पान:निवडक अंतर्नाद.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शूद्रांच्या गुलामगिरीच्या सूत्रावर प्रचंड प्रतिभेने इतिहासाचा एक प्रपंच त्यांनी उभा केला. पण विद्वन्मान्य इतिहासकारांत आज जोतिबांना काहीच मान्यता नाही. स्वयंस्फूर्त कार्यातील बरीच मंडळी महिला आंदोलनात सहभागी आहेत. त्या महिला आंदोलनाची परिस्थिती काय आहे? जागोजागी भगिनीमंडळे, स्त्री- संघर्ष समित्या उगवतात आणि स्त्री- साहाय्याची काही जुजबी कामे करीत राहतात. आपल्या कर्तबगारीला व्यापक समाजात पुरेसा वाव नाही अशी जाणीव झाली, की त्या स्त्रिया महिला चळवळीकडे वळतात; भगिनीमंडळ किंवा समिती स्थापतात. मोठमोठ्या मान्यवर महिला संघटनांत लब्धप्रतिष्ठित स्त्रियांनी महत्त्वाची सारी पदे अडवलेली असतात. कोणत्याही कार्यक्रमात मिरवायला त्यांनाच मिळते. नाव त्यांचेच होते. त्यामुळे अशा संस्थांत नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांना आत शिरायला फारसा वाव नसतो. अनेकदा होते असे, की महिला संघटनांतील स्त्रीचे स्थान तिच्या नवऱ्याच्या समाजातील प्रतिष्ठेवर आणि आर्थिक संपन्नतेवर अवलंबून असते. म्हणजे तर, कर्तृत्वाने नाव मिळविण्याचा काही करून दाखविण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही तेव्हा, जी ती स्त्री एक नवी पाटी लावून आपली एक संस्था उभी करू पाहते, अनेक घरांत नवराबायकोचे, सासूसुनेचे, नणंदाभावजयांचे पटत नाही; काही ठिकाणी त्या वितुष्टांना मोठे विक्राळ स्वरूप येते. अशी अनेक प्रकरणे प्रत्येक समाजात, हर वस्तीत, दररोज घडतच असतात. असे काही घडले, की जवळपासच्या महिला संघटनांतील काही बाया असल्या ठिकाणी जमा होतात, नवविवाहित सुनेची बाजू न्याय्य आहे असे गृहीत धरून कामाला लागतात. पोलिसांत तक्रार नोंदवतात, मोर्चे काढतात, निदर्शने करतात. काही वेळा थोडेफार यश मिळते, बहुधा हाती फारसे काही लागतच नाही. अशा प्रकरणांचा पाठपुरावा करायचा म्हणजे मोठी ताकद, साधने, संयम आणि धैर्य लागते. एक प्रकरण निकालात निघण्याआधी दहा नवीन प्रकरणे उभी राहतात. अगदी उत्साही, तळमळीच्या कार्यकर्त्यांची ही दमछाक होऊन जाते. पतपेढी, स्त्रियांचा वेगळा साखरकारखाना असे अनेक क्षेत्रांत 'जनाना डब्बे' करण्यात अनेक संस्था गुंतल्या आहेत. खरे म्हणजे, असल्या प्रकरणांत महिला आंदोलनांचा काही संबंध नाही. स्त्रीवर जुलूम, अन्याय करणारे केवळ पुरुषच असतात असे नाही; बहुसंख्य प्रकरणी एका बाजूस सून तर दुसऱ्या बाजूस सासू आणि नणंद इत्यादी उभे ठाकलेले असतात. सून ही स्त्री खरी, पण सासू आणि नणंद याही स्त्रियाच, याखेरीज स्त्रियांची वेगळी महिला बँक, स्त्रियांची वेगळी नवयाने टाकून दिलेल्या विधवा, कुमारी माता, अपंग स्त्रिया यांच्याकरिता शिक्षणाची सोय करणे, त्यांना काही आरोग्यासेवा देणे, त्यांच्या चरितार्थासाठी काही उद्योगधंद्यांची सोय करणे, त्यांना स्वावलंबी बनविणे अशा तऱ्हेची कामे करता येतात. पण, गुजराथेतील इला भट यांच्या सेवा या