पान:निवडक अंतर्नाद.pdf/४३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राजस्थानमधून धावत जाणाऱ्या आगगाडीच्या टपावरून केलेलं 'ॲक्शन' चित्रण आली. आयर्लंडमध्ये सहकुटुंब सुट्टी घालविण्यासाठी निघालेल्या लॉर्ड लुई माउंटबॅटन यांच्या नौकेवर घातपात्यांनी बॉम्ब टाकून तिच्या ठिकऱ्या ठिकऱ्याा उडवल्या. त्यात इतर तिघांसह लॉर्डसाहेब ठार झाले होते. आधी पंडितजी गेले; नंतर मोतीलाल कोठारी; आणि आता माउंटबॅटन. (पुढे अॅटनबरोंनी 'गांधी' चित्रपट या तिघांच्या स्मृतीस अर्पण केला.) १९८०मध्ये इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या, ब्रायलीचं स्क्रिप्टही पूर्ण झालं होतं. अॅटनबरो राणी दुबे यांच्यासह भारतात आले. इंदिराजींनी त्यांना आपल्या घरी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं. त्यावेळी त्यांनी चित्रपटाच्या संदर्भात अॅटनबरोंना विचारलं असता त्यांनी तोवरचा वृत्तांत कथन केला. एक प्रकारे इंदिराजी ही आरंभापासूनच या प्रकल्पात भावनात्मकरीत्या गुंतलेल्या होत्याच. त्यांनी अॅटनबरोंच्या साऱ्या आर्थिक समस्या आस्थेनं ऐकून घेतल्या. इंदिराजींनी त्यांना 'गांधी' ची पटकथा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे सादर करायला सांगितलं. त्या स्वतः संबंधित मंत्री वसंत साठे यांच्याशी बोलणार होत्या. जवळजवळ परिणामी, साया सरकारी सोपस्कारातून नि आशानिराशेच्या लपंडावातून गेल्यावर 'नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नं चित्रपटाच्या एकूण बजेटचा काही अर्थभार उचलण्याचं मान्य केलं. ही सरकारी मदत बरीच वादग्रस्त ठरली. विरोधकांनी टीकेचा एकच गदारोळ उठवला. त्याचेच पडसाद मग चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत सतत उमटत राहिले. त्यानंतर मात्र हळूहळू आर्थिक समस्या निवळू लागल्या आणि चित्रपटाच्या कामाला गती येऊ लागली. मुळात स्क्रिप्ट चांगलंच स्त, उत्तम झाल पायाच भक्कम होता. अॅटनबरोंनी आपला संघ बांधायला करारमदार करायला सुरुवात केली, अखेर 'गांधी' सापडले! कोणत्याही परिस्थितीत गांधीजींच्या भूमिकेसाठी नामवंतच अभिनेता हवा, असा चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेतील बहुतेक खाशांचा आग्रह होता. कुणाही अभारतीय अभिनेत्याला ह्या भूमिकेत घेण्यास नाखूष असलेल्या अॅटनबरोंनी आपली मतं तात्पुरती बाजूस ठेवून डर्क बोगार्ड, पीटर फिंच, अल्बर्ट फिनी आणि ग्रॅम कर्टनी यांना वेगवेगळ्या वेळी 'गांधी' चं स्क्रिप्ट पाठवलं. परंतु त्या सर्वांकडून नकारच मिळाले. एकीकडे चित्रपटाची पूर्वतयारी चालू असतानाच गांधीजींच्या भूमिकेसाठी अॅटनबरोंच्या डोक्यात एक नाव सारखं घोळू लागलं बेन किंग्जले. 'रॉयल शेक्सपिअर कंपनी' चा तो एक प्रमुख ट होता. त्याचे वडील भारतीय डॉक्टर होते आणि मँचेस्टरमध्ये निवडक अंतर्नाद ४२९