पान:निवडक अंतर्नाद.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाही. कुलकर्णीपेक्षा बरोबर आलेले गृहस्थच अधिक माहिती देत होते. माझ्या चेहऱ्यावरचं आश्चर्य वाचून कुलकर्णी म्हणाले. 'हेच नरसू माळी.' मी उडालेच! "तुम्ही नरसू माळी ? तुम्ही गुंडगिरी केली असेल, हे खरंच वाटत नाही!" मी कादंबरी वाचली. लेखकाच्या मर्यादा स्पष्ट होत्या. तरीही त्या कादंबरीतील नाट्यपूर्ण, रोमांचकारी अनुभवांसाठी मला ती कादंबरी छापावीशी वाटली, रामदासांनी तत्काळ होकार दिला. मी या पुस्तकात जीव ओतला पुस्तकाच्या प्रकाशनासाठी कुलकर्णी व नरसू माळी यांनी मला भूमला आग्रहानं बोलावलं, पण मला जमलं नाही. नरसू माळींची पुन्हा कधी भेट झाली नाही याची चुटपुट मागे राहिली. पॉप्युलर मित्रमंडळाची योजना कार्यान्वित करतानाही असाच नवीन काही घडविण्याचा आनंद मला मिळाला, तो 'बुक क्लब' चा जमाना होता. पुस्तकं वाचकांना थेट पोहोचविण्यासाठी प्रकाशन संस्थेतर्फे सभासद करून घेण्याची ती योजना होती. माझा नवरा सतीश मार्केटिंगमधला; त्यामुळे विक्रीसंबंधी घरी खूप चर्चा होत, रामदास म्हणाले, "ही योजना संपूर्णपणे तू घडव." पॉप्युलरचे लेखक व अन्य लेखक यांना पाठविण्यासाठी प्रथम मी एक माहितीपत्रक तयार केलं. एक ठरावीक रक्कम भरून वाचकांनी पॉप्युलर मित्रमंडळाचं सभासद व्हायचं, त्यांना सभासद क्रमांक व कार्ड द्यायचं. आमच्या लेखकांना आम्ही विनामूल्य सभासद बनवलं. दरमहा एक नवीन सवलत योजना जाहीर करायची. ताज्या पुस्तकांची माहिती कळवायची, असं या योजनेचं स्वरूप होतं, त्यासाठी चष्मा घालून पुस्तक वाचणाऱ्या छोट्या हत्तीचं बोधचिन्ह रघुवीर कुलकर्णीकडून करून घेतलं, मी व माझी साहाय्यक शुभांगी कांबळे यांनी या योजनेच्या प्रसारासाठी मुंबई, पुणे, ठाणे, डोबिंवली इथे धडाक्यात प्रदर्शनं भरवली, वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला, ग्रंथप्रसारक शरद जोशी, ठाण्याचे पद्माकर शिरवाडकर यांनीही यात बराच रस घेतला. ऑफिसमधले सुळे, चंदावरबाई, नाडकर्णी सगळ्यांच्यात उत्साह संचारला होता. ध्येय एकच, सभासद वाढविणं, ते एक उत्तम टीमवर्क बनलं. दादरच्या किंग जॉर्ज शाळेतील प्रदर्शनाचे दिवस असे होते...... “२० एप्रिल १९८३ आज संध्याकाळी बरीच माणसं पॉप्युलर मित्रमंडळाची सभासद झाली. ग्रंथालीचे दिनकर गांगल आले होते. मी त्यांना म्हटलं, "तुम्ही काही सभासद होणार नाही, तरीपण ही योजना कशी वाटते बघा.” त्यांनी योजना वाचली. त्यांना ती आवडली; आणि ते चवक सभासदही झाले. " “२१ एप्रिल १९८३ संध्याकाळी साडेसातपर्यंत प्रदर्शनात थांबले. पॉ, मि, मंडळाविषयी तेच तेच बोलून घसा दुखायला