पान:निवडक अंतर्नाद.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाडगावकरांची ही बोलगाणी रंजनाच्या गरजा भागवतात म्हणून लोकप्रिय नाहीत. आजचा तरुण ज्या प्रकारचे जीवन जगू पाहतो आहे, ते जगण्यासाठीचा शहाणपणा त्याला देऊन ते जगण्यातील त्याचा आत्मविश्वास जागृत करतात म्हणून ती लोकप्रिय झाली आहेत. प्रेम करण्याचा सल्ला 'आपलं गाणं आपणच गावं' या आणि यांसारख्या कवितांतून दिला गेला आहे. माणसाच्या नैसर्गिक स्वातंत्र्यावर बंधने घालणाऱ्या मानवनिर्मित संस्थांना आणि व्यवस्थांना विरोध हा रोमँटिसिझमचा महत्त्वाचा भाग आहे. पाडगावकरांच्या कवितेतून तो प्रारंभापासून व्यक्त झाला आहे 'बोलगाणी' या संग्रहातही तो अपरिहार्यपणे प्रकट झाला आहे. याचे कारण नैसर्गिक प्रेरणांच्या तृप्तीला महत्त्व असलेल्या व्यक्तिकेंद्रित जीवनपद्धतीचा पुरस्कार करून अशा जीवनाचे शहाणपण देणारी ही कविता आहे. अशी कविता पूर्वप्रस्थापित असलेल्या आणि मानवावर लादल्या गेलेल्या जीवनपद्धतीला, जीवनव्यवस्थांना नकार देणारीच असणार, 'बोलगाणी' मधल्या 'अगदी नक्की डोकं फिरलं' आणि 'ह्येय्योचं गाणं' यांत हा विरोध स्पष्टपणे व्यक्त केला गेला आहे. कविता, किंबहुना एकूण वाड्मय हे अनेक हेतूंच्या सिद्धीसाठी लिहिले जाते. ते केवळ कलाप्रत्यय देण्यासाठीच लिहिले जावे आणि त्यामागे कलाप्रत्ययाशिवाय अन्य हेतू नसावा, असा आग्रह धरता येत नाही. पाडगावकरांनी आपली काव्यनिर्मिती विविध हेतूंसाठी केली. कला कोणत्याही उद्दिष्टासाठी लिहिलेली असो, तिची कलात्मकता ही कलामूल्यांच्या साह्याने ठरत असते. हे त्यांच्या 'बोलगाण्यां' नाही लागू आहे. त्यांची सर्वच 'बोलगाणी' ही कलाकृती ठरणार नाही, असे जरी असले तरी या संग्रहातील 'इतक्या दुरून आलात तर यासारखी बोलगाणी, त्यांच्या छोट्या स्वरूपाच्या कविता आणि प्रेमानुभव साकार करणाऱ्या कविता एकाच वेळी शहाणपणाही शिकवतात आणि त्या चांगल्या कलाकृतीही असतात. पाडगावकरांच्या कवितेचे खरे सामर्थ्य त्यांच्या वैणिक जातीच्या कवितेत आहे. बोलगाण्यांपैकी अनेक कविता वैणिकतेची अनुभूती देणाऱ्या कविता आहेत. 'मन कसं धुंद आहे', 'एकटं ● प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक आहे. • थोड्यात गोडी आणि फारात लबाडी. • लाड करणारी आई असते म्हणून मुलाचे बोबडे बोलणे शोभते, क्षमाशील परमेश्वर आहे म्हणून मनुष्याचे अज्ञान शोभते. • उत्तम कल्पनांचे विपर्यास हीन असतात. ताज्या फळासारखे आरोग्यकारक अत्र नाही, तर कुजलेल्या फळासारखे आरोग्यनाशकही नाही. असावसं वाटतं, अशा काही कवितांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. वैणिक जातीची त्यांची खास प्रतिमासृष्टी अनेक बोलगाण्यांत भेटते आणि पाडगावकरी प्रतिभेचा प्रत्यय देते. वैणिक स्वरूपाची प्रतिमा वाचकमनात केवळ एक अनामिक, शब्दातीत भावाचे संक्रमण करून त्याचा प्रत्यय घडवते. अशा प्रतिमांना संकल्पनांचा आधार नसतो. त्यामुळे या प्रतिमांचा अर्थ सांगताच येत नाही, त्यांचे स्पष्टीकरण देता येत नाही. ती केवळ अनुभवता येते. चांगली संकल्पनाधिष्ठित प्रतिमा अर्थांचे अनेक पदर प्रसवीत असते. परंतु वैणिक जातीची प्रतिमा मात्र सरळपणे एक मनोवस्था वाचकाच्या मनात संक्रात करते. 'नसलेल्या आजोबाचं असलेलं गाणं' यातला नातू जगात नसलेल्या आजोबांबद्दल जेव्हा 'आजोबांच्या खोलीत आता । धुकं... धुकं... धुकं...' असे म्हणतो तेव्हा त्याची मनोवस्था आपल्याला अनुभवायला येते. परंतु या प्रतिमेच्या अर्थाचे स्पष्टीकरण देता येत नाही. 'मन कसं धुंद आ या कवितेतल्या 'तुझं माझं असणं हीच भाषा आहे!' ही आणि 'मी आज | तुझ्यावरचा कवितेचा हळुवार छंद आहे ।' ही प्रतिमाही या संदर्भात उल्लेखता येईल. पाडगावकरांच्या गीतांनाही या प्रकारच्या प्रतिमासृष्टीने एक वेगळाच काव्यात्म दर्जा मिळवून दिला आहे पाडगावकरांची ही बोलगाणी रंजनाच्या गरजा भागवतात म्हणून लोकप्रिय नाहीत. आजचा तरुण ज्या प्रकारचे जीवन जगू पाहतो आहे, ते जगण्यासाठीचा शहाणपणा त्याला देऊन ते जगण्यातील त्याचा आत्मविश्वास जागृत करतात म्हणून ती लोकप्रिय झाली आहेत. ही गाणी वाचण्यापेक्षा ती ऐकणे अधिक अर्थपूर्ण असल्यामुळे ती पाडगावकरांच्या तोंडून ऐकण्यासाठी तरुण गर्दी करतात. या 'बोलगाण्यां' मुळे आधुनिक मराठी संस्कृतीची गरज जशी भागवली गेली आहे तसेच मराठी कविताही संपन्न झाली आहे. (मूळच्या अधिक विस्तृत हस्तलिखिताचा संक्षेपित भाग) (मार्च २०१५ ) • स्वधर्म सहजप्राप्त असतो. मुलाला दूध पाजण्याचा धर्म आई मनुस्मृतीतून शिकत नाही. • गाढ झोपेत विचारांचा विकास झाल्याचा मला पुष्कळ वेळा अनुभव येतो. पेरलेले बी मातीत झाकले म्हणजे लोपलेसे भासते, पण आतल्या आत विकसत राहते. तसेच हे दिसते. • बुडत्याशी सहानुभूती म्हणजे त्याच्याबरोबर बुडणे नव्हे, तर स्वतः तरून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणे. विनोबा निवडक अंतर्नाद ३१९