पान:निवडक अंतर्नाद.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांगताना त्या गावकऱ्यांना मोठा अभिमान वाटत होता. हा आदेश कोणाचा? तर त्या तथाकथित समाजसेवकाचा. असली ही त्यांची हुकूमशाही! आणि हे 'आदर्श गावे तयार करण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणार! 'आदर्श गाव' ही कल्पनाच बाष्फळ आहे. असा कधी कुठे समाज बदलतो का? आज एक गाव आदर्श बनले, उद्या दहा गावे आदर्श बनतील, परवा १०० गावे आदर्श बनतील, असा गुणाकार या लोकांनी गृहीतच धरलेला असतो. प्रत्यक्षात असले गुणाकार कधीच होत नाहीत. पण अशी खोटी स्वप्ने विकण्यात आमचे महापुरुष वस्ताद असतात! काही स्वयंस्फूर्त चळवळी समाजामध्ये नैतिकता वाढावी म्हणून काम करीत असतात. यात अनेक गांधीवादी संस्था आहेत. त्यांच्या मते आपल्या समस्यांचे कारण नैतिक मूल्यांचा हास किंवा भ्रष्टाचार हे आहे. या नैतिक प्रश्नाचा जरा खोलात जाऊन विचार करायला हवा, कारण आपल्या मुख्य विषयाशी ह्य थेट निगडित आहे. नीतिमत्तेच्या वेगवेगळ्या कल्पना काळांत, वेगवेगळ्या समाजांत बदलताना दिसतात. स्त्री सत्तेपासून स्त्रीदास्यापर्यंत, ब्रह्मचर्यापासून ते प्रौदसंमतीच्या स्वैराचारापर्यंत सर्व प्रकारचे नीतिनियम इतिहासात सापडतात. अर्थव्यवस्थेच्या विकासाबरोबर नी तिव्यवस्थाही बदलताना दिसते. शेतीप्रधान समाजाची धारणा औद्योगिक समाजासारखी नसते. खासगी मालमत्तेवर आधारलेले समाज आपली वेगळी नैतिकता तयार करतात. स्थिर समाजाचे नियम लढाया, उत्पात इत्यादींनी वारंवार ह्यदरे खाणाऱ्या समाजापेक्षा साहजिकच निराळे असतात. अर्थव्यवस्था बदलली, की नीतिमत्ताही बदलते. तरीही, बहुतांश समाजांनी मानलेल्या नियमांत एक सूत्र सापडते. स्वार्थांचा त्याग करून दुसऱ्याचे भले करण्यात काही एक मोठेपण आहे असे बहुतेक काळांत मानले गेले आहे. दुसऱ्यासाठी जगलास तर अमर झालास, स्वतः करता जगलास तर मेलास, अशा अर्थाची बोधवचने सतत वापरली जात असतात. 'संसार करावा नेटका' किंवा 'जोडोनिया धन उत्तम वेव्हारे ' यांसारखी अपवादात्मक वचने सोडल्यास संतवाणी ही वैराग्याचे, निःसंगत्वाचे आणि गरिबीचे गुणगान करण्याकरताच राबली आहे. तरीही औदार्याची मानसिकता परंपरेने चालूच राहते. परार्थाच्या महत्वाचे दुसरेही एक कारण असू शकेल. व्यावहारिक जगातील प्रत्यक्ष जगणे आणि व्यक्तीची जाहीर केली गेलेली तथाकथित तत्त्वे यांमध्ये प्रचंड दरी असते, व्यवहारात स्वार्थाने वागल्यानंतर शेतकरी आंदोलनात जितकी माणसे तुरुंगात गेली तितकी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य आंदोलनातही गेली नव्हती. असे असूनही मराठी साहित्यामध्ये शेतकरी आंदोलनाला काहीही स्थान मिळालेले नाही. जे दुर्मिळ त्याची किंमत जास्त, या मागणीपुरवठ्याच्या अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार परहितरत वर्तणुकीला अलोट महत्त्व मिळाले असावे. दुसऱ्याचे भले केले, कोणाला संतुष्ट केले म्हणजे तो आपला शत्रू बनणार नाही, निदान तेवढ्यापुरते तरी आपले जीवन निष्कंटक झाले असा पृथ्वीराज चव्हाणी विचारही या निःस्वार्थतेच्या तत्त्वज्ञानामागे असावा एखादा महमद घोरी उपटला शब्दांततरी परार्थाचे गुणगान गायले तर मनःशांती सुलभ होते; म्हणूनही परार्थाचे हे कौतुक असावे. एकेकाळी मुंबईतील माणसे बसच्या रांगेची शिस्त कटाक्षाने पाळत, एका बसमध्ये जागा मिळाली नाही, तर शांतपणे दुसरी येण्याची वाट पाहात थांबत. त्या काळी दिल्लीकर बस पकडताना पराकोटीची बेशिस्त आणि हुल्लड दाखवत असत. याचा अर्थ दिल्लीवाले कमी नीतिमान आहेत असा नाही. मुंबईच्या व्यवस्थेत एक बस गेली तरी दुसरी; ती नाही तरी त्यापुढची मिळण्याची जवळ जवळ खात्री वाटत असे. दिल्लीत तर तशी आशाही नसे. यामुळे दोघांच्या वर्तणुकीत फरक पडत असे. विष्यात दूर पाहण्याची शक्यता जास्त, मनुष्य नागड्या स्वार्थापासून दूर जातो. डोंगराच्या शिखरावरून पाहिले, विश्वाच्या व्यापकतेच्या तुलनेने स्वतःची, स्वतःच्या इच्छा-आकांक्षांची क्षुद्रता जाणवली, की काही काळ विचार बदलतात, तसाच हा प्रकार आहे. आजची भ्रांत आहे, उद्याची आशा नाही, कोण काय म्हणेल यांची चिंता करण्याचे कारण नाही अशा अवस्थेत नागड्या तात्कालिक स्वार्थाची उपज सहज होते. आजचा प्रश्न सुटला आहे, उद्याचा विचार करण्याची फुरसद आहे तेव्हा मनुष्य थोडा दूरचा विचार करून, दूरच्या फायद्यासाठी आजच्या स्वार्थाला मुरड घालू शकतो. परार्थ हा व्यापक स्वार्थच असतो. परार्थाचा हा अर्थ समजून घेऊन अवघ्या मानवजातीला एका मानसिक गुलामगिरीतून सोडवणे आवश्यक आहे खावे, प्यावे, उपभोगावे या नैसर्गिक प्राथमिक प्रेरणा, त्यांचे यथायोग्य पोषण झाले, तर सहभोगाचीही गोडी वाटू लागते, गावाबरोबर जगण्यात आनंद वाटू शकतो. राष्ट्राकरता प्राण देण्याची ऊर्मीही तयार होऊ शकते. त्यातही एका अलोट आनंदाचा अनुभव घेता येऊ शकतो. प्रचंड दुःख आणि यातना सोसून केवळ दुसऱ्याच्या भल्याकरता मी हे दिव्य करीत आहे असे कोणी म्हटले, की माझ्या मनात भीतीच्या घंटा वाजू लागतात. असे म्हणणारा निरोगी मनाचा नाही, याने काही लपवलेले आहे, या बोकेसंन्याशाच्या मनात काही क्षुद्र स्वार्थ आहे, असे मला वाटू लागते. मी हे माझ्या आनंदाकरिता करतो आहे, स्वार्थांकरिता करतो आहे, हे सांगण्यात कोणालाही शरम का वायवी? परार्थाची साखर पेरणारा क्षुद्र स्वार्थ साधतो. त्यापेक्षा स्वार्थी बना, जितक्या व्यापक अर्थांनी, जितक्या मार्गांनी आयुष्य परिपूर्ण करता येईल तितके करा. दुसऱ्याचे हक्क लाथाडू नका – परार्थ म्हणून नव्हे, निव्वळ स्वतःच्या आयुष्याची निवडक अंतर्नाद ३५७