पान:निवडक अंतर्नाद.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवाजी हाच सर्वश्रेष्ठ पुरुष दिसतो. परंतु साऱ्या मराठ्यांनी शिवाजी महाराजांनी मोठे केले नसते तर ते मोठे होऊ शकले नसते.... महाराष्ट्रातील धर्मांदोलनाने देशातील सारे लोक एकत्र घुसळले जात होते. शिवाजी महाराजांनी प्रतिमा याच मंथनातून निर्माण झालेली होती. ती साऱ्या देशाच्या धर्मोद्द्बोधनाशी संबद्ध होती. त्यामुळेच देशाच्या शक्तीत शिवाजी महाराजांना धन्यत लाभली आणि त्यांच्या शक्तीमुळे देश धन्य झाला. अखेर कालांतराने जेव्हा ही धर्मसाधना स्वार्थसाधनेत परिणत होऊन विकृत झाली... तेव्हा परस्पर अविश्वास, मत्सर, विश्वासघात इत्यादींनी मराठ्यांच्या प्रतापच्या मराठ्यांच्या प्रतापाच्या विशाल भिंती जीर्णविदीर्ण करून टाकल्या धर्माने साऱ्या समाजाला एक केले होते; पण स्वार्थाने त्याला विस्कळीत करून टाकले. हाच मराठ्यांच्या अभ्युत्थानाचा व पतनाचा इतिहास होय." दुसऱ्या लेखात रवींद्रनाथ म्हणतात, "गुरू नानकांनी ज्या मोक्षप्राप्तीला सर्वांत श्रेष्ठ ठरवले होते, तिच्यावर गुरू गोविंदांना आपले लक्ष स्थिर करता आले नाही. शत्रूच्या हातून मुक्ती मिळविणे हीच एक गोष्ट त्यांनी आपल्या शिष्यांच्या मनावर ठसविली. त्यामुळे इतिहासांमध्ये क्षणभर शिखांचा पराक्रम उज्ज्वलपणे चमकला हे खरे; परंतु बाबा नानकांनी जे पाथेय देऊन त्यांना एका विशाल, उदार मार्गावरून चालण्याची प्रेरणा दिली होती, ते पाथेय त्यांनी तेथेच खर्च करून टाकले आणि आपली यात्राही त्यांनी याच ठिकाणी संपविली. यांच्यानंतरचा शिखांचा इतिहास म्हणजे फक्त लढाया आणि मुलूखगिरी यांचाच इतिहास होय. शीख इतिहासाचा परिणाम आमच्या देशाच्या बाबतीत अत्यंत शोकावह झाला आहे. " शिवाजी महाराजांसंबंधी या लेखात गुरुदेव म्हणतात, "शिवाजी महाराजांनी ज्या हिंदू समाजाला मोगल आक्रमणाविरुद्ध विजयी बनविण्याचा प्रयत्न केला, त्या समाजाच्या मुळामध्येच आचार-विचारांतील भेदभाव घर करून राहिलेला होता. त्या भेदमूलक धर्मसमाजालाच त्यांनी साया भारतवर्षात विजयी बनविण्याचा प्रयत्न केला. यालाच म्हणतात, वाळूचा बांध बांधणे! ती तर असाध्य गोष्ट होती!” स्फुट प्रसंग रवींद्रनाथांनी मुंबई व कारवार या शहरांविषयी लिहिलेले लेख वेगवेगळ्या कारणांसाठी उल्लेखनीय आहेत. मुंबईविषयी ते लिहितात, "जे दृश्य पाहून हृदय सर्वांत अधिक तृप्त होते ते म्हणजे येथील स्त्री पुरुषांचा संमिश्र समाज ! स्त्रीवर्जित कलकत्त्याचे दैन्य किती मोठे आहे, ते येथे मुंबईला आल्यानंतरच पाहायला मिळते. अर्थात स्त्रीला पडद्यात ठेवण्याची ही शिक्षाच म्हणायची!” कारवारसंबंधीच्या लेखात मुख्यतः तेथील निसर्गसौंदर्याचे हृदयंगम वर्णन आहे. रवींद्रनाथांचे थोरले बंधू श्री. सत्येंद्रनाथ ठाकूर हे पहिले भारतीय सर्वोच्च मुलकी अधिकारी (आय.सी.