पान:निवडक अंतर्नाद.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या गोष्टी अमलात आणण्याचा काँग्रेसचं धोरण चूक नव्हतं. (फक्त मार्क्सवाद्यांचे मात्र काँग्रेसच्या धोरणाबाबत अगदी मुळातून मतभेद होते.) त्यांचा अंमल चुकीचा होता. प्रश्न तत्त्वाचा कमी होता, व्यवहाराचा जास्त होता. जेपींना आंदोलनाच्या नेतृत्वपदी का बसवण्यात आलं? भारतीय मानस विचारांचे प्रभाव कमी स्वीकारतं, त्याला व्यक्तीची ओढ, आकर्षण फार असतं. गांधींचे विचार काय होते व ते योग्य होते की नाही याचा विचार करणारे गांधीवादी कमीच. गांधींच्या प्रभावाखाली बरीच माणसं गांधींच्या व्यक्तिगत वैशिष्ट्यांमुळेच गोळा झालेली. माणूस संत आहे, माणूस चांगला आहे, माणूस स्वभावानं गरीब आहे, माणूस साधा राहतो, माणूस पैसे खात नाही, माणूस वनौषधी घेतो, माणूस कमी अन्न व कपड्यांवर राहतो वगैरेबद्दलचं फार आकर्षण त्यांच्या विचारांची तपासणी करण्याच्या भानगडीत माणसं पडली नाहीत, तेच नेहरूंचं, त्यांचं राजबिंडं रूप, त्यांची श्रीमती, त्यांची भाषा इत्यादींचं आकर्षण जास्त अनेकांच्या बाबतीत तेच जेपींच्या बाबतीतही तेच. त्यांची ऋजुता, त्यांचा हळुवारपणा, त्यांचं लोभस व शांत दिसणं, मृदुता, अनाग्रहीपणा इत्यादी गोष्टी अनेकांना आकर्षून घेत. काही होत नसलं, परिस्थिती निराशाजनक असली की भारतीय समाजाला आदर्श पुरुषाची भूक लागते. एखादा अवतार निर्माण होईल आणि सारं काही ठीक होईल असं त्याला वाटतं. थेट चाणक्य वगैरे कोणीतरी येईल, निदान शिवाजीचा नवा अवतार तरी होईल असं त्याला वाटतं. त्यातलं काहीच झालं नाही की हाताशी असलेल्या माणसांमध्ये कोण बरा माणूस आहे याचा शोध भारतीय माणूस व्याकूळ होऊन घेऊ लागतो. परिस्थितीची मूळ कारणं शोधणं, त्यावर काही मूलगामी उपाय शोधणं, मुख्य म्हणजे आपल्या आपण काही गोष्टी करणं याकडे समाज वळत नाही. १९७३-७४ सालातही तसंच झालं. थोर माणसाचा शोध सुरू झाला. त्यांना जेपी सापडले. सज्जन माणूस, भानगडी नाहीत, पैसे खाल्लेले नाहीत, बायांच्या भानगडी नाहीत, दारू नाही, जावई नातेवाइकांच्या भानगडी नाहीत. बस, आणखी काय पाहिजे! स्वातंत्र्यचळवळही बरीचशी भावनात्मकच होती. सुखानं जगणं ही गोष्ट जगण्याच्या केंद्रस्थानी मानली गेली नाही, पुढारी व माणसं भावनेच्या आहारी जाऊनच विचार करत होती. संस्कृती, भाषा, धर्म, स्नानसंध्येची सोय, भारतीयत्व, हिंदुत्व, आर्यत्व यांची चिंता जास्त होती. जगाच्या बाजारात उतरून आपलं भलं करण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार फारसा नव्हता. एखादा टाटा तेवढा अपवाद, विज्ञान- तंत्रज्ञानातल्या संशोधनाकडे लक्ष नव्हतं. ज्ञानाचा उपयोग दररोजचं जगणं समृद्ध व सुखी करण्यासाठी असतो असं माणसं मानत नव्हती. गांधीजीसुद्धा याचा परिणाम म्हणून ऐहिक सुखाला वंचित झालेल्यांची