकर यांच्या अंतर्नादमधील सदराला चांगला वाचकप्रतिसाद मिळाला. चित्रसाक्षरतेप्रमाणे शिल्पसाक्षरताही हवी या भूमिकेतून पुढील लेख प्रसिद्ध करत आहोत. शिल्प चिरंतन टिकते; शिल्पकार मात्र विस्मृतीत जातो. वासुदेव विष्णू मांजरेकर (जन्म: १८ जानेवारी १९१८, निधन : १ मार्च १९९७) यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने हे एक संस्मरण, क्वचितच मिळणाऱ्या निवांतवेळी मला आठवते आमचे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, ड्रॉइंग अँड पेंटिंग विभाग! चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा तेथील पहिल्या मजल्यावरचा एल शेप •असणारा स्टुडीओ म्हणजेच वर्ग! त्याच्या भिंती केवढ्यातरी उंच, त्या भिंतींलगत ओळीने मांडलेले धवलरंगी ग्रीक-रोमन अँटिक्स! वेगवेगळ्या पोझमधील ! मानवी शरीराची ती प्रमाणबद्ध, पिळदार, सुडौल अभिव्यक्ती निश्चल राहूनही विद्यार्थ्यांना खूप काही शिकवीत असते. त्या उंच भिंतींना आणि स्टुडीओला साजेसे आगळेच गवाक्ष. त्या गवाक्षातून प्रवेशणाऱ्या प्रकाशात तो आसमंत अद्भुतरम्य वाटायचा. याच प्रकाशात चित्रकलेच्या व्यापक क्षेत्राची ओळख करून देणारे शिक्षण आम्हाला मिळाले. या स्टुडीओप्रमाणे असाच आठवतो तो स्कल्पचर मॉडलिंग विभागाचा स्टुडीओ, त्या स्टुडीओचे दर्शनही अजबच वाटले होते. अनेक पुतळ्यांची, अर्धपुतळ्यांची, कोरीव कामांची तेथे रेलचेल. विद्यार्थ्यांनी केलेली काही आधुनिक शिल्पेही लक्ष वेधून घ्यायची. खजुराहो मंदिरशिल्पातील 'कामिनी' पासून, शिल्पकार बाळाजी तालीमांच्या 'दरिद्री नारायणा पर्यंत आणि सिंहासनाधिष्ठित राजा' पासून ते शिल्पकार बी. के. गोरेगावकरांच्या 'पेपर विक्या' पोपर्यंत! हे सर्व तेथे असण्याचा निकष म्हणजे त्यातील कलात्मकता, कलाकाराचा अभ्यास व माध्यमावरील प्रभुत्व! विद्यार्थ्यांना ते जाणवावे, त्यांची नजर व हात तयार व्हावेत म्हणून. तेथील सर्वच कलाकृती वैशिष्ट्यपूर्ण उत्तम, तरीही प्रवेशद्वाराजवळची ती वनवासी राम-सीतेची डौलदार, सुबक शिल्पकृती आपोआप डोळ्यांत साठविली जायची. अंतरंगात झिरपायची. अंतर्मनात जपली जायची. ती अप्रतिम निर्मिती शिल्पकार, प्रा व्ही. व्ही. मांजरेकर यांची, ते जे. जे. स्कूलचे विद्यार्थी त्यांनी तेथे १९४७ ते १९७६ पर्यंत अध्यापक, विभागप्रमुख व अधिष्ठाता म्हणूनही कार्य केले. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये मी एका कार्यक्रमासाठी जे. जे स्कूलला गेले होते. वेळ होता म्हणून स्कल्पचर मॉडलिंग विभागात सहज डोकावले. प्रवेशद्वारालगत असणाऱ्या रुंद पॅसेजच्या दोन्ही भिंतीलगत तात्पुरत्या स्वरूपाचे डिस्प्लेबोर्ड उभे केले होते. त्यावर माजी विभागप्रमुख कै. मांजरेकर सरांच्या जन्मशताब्दीप्रीत्यर्थं त्यांच्या सुमारे ४५ शिल्पाकृतींची छायाचित्रे प्रदर्शित केली होती. तसेच त्यांचा संक्षिप्त परिचय लावला होता. त्यांची काही सर्टिफिकेट्स, पत्रव्यवहार देखील होता. आत्ताच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या, प्रा. मांजरेकरांच्या दोन्ही उत्थित व्यक्ति शिल्पांना पिवळ्या - केशरी झेंडूच्या माळा घातल्या होत्या. त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षांची दखल निदान, जे. जे. स्कूलमधील त्यांच्या विभागानेतरी घेतली हे बघून फार बरे वाटले. ते सर्व पाहताना माझ्या मनात वसलेले त्यांचे 'वनवासी राम-सीता' डोळ्यांसमोर तरळले. आता त्याचे प्रत्यक्ष दर्शनही घ्यायचेच, म्हणून मी उत्सुकतेने आतील स्टुडीओ गाठला. तेथे विद्यार्थ्यांचा संगीत नृत्य असा कार्यक्रम नुकताच संपला होता. त्यासाठी वर्गातच एका बाजूला लहान रंगमंच थोडक्यात पण कल्पकतेने साकार केला होता. सरांच्या जन्मशताब्दीला पोषक अशी त्या मंचाची पार्श्वभूमी होती. मुद्दाम चुरगळवलेल्या मोठाल्या काळ्या कागदांतून दहा-बारा फूट उंचीचा, पाषाणाचा पोत निर्माण केला होता. त्यावर त्यांचे राम- सीता, नटराज व अन्य मूर्तीचे कटआउट होते. एका निष्णात पाषाणशिल्पीला वाहिलेली ही कल्पक व औचित्यपूर्ण आदरांजली होती. सहज विचारले, 'हे दोन-तीन दिवस तरी इथे ठेवणार आहात ना?' पण पुढील दिवसाचा वर्ग तेथेच भरणार असल्याने ते शक्यच नव्हते. सर्व त्याच संध्याकाळी काढून टाकावे लागणार होते. ऐकून विरस झाला. पण त्यांची अडचण रास्त होती. वाटले, पॅसेजमधील डिस्प्लेबोर्ड तेवढा वर्षभर ठेवणार असतील, पण तोही महिनाभरदेखील ठेवणे शक्य नव्हते. मांजरेकरांनी आपल्या हयातीतील तीस वर्षांचा प्राईम टाइम तेथे व्यतीत केला. तेथील फौंड्री त्यांनी सुरू केली. तळमळीने नव्या पिढीला माध्यमातील तांत्रिकतेचे धडे दिले. त्या थोर शिल्पकार प्राध्यापकाच्या जन्मशताब्दी निमित्त केवळ एक दिवसीय उपक्रम संस्थेकडून व एकूणच महाराष्ट्रात झाला. तीव्र खंत वाटली. पण समाधानही वाटले, की त्यांची विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळ, या संस्थेप्रती व आपल्या निवडक अंतर्नाद ४५९