पान:निवडक अंतर्नाद.pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्राच्या मध्यकेंद्रापर्यंत पोचण्याच्या आधी या परकी सैन्याला वाटेवरच्या शेतकऱ्यांनी, जनसामान्यांनी काहीच विरोध केला नाही? त्यांना नेतृत्व नसले मिळाले तरी काय झाले? राजारामाच्या वेळी कोठे होते नेतृत्व ? तरी उभा महाराष्ट्र जागोजाग लढला, मग रामदेवरायाच्या वेळी का नाही तो उभा राहिला ? बरे, शत्रूच्या फौजा किल्ल्यापाशी येऊन पोहोचल्यानंतरतरी वेढ्याच्या बाहेरच्या लोकांनी वेढ्याची कुतरओढ का नाही केली ? इतिहासात जागोजागी वाचावे लागते, की रजपूत / मराठा सैन्य शिकस्तीने लढले, पण अखेरीस शत्रूच्या प्रचंड संख्याबळापुढे त्यांचे काही चालले नाही. मोगल हजारो मैलांवरून येथे आलेले. त्यांची संख्येची ताकद स्थानिक राजांच्या त्यांच्या स्वतःच्या प्रदेशातील ताकदीपेक्षा जास्त कशी राहिली ? हे कोडे अनेकांनी मांडले आहे, अगदी १८५३ साली मार्क्सने एंगल्सला लिहिलेल्या पत्रातही ते मांडले आहे. भारतातील गावगाड्याबद्दल मार्क्स लिहितो, "खेड्यात राहणाऱ्यांना राज्ये फुटली, मोडली याचे काहीच सुखदुःख नाही. खेड्याला धक्का लागला नाही तर ते कोणत्या राजाकडे जाते, कोणत्या सुलतानाची त्यावर अधिसत्ता चालते याची त्यांना काहीच चिंता नसते, गावगाडा अबाधित चालत राहतो. " 'राधामाधवविलासचंपू'च्या प्रस्तावनेत हे कोडे वेगळ्या पद्धतीने राजवाड्यांनी मांडले आहे. हिंदू राजवटीतील महाराष्ट्राच्या संस्कृतीची व्याप्ती अत्यल्प ब्राह्मणांपुरती व उत्तरेकडील क्षत्रियांपुरती होती. बहुसंख्य नागवंशी मराठे अत्यंत मागासलेले असून त्यांच्यात राष्ट्रभावनेचा उदय झालेला नसल्यामुळे ते अभिमानाने लढण्यास पुढे येऊ शकले नाहीत. आणि त्यामुळे अल्पसंख्य आर्यक्षत्रियांचा पराभव होताच महाराष्ट्रात मुसलमानी राजवट आली. सेनापती पडताच सैरावैरा पळत सुटण्याच्या प्रवृत्तीची पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या संदर्भात राजवाड्यांनी मीमांसा केली आहे. त्यात 'अधम', 'पशुतुल्य', 'द्विपाद' इत्यादी विशेषणे वापरून राजवाडे म्हणतात, एक अन्नदाता गेला म्हणजे दुसऱ्याच्या शोधात हे पोटभरू ताबडतोब सुटत. 'महिकावतीची बखर' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत हा विचार त्यांनी अधिक स्पष्ट केला आहे. "गेल्या तीन हजार वर्षांत हिंदुस्थानात जी देशी व परदेशी सरकारे होऊन गेली ती सर्व एक प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली व सरकार म्हणजे एक उपटसुंभ चोरांची टोळी आहे अशी हिंदू गावकऱ्यांची अंतस्थ प्रामाणिक समजूत आहे.” राष्ट्रवादी इतिहासकारांनी 'उदे उदे' केलेल्या १८५७च्या स्वातंत्र्यसमरातील बंडखोरांची सर्वसामान्य जनतेला किती धास्ती वाटत होती, याचे वर्णन इतिहासकाराचा अभिनिवेश नसलेल्या गोडसे भटजींनी आपल्या प्रवासवर्णनात आणि उमराव जानने आत्मचरित्रात सविस्तर केले आहे. शूद्रातिशूद्रांचा राणा जोतिबा फुले यांनी मुसलमानी आक्रमणाला सरळ 'विमोचन' असा शब्द वापरून गावातील सर्वसामान्यांची