पान:निवडक अंतर्नाद.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जन्म

शिक्षण : नोकरी : पुस्तके : } शेत माझी पिढी । शेत माझा वंश । रक्तामध्ये अंश । मातीचाच ॥ अशा शेतामधी। पेटला वणवा । पाण्याची वानवा । आधीचीच ॥ पडलोय. परंतु माझे आप्त त्या आगीतच अडकलेत आणि माझा आत्मा त्यांच्यात अडकलाय. म्हणून पळालो । शेतातून धुमाट। नोकरीशी गाठ बांधली मी ॥ डोळ्याने पाहतो । जळणारे शेत । मनातला हेत । मनातच ॥ ५.२.१९६२ एम.ए., एम.फिल. (मराठी), डॉ. आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद. ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर, जि. परभणी. १) पीकपाणी (कवितासंग्रह) १९८९ २) आम्ही काबाडाचे धनी (दीर्घ कविता) १९९२ कवितांना सजवणाऱ्या प्रतिमांपुरता मी केला नाही फक्त तुझा वापर दिलीच असतीस रोटी घुमनं घेऊन बसलो असतो तर ३) दूर राहिला गाव (कवितासंग्रह) १९९४ ४) गाई घरा आल्या (ललित) १९९७ ५) लळा (ललित) २००० ६) भिंगुळवाणा (कादंबरी) १९९६ मला खरोखरच शेतात राबायचं होतं. मातीशी एकरूप व्हायचं ह्येतं, पण ते होणं नव्हतं. तेच मी कवितेतून करत आहे. म्हणून शेतशिवारांचे संदर्भ फक्त प्रतिमांपुरते माझ्या कवितेत येत नाहीत, तर प्रत्यक्ष कवितेचा विषय होऊनच येतात. कुठल्या ऊर्मीनं कुणास ठाऊक मी वेगळी व्यवस्था केली अनवाणी कुरवाळता न आलेली देकळं आता स्वप्नात येतात स्वप्नातच त्यावर हळदकुंकू वाहतो कशी असावी कवितेची भाषा ? हा मोठा गहन प्रश्न आहे. प्रत्येक कविता लिहिताना या प्रश्नानं मला सतावलं आहे थोडा प्रयत्न केला तर कविता गहन, गूढ आणि अवघड करता येते. थोर कवी म्हणून मिरवायला ही सोपी गोष्ट आहे. परंतु मला नेहमीच वाटत आलेलं आहे की, कवितेनं सामान्य माणसाची नाळ न तोडता स्वतःला आखीव-रेखीव शिल्प बनवावं. आपल्या प्रतिभेचा उपयोग कुणाला हुलकावण्या देण्यासाठी, फसवण्यासाठी, स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी करणं, हा मला प्रतिभेचा अपमान वाटतो. ज्ञानेश्वर, तुकारामांनी असं कधी केलं नाही. करंदीकर, चित्रे, सुर्वे असं कधी करत ३४ निवडक अंतर्नाद नाहीत. अशी वाड्मयीन बुवाबाजी करणारे लोक मला भोंदू वाटतात. तरी कवितेचं शिल्प घोटीव असावं हे तर खरंच या शिल्पासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे भाषा हा महत्त्वाचा घटक आहे. प्रमाणभाषेत चांगली कविता लिहिता येईल यावर माझा विश्वास नाही. कवितेची भाषा हा आजचा सगळ्यात मोठा कळीचा प्रश्न आहे. मास्तर मास्तर तिरकोंबडा म्हणत कवितेची भाषा घेऊन पोरं रानावनात पळून गेली पडक्या भिंतीच्या मालातच नवी भिंत बांधावी तशी मास्तरांनी धरून आणलेल्या पोरांना शिकवलेली भाषा सामोरं गेल्याशिवाय रानावनातल्या पोरासोरांना कवितेवरचा रुसवा नाही सोडणार पाठमोरी भाषा सुरुवातीच्या काळात व्यासपीठावरून जाहीर कवितावाचन करण्याच्या मी विरोधात होतो. माझं पहिलं पुस्तक प्रकाशित होऊन आणि गाजूनही तीन वर्षं उलटली, तरी मी जाहीर कवितावाचन फारसा करीत नसे. परंतु १९९३ साली सातारा इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शंकर सारडा यांनी मला कवितावाचनासाठी प्रथमच आणि आग्रहाने उभं केलं. भीतभीतच मी 'जल्म' नावाची माझी कविता म्हटली. उपस्थित पंधरा हजार रसिकांनी ती इतकी डोक्यावर घेतली की, मला ती कविता पुन्हा म्हणावी लागली. माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव थरारक राहिला, राम गोसावी यांच्यासारख्या अंध कवीने 'आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग' अशी या प्रसंगाची नोंद करून ठेवली. याआधी संमेलनातून गाजायच्या त्या शृंगारिक किंवा व्यंग कविता. परंतु या संमेलनापासून यात बदल झाला आणि व्यासपीठावरून आत्मविश्वासाने गंभीर कविताही सादर होऊ लागल्या, सातारा, परभणी आणि अहमदनगर इथे झालेल्या अ.