पान:निवडक अंतर्नाद.pdf/४५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कॅमेरा आणि सतार विजय पाडळकर २०२० हे वर्ष पंडित रविशंकर यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष. त्यानिमित्ताने हा एक विशेष लेख. सत्यजित राय त्यांच्यापेक्षा जेमतेम एका वर्षानी लहान. दोन्ही आपापल्या क्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे. रविशंकर आणि सत्यजित राय या दोन भारतरत्नांची ही एक आगळी जुगलबंदी. सत्यजित राय आणि रविशंकर : एका गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान चहा पिताना महान संगीतकार रविशंकर हे जसे त्यांच्या सतारवादनाबद्दल प्रसिद्ध आहेत, तसेच ते अल्ला रख्खा, यहुदी मेनुहिन, हरिप्रसाद चौरासिया अशा कलावंतांसोबत त्यांनी केलेल्या जुगलबंदीच्या कार्यक्रमांबद्दलही प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांनी आणखी एका महान भारतीय कलावंतासोबत केलेली जुगलबंदी मात्र काहीशी अलक्षित राहिली आहे. ते कलावंत म्हणजे जगातील सर्वोत्तम चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक, सत्यजित राय, सत्यजित यांचा कॅमेरा आणि पंडितजींची सतार यांची ही जुगलबंदी 'पाथेर पांचाली' या चित्रपटापासून सुरू झाली. 'पाथेर पांचाली' हा जागतिक चित्रपटसृष्टीतील एक चमत्कार आहे. चित्रपटनिर्मितीचा कसलाही अनुभव नसणाऱ्या तीन तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट निर्माण केला. आज हा चित्रपट भारतीय सिनेजगतात मन्वंतर घडवून आणणारा मानला जातो. In the beginning there was Pather Panchali असे श्रेष्ठ सिनेदिग्दर्शक अदूर गोपाल कृष्णन यांनी त्याबद्दल म्हटले आहे. या चित्रपटाने भारतीय चित्रपटाच्या इतिहासाचे सरळसरळ दोन भाग केले – एक : 'पाथेर पांचाली' पूर्वीचा सिनेमा व दुसरा : 'पाथेर पांचाली' नंतरचा सिनेमा या चित्रपटाला वीसपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली व आजही तो भारतीय सिनेमाची ओळख म्हणून नावाजला जातो. या चित्रपटाच्या निर्मितीत सत्यजित राय, त्यांचे छायाचित्रकार सुब्रतो मित्रा, कला निर्देशक बन्सी चंद्रगुप्त यांचा जेवढा वाय आहे, तेवढाच त्याचा प्रभाव आणि सौंदर्य वाढविण्यात त्याचे संगीत निवडक अंतर्नाद • ४५३