भावना व्यक्त केली आहे. इंग्रजांची राजवट ३६० निवडक अंतर्नाद आल्यानंतर ही, "सामाजिक प्रगतीला नि क्रांतीला प्रतिकूल ठरलेल्या ब्राह्मणी राज्यापेक्षा इंग्रज राज्य परवडले नानासाहेब पेशवे यशस्वी झाले असते तर ब्राह्मणांचे जातिश्रेष्ठत्व मानणारे, अन्यायी नि प्रतिगामी ब्राह्मणी राज्य पुन्हा महाराष्ट्रात आले असते, " अशी त्यांना भीती वाटत होती. जोतिबांची भावना हीच देवगिरीच्या आसपासच्या कुणब्या- शूद्रांची भावना असली पाहिजे. हीच भावना सर्वसाधारण प्रजेची त्यांच्या जवळच्या गढीत किंवा किल्ल्यावर राहणाऱ्या तथाकथित देशबांधव स्वधर्मीय सरदार- राजांबद्दल असली पाहिजे. रामदेवराय आणि अलाउद्दीन यांत फरक एवढाच, की पहिला दरवर्षी उभी पिके हक्काने काढून नेई, तर दुसरा कधी तरी एकदा येणार, रामदेवरायाच्या पराभवात प्रजेला थोडे तरी सुडाचे समाधान मिळत असले पाहिजे. रामदेवरायाकडून लुटले जायचे का अल्लाउद्दिनाकडून, असा एवढाच विकल्प रयतेपुढे असेल तर परकीय लुयरूच्या रूपाने मोचकच आला, अशी प्रजेची भावना का होऊ नये? शिवाय, दोन लुटारूंच्या लढाईत स्वतः मरण्यात त्याला का स्वारस्य वायवे? बंदा बहादुराच्या व त्यानंतरच्या पंजाबमधील लद्ययासंबंधी खुशवंतसिंग म्हणतात, की शिखांकडून किंवा मराठ्यांकडून लुटून घ्यायचे का अब्दालीकडून, एवढाच पर्याय पंजाबी शेतकऱ्यांसमोर असे आणि त्यांना त्यातल्या त्यात मुसलमानांकडून लुटले जाणे हा सौम्य पर्याय वाटे. राष्ट्रवादी इतिहासकारांनी मध्ययुगातही राष्ट्र ही संकल्पना अस्तित्वात होती असे गृहीत धरले आहे. पण असे राष्ट्र त्यावेळी अस्तित्वात नव्हते. जोतिबांच्या वेळीही नव्हते. "अठरा धान्यांची एकी होऊन त्याचे चरचरीत कोडबुळे म्हणजे एकमय लोक (Nation) कसे होऊ शकेल?" असा प्रश्न त्यांनी विचारला. (सार्वजनिक सत्यधर्म- 'महात्मा फुले समग्र वाङ्मय', संपादक धनंजय कीर व स. गं. मालशे, सुधारित तृतीयावृत्ती १९८८, पृ. ४२३) आजपर्यंतच्या इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये दरवर्षी एका दाण्याचे हजार दाणे होण्याचा जो गुणाकार होतो तो लुटण्याची आहे. लुटण्याची वेगवेगळी साधने वापरली गेली. दरोडेखोरी, सैन्याची लूट, राजांचा महसूल, गुलामगिरी, वेठबिगारी, सावकारी, जमीनदारी वगैरे, सर्व समाजाचा इतिहास हा शेतीला लुटण्याच्या साधनांच्या विकासाचा इतिहास असतो. अशा प्रकारे आपण भिन्न क्षेत्रांतील स्वयंस्फूर्त कार्याचा एकूण आढावा घेतला, तर त्या सर्वच क्षेत्रांमध्ये स्वयंस्फूर्त कार्याचा प्रयोग फसलेला आहे, हे आपल्या लक्षात येईल. असे असूनसुद्धा या क्षेत्रामध्ये अनेक लोक का शिरत असावेत ? खूपदा ज्या स्वरूपाचे काम तथाकथित लाभार्थीनाही नकोच असते, ज्या प्रकारच्या कार्यामध्ये स्वतःचेच व्यक्तिमत्त्व खुरटले जाते, त्या प्रकारच्या कार्यात ही मंडळी स्वतः का सामील होतात? अनेकदा स्वयंस्फूर्त कार्य हा एक कधीही न संपणारा बोगदा असतो. अशा बोगद्यात ही मंडळी का उतरतात? आपण हे सगळे करतो आहोत हे कशासाठी, यातून काय निष्पन्न होणार आहे, हा विचारसुद्धा