पान:निवडक अंतर्नाद.pdf/३९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या अध्यापनासाठी आम्ही प्रारंभी डॉ. ग. न. साठे यांचे 'मराठी स्वयंशिक्षक' हे पुस्तक वापरत असू. नंतर कल्याण काळे आणि अंजली सोमण यांचे 'लर्निंग मराठी' हे पुस्तक निघाल्यावर ते वापरू लागलो. मी विभागप्रमुख झाल्यावर सगळ्या भाषांमध्ये प्रमाणपत्र, पदविका यांच्यानंतरचा 'उच्च पदविका अभ्यासक्रम' सुरू केला. यासाठी मराठीकरिता एक लघुनिबंधांचे पुस्तक लावले होते. या वर्गांतील अमराठी विद्यार्थ्यांना मराठी शिकवणे हा मला अगदी सर्वस्वी नवीन अनुभव होता. मराठीतील लिंगव्यवस्था ही इतकी विचित्र व अनियमित आहे, की त्यामुळे नवीन भाषा म्हणून • शिकण्यासाठी मराठी ही सर्वांत अवघड भाषा होऊन बसली आहे. 'ळ' हे अक्षर आणि च छ ज झ यांचे दंततालव्य उच्चार उत्तरेकडच्या विद्यार्थ्यांना खूप प्रयत्न करूनही नीट जमत नाहीत. हे सगळे त्या अमराठी विद्यार्थ्यांना इंग्लिश व हिंदी माध्यमांतून शिकवताना भाषेविषयी, भाषेच्या मोडणीविषयी, तिच्या क्षमतांविषयी मीही काही नवीन नवीन शिकत होतो. दिल्ली विद्यापीठात मराठी विषयात पीएच. डी. करण्याचीही सोय होती. पण एम. ए. मराठीची सोय नसल्यामुळे ( एम. ए. ची सोय फक्त बांग्ला आणि तमिळ या दोन भाषांमध्ये होती. अजूनही आहे.) बाहेरून कुठून एम. ए. मराठी करून दिल्लीत स्थायिक झालेले विद्यार्थीच मराठीमध्ये पीएच. डी. करू शकत होते. असा योग कपिलाषष्ठीचा योग होता. माझ्या इतक्या वर्षांच्या अध्यापनाच्या कारकिर्दीत फक्त दोन विद्यार्थी विद्यार्थिनींनी अशा तऱ्हेने मराठीमध्ये पीएच. डी. केले. या गर्दीमागे नवीन भाषा शिकण्याची विद्यार्थ्यांची तळमळ हे कारण नव्हते. खरे कारण वेगळेच होते. त्या काळी विद्यार्थ्यांना दिल्लीच्या स्थानिक बससेवेचा 'ऑल रूट पास केवळ बारा रुपयांत मिळायचा. म्हणजे महिन्याला फक्त बारा रुपये भरून कोणत्याही रूटच्या बसने कितीही वेळा प्रवास करता यायचा. प्रवेश मिळवण्याची विद्यार्थ्यांची धडपड या पासकरिता असायची! पण विभागातील आम्ही सगळे अध्यापक मिळून एक महत्त्वाचा अभ्यासक्रम राबवत होतो, तो म्हणजे 'तौलनिक भारतीय साहित्या' चा हा अतिशय प्रतिष्ठित अभ्यासक्रम आहे आणि संपूर्ण भारतात तो फक्त दिल्ली विद्यापीठातच शिकवला जातो. मी रुजू झालो, तेव्हा 'तौलनिक भारतीय साहित्या' चे अध्यापन एम. फिल. आणि पीएच. डी. या पातळीवर केले जात असे. मी नंतर विभागप्रमुख आणि कलाशाखेचा अधिष्ठाता झालो, तेव्हा हा अभ्यासक्रम एम. ए. च्या पातळीवर सुरू केला. या अध्यापनाचे माध्यम इंग्लिश हेच असते. 'पोएम्स ऑफ विंदा' हा विंदा करंदीकरांनी इंग्लिशमध्ये स्वतःच अनुवादित केलेल्या आपल्या कवितांचा संग्रह आणि साहित्य अकादमीचे 'समकालीन भारतीय साहित्य हे द्वैमासिक निघते, त्यातल्या काही हिंदीमध्ये अनुवादित कथा कविता लावल्या होत्या. 