लागला; पण सभासद चिक्कार मिळाले. मॅजेस्टिक प्रकाशनात काम करणारे केशव साठे यांनी आज उत्तम सहकार्य केलं. दोन पुस्तकप्रेमींना माझ्याजवळ ३०० निवडक अंतर्नाद घेऊन आले. म्हणाले, "यांना तुमचे सभासद करून घ्या. हे खूप पुस्तकं विकत घेतात." हा जिव्हाळा मनाला स्पर्जून गेला.” आयडियलचे कांताशेठ नेरूरकर, बॉम्बे बुक डेपोचे पांडुरंग कुमठा व झांट्ये, एक्सप्रेसोचे अविनाश पाटणकर, किशोर आरस यांसारखे ग्रंथव्यवहारात विविध भूमिका निभावणारे लोक परिचयाचे झाले. या उद्योगाचा सम्यक अनुभव मला मिळाला. याव्यतिरिक्त प्रत्यक्ष रामदास भटकळांमुळे तर माणसांचा ओघच पॉप्युलरकडे वळला होता. काहींच्या भेटी होत, तर काही मंडळी रामदासांच्या आठवणींतून मनात जागी होत. जी. ए. कुलकर्णी, कुसुमाग्रज यांसारख्या दूरस्थ व्यक्तींचा परिचय मला रामदासांच्या आठवणींतून आणि पत्रव्यवहारांतून झाला, जी. एंचं ते लहान मुलासारखं सुटंसुटं इंग्रजी अक्षर आणि कुसुमाग्रजांचं अतिसुंदर अक्षर मनावर कोरलं गेलं. 'छंदोमयी' या त्यांच्या कवितासंग्रहाच्या मागील पृष्ठावर मी ब्लर्बऐवजी त्यांच्या हस्ताक्षरातील 'चिंब चिंब भिजतो आहे, भिजता भिजता मातीमध्ये पुनः पुन्हा रुजतो आहे' या ओळी टाकल्या. वसंत कानेटकर, ग्रेस, सदानंद रेगे, स्नेहप्रभा प्रधान, ज्योत्स्ना देवधर, तारा वनारसे अशा मित्रमैत्रिणींविषयी रामदास • खूप काही सांगत, त्यांची बोलीभाषादेखील विश्लेषणात्मक होती. ते 'जिगसॉ पूर्वीचे दिवस होते, स्नेहकथा लिहायला त्यांनी थोडी थोडी सुरुवात केली होती. सदानंद रेगे यांच्यावर लेख लिहिण्यापूर्वी ते माझ्याशी बरंच बोलले. दोन-तीन दिवस तो विषय माझ्याही मनात घोळत राहिला, लेखनाची ऊर्मी माझ्यातही होती. पॉप्युलरमध्ये रुजू होण्यापूर्वीच मी लेखनाच्या वाटेला लागले होते, मला या दोन मित्रांविषयी कविता सुचली. गंमत म्हणजे ज्या दिवशी त्यांनी मला त्यांचा लेख वाचायला दिला, त्याच दिवशी मी त्यांना दाखविण्यासाठी माझी कविता नेली. 'माणूस' च्या दिवाळी अंकासाठी रामदासांनी जेव्हा दिलीप माजगावकरांना रेग्यांवरचा लेख दिला, तेव्हा माझी कविताही दिली. माजगावकरांनी चौकटीत ती कविता छापली. नातं ... मृत मित्राच्या पत्रातील उन्हाळे, पावसाळे, माझ्या मनात आता फक्त कोरड्या नदीचे पात्रच उरलेले. पत्रात होते राग-रुसवे, हट्ट- आग्रह, हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप आणि .... बहरून आलेल्या कवितांचं गर्द हिरवं अरण्य... ! या हिरव्यागार अरण्यासाठीच मित्राला सारं काही माफ होतं. धुंदही झालो होतो कधीतरी, माझ्यापाशीच चालणारे त्याचे प्रतिभावंत रुसवे झेलून, पण अचानक एका संध्याकाळी लक्षात आलं,