बहुसंख्या असलेला समाज, असं आपलं रूप झालं होतं. यातून वाट कशी काढणार? लोकांना स्वतः विचार करायची सवय नाही, सवड नाही. ३४२ निवडक अंतर्नाद मी पत्रकार म्हणून संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनात खूप हिंडलो, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल इत्यादी सर्व ठिकाणी जेपींच्या सभांना गेलो. एक मास हिस्टेरिया होता. भारलेल्या वातावरणाचा प्रभाव माझ्यावरही होता, गंमत असते. एखाद्या अनोळखी माणसाच्या अंत्ययात्रेला गेलो की काय होतं? तिथं जमा झालेले लोक दुःखानं व्याकूळ असतात. रडत असतात. आपल्याला तर मेलेला माणूस जेमतेम माहीत असतो. तरीही अंत्ययात्रेत व शेवटची विधी चालतात तेव्हा वातावरण असं असतं की आपल्यालाही रडू येतं, गळा दाटून येतो. तसंच चळवळींमध्ये बहुतेक वेळा होतं. संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनाचा प्रभाव, जेपींचा प्रभावही, काहीसा तसाच, संपूर्ण क्रांतीच्या चळवळीवर लिहिण्यासाठी मी देशभर हिंडलो. महाराष्ट्रातल्या अनेक दैनिक - साप्ताहिकांत वार्तापत्रं लिहिली. अहमदाबादच्या गल्लीबोळातल्या घटना मी पाहत होतो, दुमका जिल्ह्यातल्या खेड्यात काय घडत होतं ते मी पाह्यत होतो. आणि मध्ये मध्ये पाटण्यात जाऊन जेपींच्या पातळीवर घडणाऱ्या घटनाही तपासत होतो. बंगाल, महाराष्ट्र, दिल्ली इत्यादी ठिकाणी काय चाललं आहे ते अभ्यासत होतो, तळातले लोक, जेपींच्या आसपास वावरणारे कार्यकर्ते, खेड्यातली तसेच शहरातली सामान्य माणसं, सरकारी माणसं, पुढारी, थोर माणसाचा शोध सुरू झाला. त्यांना जेपी सापडले. सज्जन माणूस, भानगडी नाहीत, पैसे खाल्लेले नाहीत, बायांच्या भानगडी नाहीत, दारू नाही, जावई नातेवाइकांच्या भानगडी नाहीत. बस, आणखी काय पाहिजे! पत्रकार, अशा नाना प्रकारच्या माणसांशी माझा संपर्क होता. चळवळ संपून जनता सरकार स्थापन झालं. त्यानंतरही महाराष्ट्र आणि बिहारमधल्या खेड्यांतून मी हिंडलो आणि नव्या सरकारच्या हातून काय घडतंय त्याची चाचपणी केली. चळवळीत सक्रिय भाग घेणाऱ्या आणि चळवळीला बाहेरून पाठिंबा-सानुभूती असणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना मी भेटत असे, त्यांच्याशी घनघोर चर्चा करत असे. ही सगळी माणसं कानावर पडतं त्यावर आणि रस्त्यावर जे काही दिसतं त्यावर विसंबून राहणारी. बस्स. यापलीकडे फार विचार करण्याची सवय व सवड त्यांना नाही. वर्तमानपत्रातून जे समोर येतं, आसपासच्या लोकांच्याकडून जे कानावर पडतं त्यावरून माणसं आपापली मतं बनवतात, खोलात जाणं, अभ्यास करणं हे त्यांचं काम नाही, तेवढा वेळही त्यांच्याजवळ नसतो. ही सारी माणसं भारावलेली असतात. गांधी, टिळक, जेपी, नेहरू, आंबेडकर अशांना देशानं मोठं मानलं ते वरील पद्धतीनं. मी लोकांना भेटत असे, तेव्हा माझ्या लक्षात येई की संपूर्ण