'भारतीय कादंबरी या प्रश्नपत्रिकेसाठी लावलेल्या कादंबऱ्यांमधे भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला' होती, तर 'भारतीय 'नाटक' या प्रश्नपत्रिकेसाठी लावलेल्या नाटकांमध्ये विजय तेंडुलकरांचे 'घाशीराम कोतवाल' होते. 'भारतीय साहित्यातील आशयसूत्रे या प्रश्नपत्रिकेसाठी 'व्यवस्थेला विरोध करणाऱ्या स्त्रिया हे आशयसूत्र होते, तेव्हा हरी नारायण आपटे यांची 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी लावलेली होती, तर पुढे 'शहर व खेडे' हे आशयसूत्र लावले गेले तेव्हा जयवंत दळवी यांची 'चक्र' कादंबरी लावली गेली. 'भारतीय साहित्यशास्त्र' या प्रश्नपत्रिकेत 'आधुनिक भारतीय साहित्यसिद्धान्त या विषयात अरविंद, रवींद्रनाथ, बा. सी. मर्ढेकर आणि रामचंद्र शुक्ल यांच्या साहित्यसिद्धान्तांचा समावेश होता. अर्थात हे सारे अध्यापन इंग्लिश माध्यमातून करावे लागे; पण प्रमाणपत्र पदविकेच्या वर्गांना भाषेचे अध्यापन करण्यापेक्षा या साहित्यविषयक अध्यापनामध्ये आम्हांला जास्त रस वाटे शिवाय, हिंदी विभागामध्ये काँपोझिट कोर्सचे तासही आम्ही घेत असू. तिथे वसंत कानेटकरांचे 'अश्रूंची झाली फुले' हे नाटक, 'सर्वोत्कृष्ट मराठी कथा' (सं. राम कोलारकर ) या संकलनाच्या एका खंडातील काही कथा आणि रा. भि. जोशी यांचा एक लघुनिबंधसंग्रह अशी पुस्तके लावलेली होती. हेही साहित्याचे अध्यापन असल्याने त्यात आम्हांला रस वाटायचा. या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत मराठीचे अध्यापनही होत असे. एम. फिल. च्या विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त एक भारतीय भाषा शिकावी लागे. यामध्ये मराठी भाषा निवडणारे काही विद्यार्थी असत. त्यांचा अभ्यासक्रम मराठीच्या प्रमाणपत्र वर्गाप्रमाणेच असे. पुढे या प्रश्नपत्रिकेऐवजी 'एका भारतीय भाषेतील अनुवादित साहित्य अशी प्रश्नपत्रिका लावण्यात आली. त्यामध्ये 'मराठीतील अनुवादित साहित्य' निवडणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ३९८ निवडक अंतर्नाद हे झाले विद्यापीठातील मराठीच्या अध्यापनाचे स्वरूप. महाविद्यालयीन स्तरावरही बी. ए. साठी मराठी हा एक गौण ( subsidiary) विषय म्हणून ठेवलेला होता. त्याचा व्यवस्थित अभ्यासक्रम तयार केलेला होता. त्या विषयासाठी पु. शि. रेगे यांची 'सावित्री' ही कादंबरी आणि वि. द. घाटे यांचा 'मनोगते' हा ललितलेखांचा संग्रह अशी दोन पुस्तके लावलेली होती. परंतु कुठल्याही महाविद्यालयात मराठी हा विषय बी. ए.ला गौण म्हणून घेणारा कुणीही विद्यार्थी नसल्याकारणाने हा अभ्यासक्रम केवळ सिलॅबसमध्ये छापलेल्या अवस्थेत पडून होता. सबंध दिल्ली विद्यापीठाच्या इतिहासात मराठी हा बी. ए. ला गौण विषय म्हणून फक्त एका विद्यार्थ्यांने (माझा मुलगा नीलेश याने) घेतला होता. दिल्ली विद्यापीठातील अध्यापनाचा दुसरा महत्त्वाचा अनुभव म्हणजे आमच्या विभागातील साप्ताहिक चर्चासत्रे. ही प्रथा मी तेथे