एस.) होते. त्यांनी त्या काळच्या मुंबई इलाख्यात नोकरी करण्याचे पसंत केले. ते अधूनमधून छोट्या रवींद्रनाथांना आपल्याजवळ बोलावून घेत, त्यामुळे रवीबाबूंना बालपणीच महाराष्ट्र-गुजरात कर्नाटकात २८२ निवडक अंतर्नाद राहण्याफिरण्याची संधी मिळाली. त्या वेळच्या आपल्या आठवणी रवींद्रनाथांनी छेलेबेला या बालपणाच्या आत्मकथेत नमूद करून ठेवल्या आहेत. इतर अनेक घटना श्री. प्रभातकुमार मुखोपाध्याय यांच्या रवींद्रजीवन या चतु:खंडात्मक बृहत रवींद्रचरित्रात समाविष्ट आहेत. रवींद्र रचनावली या १५ खंडांच्या ग्रंथातून बरीच उपयुक्त माहिती मिळाली. रवींद्र जन्मशताब्दीच्या वेळी (१९६१ साली) प्रत्येकी सुमारे १,००० पृष्ठांच्या १४ खंडांत पश्चिम बंगाल सरकारने अत्यंत स्वस्तात (१,००० रुपयांत) संपूर्ण रवींद्र रचनावली उपलब्ध करून दिली होती. (पंधरावा खंड सूचीचा होता.) त्यानंतर तिच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आणि बहुधा अजूनही निघत असाव्यात! सत्येंद्रनाथ तुकाराम महाराजांचे मोठे चाहते होते. रवींद्रनाथांनाही ते तुकारामांचे अभंग समजावून सांगत. त्या अभंगांचे अनुवाद रवींद्रनाथ करीत कालांतराने सत्येंद्रनाथांनी केलेल्या कवितांचा एक संग्रह नवरत्नमाला या शीर्षकाने प्रसिद्ध झाला. त्यात तुकारामांच्या अभंगांचे बंगाली अनुवादही आहेत. २१ सप्टेंबर १९२२ रोजी रवींद्रनाथांनी विश्वभारतीसाठी मदत गोळा करण्याच्या निमित्ताने दक्षिण भारताच्या आपल्या दौऱ्यात पुण्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना गायन समाज, आनंदाश्रम, केसरी मराठी संस्था, न्यू पूना कॉलेज, फीमेल हायस्कूल, फर्ग्युसन कॉलेज वगैरे ठिकाणी पानसुपाऱ्या झाल्या. रविवारी सकाळी किर्लोस्कर थिएटरमध्ये त्यांचे 'विश्वभारती' संबंधी निबंधवाचन झाले. व्याख्यानाकरिता लावलेल्या तिकिट विक्रीने ४३६ रुपये जमले. पैकी ५१ रुपये खर्च वजा जाता ३८५ रुपये विश्वभारती संस्थेला देण्यात आले. साच्या कार्यक्रमांचा वृत्तांत 'केसरी' मध्ये (२६/०९/१९२२) प्रसिद्ध झाला होता. एका सभेमध्ये लोकमान्य टिळकांसंबंधी आपली एक आठवण रवींद्रनाथांनी सांगितली. लोकमान्यांनी एका माणसाच्या हाती ५० हजार रुपयांचा चेक रवींद्रनाथांकडे पाठवून त्यांनी युरोपात जाऊन स्वतःच्या (रवींद्रनाथांच्या) विचारांचा प्रचार करावा, असे सुचवले होते. अर्थात रवींद्रनाथांनी ते पैसे घेतले नाहीत. परंतु लोकमान्यांच्या त्या कृतीतून लोकसंग्रह्मची त्यांची भूमिका कशी दिसून येते, हे सांगण्यासाठी या घटनेचा उल्लेख केला होता. पुण्याच्या मुक्कामात पंडिता रमाबाईंचे व्याख्यान ऐकण्यास रवींद्रनाथ मुद्दाम गेले होते. पण स्वत:ला धर्मरक्षक समजणाऱ्यांनी ती सभा उधळून लावली. त्याबद्दल रवींद्रनाथांनी आपली नापसंती व्यक्त केली होती. रवींद्रनाथांच्या प्रतिभेची कदर करणारी बंगलाबाहेरील पहिली व्यक्ती मुंबईची अन्नपूर्णा तर्खडकर हिच्याविषयी (श्री. बा. जोशी यांच्यासारख्या अनेकांनी संशोधनपूर्ण लिखाण केले आहे • रवींद्र साहित्याची अनुरागिणी या शीर्षकाखाली मी त्याचे संकलन केले आहे. ते एक फार मोठे प्रकरण आहे. त्याचा फक्त ओझरता उल्लेख करणेच या लेखात शक्य आहे. अंतर्नादसाठी हा लेख लिहिताना या सगळ्या जुन्या स्मृती जाग्या झाल्या. त्याबद्दल संपादकांना मनःपूर्वक धन्यवाद ! (मे २०००, रवींद्रनाथ विशेषांक)