पान:निवडक अंतर्नाद.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपल्या मनात घर करून बसतात असल्या आपल्या जीवनाशी संबद्ध असलेल्या काव्यपंक्ती. हॅम्लेटची स्वगते अशीच आपल्या भावनाविश्वातील ध्वनी प्रतिध्वनित करणारी ठरतात. हॅम्लेटच्या प्रसिद्ध To Be or not to be... ह्या स्वगतात शेक्सपीअरने आयुष्याची एक महत्वाची समस्या पकडण्याचा प्रयत्न केला आहे. असावे की नसावे? जगावे की मरावे? खवळलेल्या दैवाचे आघात धैयनि, शांतपणे सोसावेत का हाती शस्त्र घेऊन अरिष्टांशी लढावे आणि लढता लढता संपावे? प्रश्नांचा उच्चारच मुळी समाधान देणारा आहे; त्यांचे उत्तर कदाचित तसे नसेलही. पण दुर्दैवाचे प्रत्याघात पडू लागले म्हणजे भिंतीला पाठ देऊन ते झेलताना आपल्या मनात शब्द घुमतात : Whether it is nobler in mind to suffer.. त्यासाठी राजपुत्र हॅम्लेट थोडेच असायला पाहिजे, काका खुनी थोडाच असायला पाहिजे! शेवटी कथा, प्रसंग, व्यक्ती कवितेतून गळून पडतात आणि उरते काव्यात साकार झालेले निखळ भाव आणि अनुभूती. आत्महत्येच्या दरवाजापाशी आलेला, जीवनातील रस हरवून बसलेला हॅम्लेट म्हणतो : O, that this too solid flesh would melt Thaw and resolve itself into dew! O God! O God! How weary, stale, flat and unprofitable Seem to me all the uses of this world. ह्या केवळ हताशतेनेच तो आपल्याला मित्रासारखाच वाटतो. कारण ती निराशा केवळ हॅम्लेटची नसते. ती असते आपल्या सर्वांची. हॅम्लेटच्या शोककथेचा शेवट हृदयाचा ठाव घेणारा आहे. तो मित्राला म्हणतो : O good Horatio, What a wounded name, Things standing thus unknown, shall leave behind me... O I die Horatio .... the rest is silence. जगताजगता जीवनाचा गुंताच इतका कठीण होतो; तो सुटता सुटत नाही. माणसे एकमेकांना समजून घेऊ शकत नाहीत; घेऊ लागता लागता आयुष्य संपायचीच वेळ येते. आणि मागे राहते ती लांच्छित आठवण! खरे तरी ही वेदना केवळ हॅम्लेटची नाही. ती वेदना आहे अवघ्या जीवनाची, जगण्याच्या प्रवासाची, माणसाच्या प्राक्तनाची. शेक्सपीअरच्या हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लिअर, मॅकबेथ ●आणि अँटनी ॲण्ड क्लिओपाट्रा ह्या पाच शोकांतिकांत शेक्सपीअरच्या काव्याचे अतुलनीय वैभव विशेष करून सापडते. जीवनाचे अनेक गहन, गूढ तणाव काव्यात पसरले आहेत. भाषा आणि भावना एकरूप झाल्या आहेत आणि आविष्कारांचे स्वरूप स्तिमित करणारे आहे. मॅकबेथ नाटकातल्या काही ओळी ऐकल्या म्हणजे आपण २७० निवडक अंतर्नाद आश्चयनि थक्कच होतो. नुसते शब्द तरी किती भारदस्त : Vaulting ambition, imperial theme, multitudinous seas incarnandine... घरी पाव्हणा म्हणून आलेल्या आणि पूर्ण विश्वासाने राहिलेल्या राजाचा खून करण्याचे ठरविले तरी मॅकबेथची मानसिक तयारी होत नाही. तो म्हणतो : If it were done when it's done, then it were well. It were done quickly. If the assassination Could trammel up the consequences, and catch With his surcease, success, that but this blow Might be the be-all and end-all here. या उद्गारांतील विराटता प्रसंगाच्या, भावनेच्या विलक्षणपणाला साजेशीच आहे विश्वातील एक प्रचंड शक्तीच प्रवासाच्या विचित्र वळणावर चिंतन करते आहे असा भास होतो. असाच आणखी एक, शेक्सपीअरच्या वाचकाला परिचित प्रसंग, मॅकबेथची पत्नी वारल्याची बातमी मॅकबेथच्या कानावर घालण्यात येते. जीवनाच्या तुफान संघर्षात गुंतलेल्या मॅकबेथला दुःख करायलाही फुरसद नाही. तो म्हणतो : She would have died hereafter, There would have been a time for such a word, Tomorrow, and tomorrow and tomorrow, Creeps in this petty pace from day to day. To the last syllable of recorded time; And all our yesterdays have lighted fools The way to dusty death. Out, out brief candle! Life's but a walking shadow, a poor player, That struts and frets his hour upon the stage And then is heard no more; it is a tale Told by an idiot, full of sound and funy, Signifying nothing. ही एक रूपकांची शर्यत, प्रतिमांची घोडदौड Out, out brief candle ! मेणबत्तीची शान तिच्या ज्योतीत असते हे खरे, ज्योत तिचा केवळ एक भाग आहे. पण तिची निर्मिती असलेली ज्योत सारी मेणबत्तीच गिळून टाकते. शानदार महत्त्वाकांक्षा - जी आयुष्याचा केवळ एक भाग असू शकते - ती मॅकबेथचे सारे जीवनच गिळून टाकते आहे. ती संपेल तेव्हा संपेल, नव्हे संपत आलीच आहे Out, out brief candle! प्रचंड अर्थ थोडक्या शब्दांत ठासून भरण्याचे शेक्सपीअरचे सामर्थ्य थक्क करणारे आहे. पुढे मॅकबेथ म्हणतो : उद्या, उद्या आणि उद्या दरदिनांच्या (day to day ) अंतरात सरपटत जातात आणि आपले सर्व काल ( all our yesterdays ) मूर्खाना मरण्याच्या मार्गावर प्रकाश दाखवितात. सगळा काळ म्हणजे एक विसंगती, एक अर्थशून्यता!