पान:निवडक अंतर्नाद.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- असतं, म्हणजे एकदा 'रवींद्रनाथ अँड द फेमिनीन' या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्यासोबत अर्पिता या गायिकेने रवींद्रनाथांची दोन अवीट गाणी गायली 'अॅकला चालो रे' आणि 'चारुलता' मुळे आपल्याला ठाऊक झालेलं 'आमी चीनी गो चीनी तोमारो ओगो बिदेशिनी', (दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध सरोदवादक अमजद अली खान यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं या लंचटाइममध्ये, आयान व अमान या त्यांच्या सुपुत्रांचं सरोदवादनही झालं त्यानंतर ) फेस्टिवलच्या एक संचालक नमिता गोखले यांनी या वेळी लेखिका मालाश्री लाल यांच्याशी गप्पा मारल्या, नमिता गोखले मूळच्या उत्तराखंडमधल्या विवाहानंतर गोखले झालेल्या त्या लेखिका आहेतच, खेरीज जेएलएफ सुरू करण्यात त्यांचा मोठा हात आहे. २००६ मध्ये जेएलएफ सुरू झाल्यापासून दरवर्षी नमिता आयोजनात बुडालेल्या असतात. प्रत्येक वर्षी काही सत्रांतून त्या मुलाखतीही घेतात. यंदा जेएलएफ संपल्यानंतर त्या एका पत्रकाराला म्हणाल्याचं वाचलं होतं, की 'पुढच्या वर्षी काय काय करायचं याच्या कल्पना डोक्यात उड्या मारू लागल्या आहेत आत्तापासूनच.' विल्यम डॅलरिम्पल हा ब्रिटिश इतिहासकार जेएलएफचा दुसरा संचालक, अत्यंत उत्साही, सतत इकडेतिकडे दिसत राहणारा. मागच्या वेळी एका भरगच्च कार्यक्रमाला तो चवक मंचाच्या समोरच्या भागात जमिनीवर मांडी घालून बसून ऐकत होता. (मराठी साहित्य संमेलनात आयोजक किंवा स्वागताध्यक्ष असे जमिनीवर बसलेत, असं चित्र डोळ्यांसमोर येतंय का ? ) फ्रंट लॉन प्रशस्त असल्याने अत्यंत लोकप्रिय लेखक वा कलाकारांचे कार्यक्रम बहुतकरून तिथेच होतात. यंदा व्ही. एस. नायपॉल, शशी थरूर, राजदीप सरदेसाई, रवीश कुमार, वहिदा रहमान, जावेद अख्तर आणि अर्थातच माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या सत्रांना सर्वाधिक गर्दी होती. राजदीप व रवीश दोघे टिव्हीवरील सेलेब्रिटी राजदीप इंग्रजी बोलणाऱ्या उच्च मध्यमवर्गीयांमध्ये लोकप्रिय तर रवीश हा हिंदीभाषकांमध्ये स्टार आहे. अनेक पत्रकार त्याला आदर्श मानतात, त्यामुळे NDTV इंडियावरील त्याचा शो जसा लोकप्रिय आहे, तशीच त्याची इथली उपस्थितीही खूप ऊर्जादायी असते. यंदा मला त्याचं सत्र नाही पाहता आलं, पण मागच्या वेळी दोन सत्रं ऐकली होती. त्याचं किंचित बिहारी लहेजा असलेलं हिंदी, काहीसा टीपेचा आवाज आणि मार्मिक बोलणं यांमुळे तो ऐकत राहावासा वाटतो. विषयांतर होईल थोडं, पण मागच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी त्याने उत्तर प्रदेशात महिनाभर राहून केलेलं वार्तांकन व त्यावर आधारित लिहिलेला ब्लॉग आवर्जून पाह्यवं/ वाचावं असं नक्की आहे तो राजकारण्यांविषयी बोलत नाही, तर राजकारणाविषयी, मतदारांविषयी, माणसांविषयी बोलतो हा त्याचा मोठेपणा, जेएलएफचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा फेस्ट पूर्णपणे मोफत आहे. झी, गूगल, ब्रिटिश एअरवेज, अॅमॅझॉन, इन, यूएन विमेन, डीएनए, दैनिक भास्कर, रेडिओ मिर्ची, पत्रिका ग्रूप, कोकाकोला, पर्यटन विभाग वगैरेंसारख्या तगड्या प्रायोजकांमुळेच हे साध्य होतं. परंतु म्हणून एकही पैसा न देता पाच दिवसांत खूप महत्त्वाचा असामान्य अनुभव एक सामान्य माणूस घेऊ शकतो, तेही सुस्थितीत, हे मान्य करावंच लागतं. सुस्थितीत म्हणजे काय, तर छान थंडी, बसायला चांगल्या खुर्च्या, डोक्यावर मांडव, रंगबिरंगी नेत्रसुखद सजावट, आणि अतिशय स्वच्छ व पाण्याचा भरपूर पुरवठा असलेली स्वच्छतागृहूं प्यायचं पाणी फुकट मिळतं. जागोजागी कचरा यकायची सोय असते, आणि तो उचलूनही लगेच नेला जातो. (आपण जमलोय ते कुणाचं तरी घर आहे, आणि त्यामुळे ते नीट ठेवून जसंच्या तसं त्या मालकाला परत करायचं आहे, याची आठवण प्रत्येक मांडवातला कार्यकर्ता करून देत असतो. डिग्गी पॅलेस हे एक निवासस्थान आहे. खेरीज तिथे हॉटेलही आहे.) आणखी काय हवं एका रसिकाला! तिथे लावलेल्या स्टॉल्सवरचं खाणंपिणं महाग असतं, पण आपण आपला डबा नेऊ शकतोच की सोबत. तिथे जाण्याचा मुख्य उद्देश असतो, आवडत्या लेखक/कवीला ऐकायचं, तो अत्यंत सहज सिद्ध होतो. आणि बाकीच्या गोष्टीही सुखावणाऱ्याच असतात, पुन्हापुन्हा तिथे जावंसं वाटायला लावणाऱ्या असतात. आपल्याकडच्या साहित्य संमेलनाची यांपैकी कुठल्याच बाबतीत तुलना होऊ शकत नाही, हे मोठंच दुर्दैव आपलं खोड काढायचीच झाली तर ती पुस्तक प्रदर्शनाबाबत काढता येईल. जेएलएफमधलं पुस्तक प्रदर्शन यदा ॲमॅझॉन, इन या वेबसाइटने प्रायोजित केलेलं होतं. यापूर्वी दिल्लीतील एका प्रतिष्ठित पुस्तकांच्या दुकानानेच ते आयोजित केलेलं होतं. जेएलएफमध्ये जे लेखक/कवी सहभागी असतात, त्यांचीच पुस्तकं या प्रदर्शनात उपलब्ध असतात, त्यांची संख्या साहजिकच मर्यादित असते. 'पेंग्विन' चा एक स्टॉल होता, परंतु त्यातही फार पुस्तकं नव्हती, 'प्रथम'चा स्टॉल नेहमी असतो. खेरीज या पुस्तकांवर सूटही नसते, असलीच तर अगदी क्षुल्लक, त्यामुळे मराठी साहित्य संमेलनात पुस्तक विक्री हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो, तसा तो जेएलएफमध्ये नसतो, परंतु, असं असूनही प्रदर्शनात गर्दी होते, बरीच पुस्तकं विकली जातात. इथे ते पुस्तक लिहिणारा लेखक/कवी उपस्थित असतो, त्यामुळे त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी प्रचंड झुंबड असते. यंदा तर ही गर्दी लक्षात घेऊन एक वेगळी जागा स्वाक्षरी सोहळ्यासाठी ठेवण्यात आली होती. आता थोडं यंदा मी जे ऐकलं त्याविषयी. यंदा दुसऱ्या दिवशी पाऊस पडल्याने बरीच गैरसोय झाली. आम्हीदेखील छत्री नेली नव्हती सोबत, त्यामुळे हॉटेलवरून डिग्गी पॅलेसला पोचणंही मुश्कील होतं. त्यात दुसरा दिवस बराचसा वाया गेला. आयोजकांचीही प्रचंड गडबड उडाली. परंतु तरीही एकही सत्र रद्द केलं गेलं नाही, हे विशेष. दोनच बंदिस्त जागा असल्याने सर्व सत्रं तिथेच, परंतु अर्ध्या तासाची झाली. यंदा एकमेव मराठी सत्र होतं, 'आयदान' या उर्मिला पवारलिखित आत्मचरित्रावर आधारित सुषमा देशपांडे यांनी बसवलेल्या नाटकाच्या निमित्ताने या दोघी उपस्थित होत्या. हिंदी वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाची चांगली दखल दुसऱ्या दिवशी घेतली. दोन वर्षांपूर्वी भालचंद्र नेमाडे यांनी 'कोसला' च्या इंग्रजी अनुवादातील काही भाग वाचून दाखवला होता. जीत थविल यांनी त्यांना बोलतं केलं होतं. पहिलं सत्र ऐकलं ते प्रवासलेखकांचं - travel writers प्रवासलेखन हा प्रकार मराठीत हल्ली फारसा दिसत नाही. गोडसेभटजींचं माझा प्रवास याच जातकुळीतलं खरं तर, अनिल अवचटांनी या प्रकारचं लिखाण केलं बरंच, पण नवीन निवडक अंतर्नाद ३२१