पान:निवडक अंतर्नाद.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नकळत शिरलेले इंग्रजाळलेले शब्द त्यांनी नीट वेचून बाजूला काढले होते. हे करताना अनावश्यकपणे संस्कृतकडे जायचा मोही टाळला होता. हे नाटक असल्यामुळे प्रत्येक वाक्य स्टेजवरून बोलायचे आहे याचंही भान ठेवलं होतं. मुख्य म्हणजे मूळ लेखकानंही सारं तपासलं होतं! तरी यात काही उर्दू- फारशी शब्द घुसले होते आणि त्याला आवळीकरांनी आक्षेप घेतला होता. त्यातले अनेक शब्द कार्नाडांनीही वापरले होते, हेही आवळीकरांनी नमूद केलं होतं! यादी पाहताच मी गडबडले आणि कार्नाडांना फोन केला. ( एव्हाना घरी फोन आला होता.) सगळी हकीकत सांगून विचारलं, 'ती यादी तुम्हाला पाठवू का?' त्यांनी हसत हसत सांगितलं, 'नको! मला तर पाठवू नकाच, पण तुम्हीही त्यात लक्ष घालू नका!' विशेष म्हणजे डॉ. पंडित आवळीकरांनीही हे कुठेही प्रकाशित केलं नाही, हा त्यांचा मोठेपणा! कलाकारांनी खचाखच भरलेल्या त्या समूहात आम्ही दोघंही अगदी केविलवाणे दिसलो असणार, विमानतळावर पत्र्याच्या बॅगेसह आणि वळकटीसह उतरलेल्या निम्नवर्गीय प्रौढ जोडप्यासारखे असंच मला वाटत राहिलं. पण याच ठिकाणी ओळख झालेल्या मीना चंदावरकर नंतर भेटी होत तेव्हा आमच्याशी खूप छान वागत राहिल्या. याच वेळी झालेला आणखी एक संवाद आठवतो, तेव्हा मी पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या कथांचे अनुवाद करत होते आणि संग्रह करायचं घाटत होतं. मी कार्नाडांना म्हटलं, 'त्यांच्या प्रकाशनाला तुम्ही यायला पाहिजे! म्हणजे हा लेखक महाराष्ट्रात नीट पोचेल!' २४८ निवडक अंतर्नाद कार्नाड आमच्याकडे वळले आणि म्हणाले, 'जर पुचंते (म्हणजेच पूर्णचंद्र तेजस्वी ) येणार असेल तर मी नक्की येईन! सगळी कामं बाजूला सारून येईन!' हे म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होतं, त्याचा उलगडा नंतर झाला. कार्नाड तेजस्वींना आमच्यापेक्षा चांगलं ओळखत होते. बावीस एकर जंगल कापून वेलदोड्याची आणि कॉफीची शेती करणारे तेजस्वी म्हैसूरच्या गर्दीलाच 'काय ही गर्दी म्हणत यायचं टाळत होते! ते पुण्याला येणार नाहीत याची खात्रीच या मिश्किल हसण्यामागं होती ! ००० कार्नाडाच्या नाटकांचा अनुवाद करायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू झाला. त्यावेळी सुरुवातीला त्यांचा मायना काही वेळा 'उमावहिनी आणि विरूपाक्षजी' असा असायचा ववचित प्रसंगी फोनवर बोलणंही होऊ लागलं, कितीतरी काळानंतर त्यांची आमच्याशी पहिली भेट झाली. पुण्यात संगीत- नाटक अकादमीची एक मिटिंग होती. अध्यक्ष या नात्यानं ते त्यासाठी पुण्यात आले होते. त्यांनी ते उतरलेल्या हॉटेलमध्ये विशिष्ट वेळी भेटायला बोलावलं. दबकत घाबरत तिथं पोचल्यावर नंतर मात्र अनेकदा भेटी होत. अगदी प्रत्येक पुणे-भेटीत गप्पा झाल्या. आपोआपच दडपण कमी झालं. (अर्थात ही माझी जमलं नाही तरी त्यांना जेव्हा वेळ असे तेव्हा ते आम्हांला अवस्था ! विरूपाक्ष नेहमीसारखे सहजच वावरत होते.) दुसरे हॉटेलवर बोलावून घेत आणि तिथं गप्पा होत. एकदा गप्पा दिवशी तिथं सगळ्यांसाठी जेवणही होतं. त्यासाठीही कार्नाडांनी मारताना त्यांना आम्ही कर्नाटकातल्या नव्या लेखकांविषयी आम्हाला निमंत्रित केलं. चित्रपट आणि कलासृष्टीतल्या विचारत होतो. तेव्हा मी म्हटलं, 'कर्नाटकात आपल्या मुळांचा वेध गोष्ट! जेव्हा तेजस्वींची कादंबरी आणि कथासंग्रह मराठीत प्रकाशित झाले, तेव्हा मी ते कार्नाडांना पाठवून दिले. त्यांनी पत्र लिहून कळवलं, 'तुम्हाला पुचंतेची स्टाईल पकडण्यात यश आलं आहे!' अनुवादकाच्या दृष्टीनं ही तर अगदी फुशारून जाण्याचीच अनेक उत्तम कन्नड कलाकृती उमा कुलकर्णी यांनी मराठीत आणल्या. त्यांचे पती विरूपाक्ष यांच्या सहकार्याने, अंतर्नादमध्ये प्रसिद्ध झालेल्या भैरप्पा यांच्या व्यक्तिचित्रात त्या लिहितात, "लग्नानंतर मी कन्नड बोलायला शिकले असले, तरी लिपी येत नव्हती. त्यामुळे विरूपाक्ष वाचून दाखवायचे आणि मी अनुवाद करायची " वरील छायाचित्रात विरूपाक्ष आणि उमा कुलकर्णी यांच्यासमवेत गिरीश कार्नाड