पान:निवडक अंतर्नाद.pdf/४३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपली क्रीडासंस्कृती भीष्मराज बाम कणखर शरीर आणि कणखर मन खेळाच्या मैदानावरच घडते, हे ठाऊक असलेल्या ग्रीकांनी ऑलिंपिक स्पर्धा सुरू केल्या. सतत साडेअकराशे वर्षे भरत आलेल्या या स्पर्धात राजे, सेनापती, योद्धे तर भाग घेतच असत; पण तत्त्वज्ञ म्हणून इतिहासात प्रसिद्ध असलेल्या सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल, प्लेटो आणि पायथॅगोरसचाही ऑलिंपिकच्या यशस्वी स्पर्धकांत आणि प्रशिक्षकांत समावेश होता. महेन्द्रसिंह धोनीच्या संघाने जागतिक चषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला, तेथपासून तो ११ एप्रिल २०११ रोजी अंतिम फेरी जिंकेपर्यंत सर्व भारतवासीयांना दुसरे काही सुचतच नव्हते. जागतिक चषक पटकावल्यावर जो जल्लोष झाला त्याला तोड नव्हती. असाच जल्लोष २० षटकांच्या स्पर्धांत भारताने जागतिक चषक जिंकला तेव्हाही झाला आणि १९८३मध्ये कपिलच्या संघाने एक दिवसीय सामन्यांचा चषक जिंकला तेव्हाही झाला होता. भारतीयांच्या या क्रिकेटप्रेमाबद्दल सर्वांना नवल वाटते. पण त्यांना सर्वसामान्य जनतेची मानसिकता समजत नाही. युरोपचे वा दक्षिण अमेरिकेचे फुटबॉलचे वेड आणि आपले क्रिकेटचे वेड यांत फार मोठा फरक आहे आपण विजयासाठी आसुसलेले आहोत. जागतिक चषक स्पर्धेत भारतीय संघ लवकर बाद झाला असता, तर एकूण स्पर्धेला प्रेक्षकांचा प्रतिसाद कितपत मिळाला असता त्याची शंकाच आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धा ही आपली क्रिकेटची राष्ट्रीय स्पर्धा आहे. त्यात मुंबई विरुद्ध कर्नाटक असा उपांत्य फेरीचा सामना चालू असताना व दोन्ही संघांत उत्तम खेळाडू असतानाही प्रेक्षकांची संख्या खेळाडूंपेक्षा कमी होती! राष्ट्रीय भावना जागी करायला क्रीडाक्षेत्रात अजिंक्य संघ निर्माण करणे किती महत्त्वाचे आहे, ते आमच्या समाजधुरीणांना अजून समजलेले दिसत नाही. नाहीतर भारतात क्रीडाक्षेत्र इतके उपेक्षित राहिले नसते. क्रिकेट तसा प्रेक्षकांना आकर्षित करू शकणारा खेळ आहे ब्रिटिशांनी जिथे राज्य केले, त्या बहुतेक सर्व ठिकाणी तो लोकप्रिय आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या राज्यकर्त्यांनी नोकरशहांनी आणि क्रीडासंघटकांनी एकूण क्रीडा विकासाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष केले आहे. आज आपल्या क्रीडाक्षेत्रावर प्रचंड प्रमाणात आणि पुष्कळसा अनाठायी खर्च होत आहे, पण खेळाडूंच्या विकासाकडे फारसे कोणाचे लक्षच नाही. कणखर शरीर आणि कणखर मन खेळाच्या मैदानावरच घडते, हे ठाऊक असलेल्या ग्रीकांनी ऑलिंपिक स्पर्धा सुरू केल्या. सतत साडेअकराशे वर्षे भरत आलेल्या या स्पर्धांत राजे, ४३६ निवडक अंतर्नाद सेनापती, योद्धे तर भाग घेतच असत; पण तत्त्वज्ञ म्हणून इतिहासात प्रसिद्ध असलेल्या सॉक्रेटिस, अॅरिस्टॉटल, प्लेटो आणि पायथॅगोरसचाही ऑलिंपिकच्या यशस्वी स्पर्धकांत आणि प्रशिक्षकांत समावेश होता. ऑलिंपिक विजेत्याला बक्षीस म्हणून ऑलिव्हच्या पानांचा मुकुट तेवद्य मिळे. पण त्याच्या राज्यातले लोक त्याच्यावर देणग्यांचा वर्षाव करून त्याला मालामाल करून यकत असत. एखाद्या विजेत्या योद्ध्यासारखा ऑलिंपिक जिंकणाऱ्याला मान दिला जाई. त्याच्या मिरवणुकीला अडथळा नको, म्हणून तटबंदीच्या भिंतीसुद्धा पाडून यकल्या जात असत. रोमनांचे राज्य आल्यावर त्यांनीही या स्पर्धा चालू ठेवल्या. या सर्व काळात ऑलिंपिकच्या स्पर्धांत इतर विघ्ने येऊ नयेत, यासाठी शांततेचा तह केला जाई आणि तो कसोशीने पाळलाही जाई. पण इ.स. ३९३मध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या रोमन सम्राट थिओडोससने ग्रीकझियस या देवतेच्या उत्सवाप्रीत्यर्थ चालणारे हे ऑलिंपिकचे 'पाखंड' बंद करून टाकले. नेपोलियनच्या युद्धांत आणि नंतर झालेल्या फ्रॅन्को प्रशियन युद्धांत युरोपीय शासकांना आणि विचारवंतांना युवा पिढी कणखर व्हावी, यासाठी स्पर्धात्मक खेळ आवश्यक आहेत, असे वाटले. वॉटची लढाई हॅरो आणि ईटनच्या क्रीडांगणावर जिंकली गेली, हे ती लाई नेपोलियनविरुद्ध जिंकणाऱ्या ड्यूक ऑफ वेलिंग्टनचे उद्गार प्रसिद्धच आहेत. १८९६ पासून दर चार वर्षांनी या ऑलिंपिक स्पर्धा भरायला लागल्या. पण १९३२पर्यंत या स्पर्धांना म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता. जर्मन हुकूमशहा हिटलर याने या स्पर्धांचे राजकीय महत्त्व ओळखले आणि १९३६ मध्ये बर्लिन येथे या स्पर्धा भरवल्या. जर्मन खेळाडूंनीही सर्वाधिक पदके पटकावून हिटलरला आनंदित केले. त्यानेही आपल्या वंशश्रेष्ठत्वाच्या मुद्द्यावर प्रचार करण्यासाठी या स्पर्धांचा भरपूर उपयोग करून घेतला. आफ्रिकन खेळाडू हे हलक्या वंशातले असल्याने ते जर्मन खेळाडूंना हरवूच शकणार नाहीत, हा हिटलरचा प्रचार मात्र जेसी ओवेन्स या अमेरिकन कृष्णवर्णीय खेळाडूने खोटा ठरवला. कारण १०० व २०० मीटर्सच्या शर्यती जिंकून तो जगातला सर्वात वेगवान