पान:निवडक अंतर्नाद.pdf/३९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कधीच विसरणार नाही. जणू तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही अशी भूमिका तिने घेतली. "मी कुठेच जाणार नाही. मी माझ्या आजीकडे जाणार आणि मला कायदा माहीत आहे. तेव्हा माझ्यावर कोणीच सक्ती करायची नाही. " आम्ही तिला खूप समजावून सांगितले, पण ती अधिकच अपमानकारक बोलू लागली. आमचा नाईलाज होता. उठून आलो. लवकरच संस्थेने तिला आजीकडे पोहचवले. एका सुंदर इमारतीतून ती पुन्हा आजीच्या झोपडीत गेली. त्या झोपडीत सगळीच दैना होती. तिच्या त्या लहान मुलीचे खूप हाल होत होते, पण तिला त्यातच समाधान वाटत होते. अगदी दोन महिन्यापूर्वी मी वीटभट्टीजवळून जात होतो. तिच्या आजीने हाक मारली. कागदपत्रे हवी होती. बघितले तर मायाची लहान मुलगी मातीत खेळत होती. तिथे काम करून माया काळी पडली होती. अशक्त झाली होती. मी पुन्हा एकदा शेवटचे तिला "स्नेहालयला जा' असे म्हणालो. ती ठामपणे "नाही" म्हणाली, आजी म्हणाली, "आता स्थळ शोधतोय. दलित साहित्याची खरीखुरी गरज स्वच्छ व दार्शनिक अधिष्ठानाची आहे. दलित समाजाला साहित्यिकापेक्षा निष्ठावंत विचारवंतांची अधिक आवश्यकता आहे. विचारदरिद्री समाजात कोणतीच कला निर्माण होऊ शकत नाही. बौद्धांचे तत्वज्ञान दलित समाजाचे मूल्यवान धन आहे. केवळ काही नित्य-नैमित्तिक संस्कारांपुरते हे धन बाहेर काढून पुन्हा लगेच ते पुरून ठेवले, तर अशी कृपणता त्या धनाचा क्षय करील. निळ्या पहाटेचे आवाहन मुख्य म्हणजे, बौद्ध जीवनमूल्यांची कास धरल्यास दलित समाजाचे केवळ नकारात्मक विचारसरणीपासून संरक्षण होईल. कदाचित वर्गकलहाच्या प्रलोभनीय विचारसरणीलाही तो चार हात दूर ठेवू शकेल. त्यामुळे बौद्ध विचारप्रणाली मनोमन रुजविण्याचे व दलित मने दृढ करण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य दलित सामाजिक विचारवंतांनी केले पाहिजे, पण समाज वाढतो व विकासतो तो विद्रोहाने नव्हे व निषेधानेही नव्हे; तो विधायक विचारप्रणालीच्या खांद्यावर विश्रब्धपणे विसावलेला नसेल, तर प्रगतीची वाटचाल करण्यास त्यास बळ लाभणार नाही. डॉ. आंबेडकरांना खरा वैचारिक शिष्य लाभला नाही, तर दलितसमाज महान स्वप्ने पाहू शकत नाही, असाच त्याचा अर्थ होईल. लग्न करू, ” या निरक्षर आणि कुमारी माता असलेल्या मायाला असाच एखादा वीटभट्टीवरचा नवरा मिळणारा आणि ही पुन्हा आजी आणि आईबापासारखे तेच अमानुष कष्टाचे जीवन जगणार! दलित साहित्याची दुसरी गरज नव्या मराठी धर्मग्रंथांची व पुराणांची आहे. बौद्धदर्शनाच्या आधारे नवीन रामायण- महाभारतासारखे ग्रंथ निर्माण करणे आवश्यक आहे. नव्या मिथ्स निर्माण होणे आवश्यक आहे. नवबौद्ध दलित समाज रामायण, महाभारत मानीत नाही. दलितांच्या बालकांना एखादी आजीबाई कोणत्या गोष्टी सांगणार? दलितांतून एखादा शिवाजी ३९६ • निवडक अंतर्नाद तिचा आर्थिक, सामाजिक स्तर बदलण्याचा माझा प्रयत्न बारा वर्षांच्या धडपडीनंतर असा निष्फळ ठरला. क्षणभर 'हे लोक असेच असतात. उपकाराची जाणीव नसते' वगैरे सगळे मनात येऊन गेले. पुन्हा असे काहीच करायचे नाही असेही ठरवले, पण त्यात फार अर्थ नसतो. फुन्हा असे काही घडले की मी सगळे विसरून त्या नव्या विषयात पुन्हा ताकदीने उतरेन आणि नव्या एखाद्या मायाच्या आयुष्याला न्याय देण्यासाठी धडपडेन. हे विसंगत असले तरी हीच माझ्या संवेदनशीलतेची सुसंगती आहे आणि तीच अधिक सुंदर आहे. (नावे काल्पनिक) (दिवाळी २०१६) निर्माण करण्यास कोणते संस्कारी साहित्य वापरणार? आरत्या, स्तोत्रे, पदे यांबरोबरच आख्याने, कथाकाव्ये, भाष्ये, पोथ्या वगैरेंचीही निर्मिती करणे भाग आहे प्राचीन बौद्ध साहित्याची या दृष्टीने पाहणी करण्याचे काम दलित साहित्यिकांचे आहे. 'फोडिले भांडार' अशी आरोळी देणारे कविलेखक पुढे आले, तरच हे शक्य आहे. सगळ्याच दलित साहित्यिकांनी सूडाच्या कथा लिहिल्या, तर संस्कृतिसंभवाचे हे पूरक कार्य कोण करणार?... "हे विसावे शतक आहे. वैज्ञानिक युग आहे. त्यामुळे पुराणसाहित्यनिर्मिती कालविसंगत व म्हणून अशक्य आहे,” असे काहींचे म्हणणे असेलही; परंतु आधुनिकतेचा हा हवाला देऊन दलित समाजाचे वाङ्मयीन प्रश्न कधीच सुटणार नाहीत. अचल वैज्ञानिकता सांस्कृतिकतेला काटछेद देऊ शकत नाही. नि दृढतम दार्शनिक आत्मप्रत्ययातूनच कलासाहित्यासारखी अभिव्यक्ती समाज संसिद्ध करू शकतो आणि तसा अचल व दृढतम दार्शनिक आत्मप्रत्यय केवळ धर्मश्रद्धाच किंवा तत्सदृश श्रद्धाच निर्माण करू शकते, ही महत्त्वाची वस्तुस्थिती दलित समाजीयांनी लक्षात घेतली नाही, तर वर्गविग्रहाच्या, विद्रोहाच्या व निषेधाच्या कांचनमृगाचा मोह पडून, तो एका घातक भूलभुलय्यात अडकून पडल्याशिवाय राहणार नाही. यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे एका अनिष्ट सांस्कृतिक पोकळीत तो स्वत:स टांगून घेईल आणि या देशात पुन्हा बौद्धदर्शनाचा पूर्ण पराभव होईल. - प्रा. रा. ग. जाधव (माझे चिंतन)