पान:निवडक अंतर्नाद.pdf/४२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्केच आर्टिस्ट चॉकी व्हाइटनं बेन किंग्जलेच्या मूळ छायाचित्रावरून पारदर्शक कागदाच्या साह्यानं, ब्रशची करामत करत, तो अखेर 'गांधी' म्हणून कसा दिसेल याची केलेली प्राथमिक स्केचेस विचार करता करता अॅटनबरोंना अचानक जाणवलं, की पुस्तक वाचण्यापूर्वीच आपण नकळतच 'गांधी' या विषयाकडे आकर्षिले गेलो आहोत! 'ते एकच वाक्य निर्णायक! स्वित्झर्लंडमधील मुक्कामाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अॅटनबरोंनी पलंगावर पडल्या पडल्या लुई फिशरचं गांधी- चरित्र वाचायला घेतलं. पुस्तकाची सुरुवात गांधीजींच्या अंत्ययात्रेनं केली होती, मग त्यांचं बालपण, पौगंडावस्था, शिक्षणासाठी इंग्लंडला जाणं, बॅरिस्टर होऊन भारतात परतणं वगैरे चरित्रातले टप्पे झाल्यावर आलं, त्यांचं दक्षिण आफ्रिकेतलं आगमन येथपर्यंतचा भाग वाचण्यात तासाहून अधिक वेळ कसा निघून गेला ते अॅटनबरोंना कळलंच नाही. त्यानंतर पुढे जे काही लिहिलं होतं ते वाचून मात्र ते एकदम ताडकन उठून बसले. "१८९० च्या दशकारंभीची घटना, दक्षिण आफ्रिकेत गांधीजी आपल्या एका भारतीय सोबत्याबरोबर फुटपाथवरून चालले असता समोरून दोन गोरे त्यांच्या दिशेनं येऊ लागले. तिथल्या अलिखित नियमानुसार ( काळ्यांनी गोऱ्यांना आपला वारासुद्धा लागू देता कामा नये) हे दोघे काळे घाईघाईनं फुटपाथलगतच्या गटारात उतरून गोरे जाईपर्यंत थांबून राहिले. गांधीजी मग आपल्या सोबत्याकडे वळून म्हणाले, "दुसऱ्या माणसाची मानखंडना केल्यानं आपली प्रतिष्ठा वाढते, असं काही माणसांना कसं वाटतं, याचं मला नेहमीच कोडं पडतं.” (“It has always been a mystery to me how men can feel themselves honoured by the humiliation of their fellow beings.") हे बोलताना गांधीजींच्या स्वरात राग नव्हता. होतं ते केवळ आश्चर्यच... वयाच्या अवघ्या बावीस तेविसाच्या वर्षी मोहनदास करमचंद गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत उच्चारलेलं ते वाक्य वाचताच अॅटनबरो एकदम थरारून उठले. एकाच वेळी ते उत्तेजित आणि बधिरही होऊन गेले. मूळ ५०५ पानी पुस्तकाचं ते केवळ ४८वं पान होतं. आणि तेच... किंवा खरं तर त्यावरचं ते वाक्यच अॅटनबरोंच्या दृष्टीनं निर्णायक ठरलं; त्यांच्या तोवरच्या कारकिर्दीला आणि एकूणच जीवनालाही कलाटणी देणारं ठरलं! गांधी- चरित्रानं अॅटनबरोंना झपाटूनच टाकलं. त्या बैठकीत डोळे अगदी थकून जाऊन मिटेपर्यंत ते वाचतच राहिले. दुसऱ्या दिवशी पुस्तक वाचून पूर्ण होण्याचीही वाट न पाहताच त्यांनी स्वित्झर्लंडहून थेट लंडनला कोठारींना फोन लावला आणि एखाद्या अधीर पोराच्या उत्साहानं आपली प्रतिक्रिया कळवली. कोठारींना अर्थातच आनंद वाटला. पण आश्चर्य मात्र मुळीच वाटलं नाही. त्यांनी विचारलं - "बरं पण चित्रपयचं काय?” अॅटनबरोंनी सांगितलं, "हा 'एपिक' स्वरूपाचा म्हणजेच महाचित्रपट होणार, माझ्या दृष्टीनं तर ही फारच मोठी उडी आहे. बजेट प्रचंड, जबाबदारीही प्रचंड हे काम काही सहजसोपं नाही.” कोठारींनाही त्याची पूर्ण कल्पना होतीच. आपल्या सुट्टीच्या उरलेल्या दिवसांत अॅटनबरोंनी लुई फिशरचं ते पाचशे पानी गांधी- चरित्र आणखी एकवार वाचून काढलं. आयुष्यात त्यांना प्रथमच चित्रपट दिग्दर्शित करावा असं तीव्रतेनं वाटू लागलं. आणि तोही असा तसा चित्रपट नव्हे, तर मोहनदास करमचंद गांधी या महामानवावरचा! 'वेड्या साहसा'त उडी लंडनला परतल्यावर लागलीच कोठारींची भेट न घेता अॅटनबरोंनी या विषयावर आपले काही सहकारी, स्नेही आणि हितचिंतक यांच्याशी सल्लामसलत केली. कुणाकडूनही फारसा उत्साहाचा प्रतिसाद मिळाला नाही. उलट काहींनी तर 'वेडं साहस' निवडक अंतर्नाद ४२१