पान:निवडक अंतर्नाद.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विसरशील खास मला विसरशील खास मला दृष्टिआड होता वचने ही गोड गोड देशि जरी आता! दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी व्यवसायही विविध विविध विषय भोवताली गुंतता तयात कुठे वचन आठवीता? विसरशील खास मला दृष्टिआड होता! स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा वशही वशीकरण तुला सहज जादुगारा लाभशील माझा मज केवि जसा होता? विसरशील खास मला दृष्टिआड होता! स्वत्वाचे भान जिथे गुंतल्या नुरावे झुरणारे हृदय इथे हे कुणी स्मरावे? होइल उपहास खास आस धरू जाता विसरशील खास मला दृष्टिआड होता! अंतरिची आग तुला जाणवू कशाने? बोलते न वेदनाच वचन दुःख नेणे यापरता दृष्टिआड होऊ नको नाथा विसरशील खास मला दृष्टिआड होता! विसरशील खास मला २४ निवडक अंतर्नाद जयकृष्ण केशव उपाध्ये विदर्भाने मराठी काव्यसृष्टीला अनेक उत्तमोत्तम कवी दिले आहेत. गुणवंत हनुमंत देशपांडे, ना. घ. देशपांडे, वा. ना. देशपांडे, आत्माराम रावजी देशपांडे म्हणजेच कवी अनिल यांच्यापासून तो थेट आजच्या सुरेश भट, मधुकर केचे, ग्रेस यांसारख्या कवींपर्यंत ही परंपरा अखंड चालू आहे. यातल्या सर्व कवींचे काव्य मराठी रसिकांनी साक्षेपाने आणि उत्कट प्रेमाने वाचलेले आहे. तथापि विदर्भात काही कवी असेही होऊन गेले की त्यांनी तोलामोलाचे काव्य लिहिलेले असूनसुद्धा आज ते काहीसे विस्मृतीत गेले आहेत, आजच्या पिढीपर्यंत त्यांच्या कविता पोचलेल्या नाहीत. या क्षणी मला निदान दोन कवी असे आठवत आहेत. एक श्रीनिवास रामचंद्र बोबडे आणि दुसरे जयकृष्ण केशव उपाध्ये, ज. के उपाध्ये हे नागपूरचे. त्यांचा जन्म नागपूर इथे अठराशे ऐशी साली झाला आणि त्यांचे बालपण तिथेच गेले. त्यांचा मृत्युशक उपलब्ध नाही. उपाध्ये यांच्या बाबतीतली एक उल्लेखनीय गोष्ट अशी की ऐन तरुण वयात त्यांनी तीन वर्षांपर्यंत श्रीरामनामाचे पुरश्चरण केले होते. माडगूळकर यांच्या 'गीतरामायणा' सारखी पण त्यांच्या कितीतरी पूर्वी त्यांनी 'गीतराघव' या नावाने रामचरित्रावर आधारलेली जी गीतमालिका रचली तिची प्रेरणा या रामभक्तीतून त्यांना मिळाली असावी. प्राचीन मराठी वाङ्मयाचे त्यांचे अध्ययनही चांगले होते. त्यांच्या रचनेतील निर्दोष रेखीवपणा या अभ्यासाची साक्ष देतो. उपाध्ये यांच्या काव्यामध्ये राष्ट्रप्रेमाचा आविष्कारही उत्कटपणे झाला आहे त्यांनी आपले 'श्रीलोकमान्यचरितामृत' हे एकोणीसशे चोवीस साली लिहिलेले ओवीबद्ध काव्य, त्याप्रमाणे 'स्वतंत्र हिंदुस्तान', 'भारत भाग्योदय', 'तरुण भारता', 'हिंदू संघटन ' यांसारख्या कवितांमधून त्यांच्या राष्ट्रभक्तीचा प्रत्यय येतो. या कवितांच्या जोडीने प्रेमभावनेचा सूक्ष्म आणि तरल आविष्कार करणाऱ्या काही रसपूर्ण कविताही त्यांनी लिहिल्या आहेत. 'विसरशील खास मला' ही इथे घेतलेली सुंदर कविता त्यांतलीच एक आहे. उपाध्ये यांच्या कवितेत आढळून येणारे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या ठायी असलेली अभिजात विनोदबुद्धी. त्यातून त्यांच्या काही लक्षणीय विडंबन कवितांची निर्मिती झालेली आहे. 'चालचलाऊ भगवद्गीता' हे त्यांनी भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचे केलेले विडंबन उत्कृष्ट आहे. आजही उपाध्ये या कविनामाचा उल्लेख झाला तर जुन्या पिढीच्या रसिकांना त्यांचे हे विडंबन हटकून आठवते. कवितेत होणारा यतिभंग कशी रसहानी करतो हे दाखवून देणारी त्यांची 'चहाटळपणा' ही कविता त्यांच्या तरल कल्पकतेची साथ पटवते. या महाराष्ट्र देशात उपजलो मीच शाहीर' किंवा 'कविते, करीन तुला मी ठार' असा प्रारंभ असणाऱ्या त्यांच्या कविता म्हणजे कवितेच्या क्षेत्रात सामान्य कवींचे जे पेव