पान:निवडक अंतर्नाद.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मार्ग : चांगले पण साचेबद्ध होण्याची शक्यता असणारे कादंबरीलेखन मिलिंद बोकील हे मराठीतील आजचे आघाडीचे कथा-कादंबरीकार आहेत. 'झेन गार्डन', 'शाळा', 'रण', 'दुर्गं', 'समुद्र' या त्यांच्या कथात्म लेखनामुळे मराठी साहित्यात त्यांना निश्चित असे स्थान प्राप्त झाले आहे. 'मार्ग' ही त्यांची नवी कादंबरी हे स्थान अधोरेखित करणारी असली तरी, तिच्याद्वारे कादंबरी लेखनात त्यांचा असा एक साचा तर निर्माण होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित करणारीही झाली आहे. मार्ग एन. जी. ओ. च्या माध्यमातून समाजकार्यासाठी जाणारे पति-पत्नी, त्यांना होणारे अनोखे व सूक्ष्म असे समाजदर्शन, निसर्गचित्रण, त्या पार्श्वभूमीत रंगणारा रोमान्स आणि आता सारे काही ठीक होणार असे वाटत असतानाच, नायक किंवा नायिकेच्या निग्रही निर्णयामुळे त्यांचे (त्यांना आणि वाचकांनाही) अस्वस्थ करणारे, एकमेकांपासून दूर जाणे हे साधारणपणे या साच्याचे स्वरूप, 'रण' च्या पाठोपाठ 'मार्ग' वाचली की हा साचा स्पष्ट होतो. हे सारे चित्रण बोकील अत्यंत बारकाईने आणि हृदयंगमपणे करतात, त्या दोघांच्या मनोवस्थांचे त्यांनी केलेले चित्रणही बोकीलांची मानवी मनोव्यापारांची जाण किती सूक्ष्म आणि किती मनोवेधक आहे, हेही जाणवल्याशिवाय राहत नाही, पण त्याचवेळी याचा एक साचा तर होत नाही ना, अशी शंका वाचकांच्या मनाला कुरतडत राहते. या अतुल आणि विशाखा हे या कादंबरीतील नायक-नायिका (नात्याने पतिपत्नी) मुंबईजवळच्या माडभावन आदिवासींच्या वस्तीवर मुंबईहून येऊन जाऊन कार्य करतात. पण काही दिवसांनी सेवाकार्य अधिक चांगल्या रीतीने करण्यासाठी वस्तीवरच्या झोपडीतच जाऊन राहतात आणि भोवतालच्या वस्त्यांवरही फिरून कार्य करत राहतात. विशाखा डॉक्टर आहे तर अतुलने एम. एस. डब्ल्यू. केलेले आहे दोघेही प्रामाणिकपणे आपापली कामे करतात. भोवताली दाट जंगल, भूल घालणारे डोंगर, सोबतीला आदिवासी त्या आदिवासींशी पूर्णपणे मिसळलेल्या या दोघांना आदिवासींनीही आपले मानून स्वतःत सामावून घेतलेले आहे. विशाखा भोवतालच्या निसर्गात व लोकांत मनाने पूर्णपणे इतकी गुंतत जाते, की तिच्या मनाने कायमचेच इथे राहावे असे घेतलेले आहे. अतुलला मात्र सेवाकार्यातच करियर करावयाचे आहे. त्यासाठीचा अनुभव म्हणून तो माडभावनच्या वस्तीवर राहतो आहे दोघांमधील या वृत्तिभेदाचे चित्रण बोकीलांनी सुरुवातीपासूनच सूचित केलेले आहे. त्या डोंगरी परिसरातील निसर्गाची, जंगलाची, ३०८ निवडक अंतर्नाद • मिलिंद बोकील आदिवासींच्या जगण्याची रम्य चित्रे कादंबरीत जागोजाग आलेली आहेत. त्यांच्या वागण्यातला निरोगी मोकळेपणा आणि या दोघांबद्दलची निरपेक्ष आत्मीयता विशाखाच्या मनाला फार भावते. आदिवासींची लग्न ठरवण्याची पद्धत, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम, त्यांच्यात होणारे मृत्यू आणि अन्त्यक्रिया, वस्तीवरच करण्यात येणारे स्त्रियांचे बाळंतपण, जंगली झाडपाल्यांची आणि त्यांच्या औषधी उपयोगांची माहिती, त्यांचा उद्योगीपणा, त्यांचे नातेसंबंध या साऱ्यांची माहिती कथानकाच्या ओघात बोकील वाचकांना देतात आणि त्यातून वाचकांना या आदिवासींच्या जगण्याचा परिचय होतो. एकीकडून या आकर्षक समाजजीवनाचे चित्रण, दुसरीकडून रमणीय निसर्गाचे आकर्षक वर्णन आणि तिसरीकडून नुकताच विवाह झालेल्या या समाजसेवी पतिपत्नींचे परस्परांविषयीचे शारीर पातळीवरून सतत व्यक्त होणारे प्रेम हे तीन पदर या कथानकात आलेले दिसतात. प्रश्न निर्माण होतो हा, की या तीन पदरांचा एकजीव होणारा गोफ गुंफण्यात बोकीलांना यश लाभले आहे का? आणि त्याचे ठामपणे 'होय' असे उत्तर देता येत नाही. काही वेळा तर हे तीन घटक एकमेकांना रंजक करण्यासाठी तर येत नाहीत ना, अशी शंकाही येते. एकमेकांना मिठीत घेणे, चुंबनांचा वर्षाव करणे, आणि एकमेकांच्या छातीवर किंवा पोटात डोके घुसळणे या विशाखा-अतुल यांच्या कृतींचा तर अतिरेक होतो. दुःख होवो, आनंद होवो, आदिवासींच्या संदर्भातले एखादे काम होवो, प्रत्येक वेळी यांपैकी एखादी कृती होतेच. आदिवासी स्त्रीच्या बाळंतपणाचे चित्रण तर विशाखाची मातृत्वाची इच्छा अधिक तीव्र करण्यासाठीच आलेले आहे असे वाटल्याशिवाय राहत नाही. आणि शेवट होतो तो माडभावनातल्या प्रत्येक बाबीत जीव गुंतलेल्या विशाखाने त्या जीवनाचा भाग होऊन राहण्याचा निर्णय घेणे आणि अतुलने इथला अनुभव पुरेसा झाला मानून, आता अधिक व्यापक कार्य करण्याचे ठरवून त्यासाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेणे आणि त्याप्रमाणे आपापल्या मार्गांनी पुढे जाण्याच्या कृतीतून हे सारे वरवर पाहता स्वाभाविक आणि आपापल्या आंतरिक प्रेरणांप्रमाणेच होते आहे असा समज सहजपणे होतो. पण थोड्याशा बारकाईने पाहिल्यास कादंबरीच्या सुरुवातीपासूनच अगदी गणिती पद्धतीने त्याची मांडणी करण्यात आलेली आहे. (पृ. क्र. ३वरील विशाखाला जाणवलेले निसर्गचित्र