संस्थेसारखे काही अपवाद सोडले तर इतरांना त्यांत फारसे यश मिळत नाही. अशा कामांना प्रचंड मेहनत, चिकाटी, व्यवस्थापन कौशल्य आणि व्यवसायबुद्धी यांची गरज असते. स्त्रियांचा प्रश्न हा अनेक संस्थांत, विश्वाविद्यालयांत • अभ्यासाचा स्वतंत्र विषय म्हणून मान्यताप्राप्त झाला आहे त्यामुळे स्त्रियांच्या परिषदा भरवणे, परिसंवाद घडवून आणणे हे काम गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रचंड जोमाने चालू आहे महिला कार्यकर्त्या राज्यपातळीवरील परिसंवादांत आधी मान्यता पावतात, मग हळूहळू राष्ट्रीय पातळीवर त्या परिसंवाद करू लागतात आणि शेवटची पायरी म्हणजे, वर्षांतून दोन-चार वेळा वेगवेगळ्या देशांत घडणाऱ्या परिसंवादांतील जागाही भूषवू लागतात. महिला चळवळीतील कार्यकर्त्यांचे या दृष्टीने तीन संच बनतात : आगगाडीसंच, विमानसंच आणि जेटसंच! या सगळ्यातून स्त्रीप्रश्नाविषयीची खरी कळकळ ओसरू लागली, ती एक 'करीअर' बनली, वेगवेगळ्या क्षेत्रांत आपापली कर्तबगारी दाखविणाऱ्या स्त्रिया होत्या. कोणी वकील होत्या, कोणी डॉक्टर; कोणी लष्करात जात होत्या तर कोणी वैमानिक बनत होत्या; कोणी साहसाची कामे करीत होत्या तर कोणी कलाक्षेत्रात चमकत होत्या. अनेक उद्योजक महिलांनी कारखानदारी, व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतही, आपल्या स्त्रीपणाचा कोणताही आधार न घेता, मोठी कामगिरी करून दाखवली. साऱ्या स्त्रीजातीस ललामभूत असलेल्या या दुर्गा स्त्री-चळवळीपासून दूर राहिल्या आणि स्त्री- चळवळ वावदूक मुखंडींच्या हाती गेली. कौटुंबिक वितुष्टांची ही प्रकरणे स्त्रीचळवळीच्या विषयपत्रिकेवर असणे कितपत योग्य आहे? आत्महत्या असो, खून असो, शारीरिक छळाचा प्रश्न असो; ही सारी कृत्ये गुन्हेगारीची आहेत. दंडविधानात त्यासंबंधी यथायोग्य तरतुदी आहेत. असल्या प्रकरणांत जाणकार तज्ज्ञांनी बारकाईने तपास खरे बघायला गेले तर स्त्रियांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न स्त्री- मुक्तीच्या चळवळीमुळे नव्हे तर इतर अनेक कारणांमुळे सुटलेले आहेत. उदाहरणार्थ, स्त्री शिक्षणाला सावित्रीबाई फुले आणि महर्षी कर्वे यांच्या कार्यामुळे जेवढी प्रेरणा मिळाली, त्याहून जास्त प्रेरणा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आलेल्या रेशनिंगमुळे मिळाली. • रेशनिंग खात्यात शिकलेल्या बायकांना नोकऱ्या मिळू लागल्या, या करणे महत्वाचे असते. असले तपास हे काही हौशागवशा नोकऱ्यांमुळे आर्थिक उत्पन्नाचे साधन बायकांना प्रथमच उपलब्ध कार्यकर्त्यांचे काम नव्हे. झाले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बायकांना शिकू द्यायला सुरुवात झाली. स्त्रियांचे जीवन सुखकर करण्यामध्ये सगळ्या चळवळींपेक्षा कितीतरी जास्त वाटा हा आधुनिक तंत्रज्ञानाने उचलला आहे शिवणयंत्र, पिठाची गिरणी, मिक्सर, वॉशिंग मशीन यांमुळे सर्वसामान्य स्त्रीचे जीवन जितके सुखकर झाले, तितके कुठल्याही चळवळीमुळे कधीच झाले नसते. निवडक अंतर्नाद ३५५