पान:निवडक अंतर्नाद.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जन्म : २९ मार्च १९४८, मुखेड (जिल्हा नांदेड) येथे शिक्षण : एम. ए. (१९७१, मराठवाडा विद्यापीठात सर्वप्रथम), पीएच. डी. (१९८०) अध्यापन : १९७७ ते १९९६ ( मराठी विभाग, मराठवाडा विद्यापीठ), १९९६ ते २००५ (मराठी विभागप्रमुख, पुणे विद्यापीठ) २००५ ते २०१० कुलगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद सध्या अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी भाषा सल्लागार समिती मुड्स (कविता १९७९), संदर्भ (कथा १९८४), गांधारीचे डोळे (कादंबरी १९८५), ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध (समीक्षा १९८५) व उद्याच्या सुंदर दिवसांसाठी (ललित २००२) या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार, लेखन : असेच होते. महाविद्यालयात आल्यानंतर मात्र साहित्यासंबंधीची माझी जाण अधिकाधिक विकसित होऊ लागली. मुख्य म्हणजे वाचन वाढले. येथे मराठी शिकविण्यासाठी प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी होते. ते स्वतः कवी आणि कथाकार म्हणून मान्यताप्राप्त होते. स्वाभाविकपणेच मी व माझा कविमित्र वसंत जाधव त्यांच्या घरी जाऊ लागलो. त्यांच्या घरची पुस्तके हक्काने खोलीवर नेऊ लागलो. एखादे आम्ही वाचले नाही, तर ते आवर्जून देत. चर्चा करीत. आम्ही त्यांच्या घरचेच झालो. मग त्यांच्या नव्या कविता आम्ही वाचत असू. त्यांच्या 'दूर गेलेले घर' या कादंबरीचे पहिले वाचक (श्रोते) मी, वसंत जाधव आणि ताई होतो (सौ. तांबोळी). ही कादंबरी ऐकून आम्ही फार प्रभावित झालो. हे सर्व चालू असताना मी कविता लिहीत होतोच, त्यांना दाखवीत होतो. त्यांना आवडल्या, तर ते त्यांचे पत्र जोडून एखाद्या मासिकाकडे पाठवीत. त्यांतील काही कविता छापून आल्या. याच काळात मी ललित निबंध लिहू लागलो. असे ललित निबंध गोव्याहून प्रसिद्ध होणाऱ्या 'मांडवी' या मासिकातून आणि रविवारच्या 'मराठा'तून प्रसिद्ध होऊ लागले. महाविद्यालयात असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लातूरच्या दयानंद महाविद्यालयाने एक कथास्पर्धा जाहीर केली. त्यात मला दुसरे बक्षीस मिळाले. पुढे मात्र मी कुठल्या स्पर्धेत भाग घेतला नाही. अशा स्पर्धांचा नव्या लेखकांना फायदा होतो. एकदम नाव माहीत होते. परंतु काय असेल ते असो, मी मात्र स्पर्धांमधून भाग घेतला नाही. कविता, ललित निबंध, कथा मात्र लिहीत राहिलो. महाविद्यालयातील आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे. आम्हांला सत्यनारायण जाजू हे प्राध्यापक हिंदी शिकवीत, माझे हिंदी नव्हते, तरी त्यांच्याकडे जाणे-येणे होते. तेही वाचन करवून घेत चर्चा करीत. हिंदीतील नवसाहित्य म्हणजे कमलेश्वर, राजेंद्र यादव, मन्नू भंडारी, श्याम जोशी, इलाचंद्र जोशी असे सारे वाचून काढले. धर्माधिकारी, तांबोळी, जाजू यांच्याशी झालेल्या चर्चा माझी वाङ्मयीन समज विकसित करणाऱ्या होत्या, लेखनही चालू होते. बी. ए., होईपर्यंत कवी म्हणून माझे नाव चार लोकांना माहीत झाले होते. पुढे मी एम. ए. साठी मराठवाडा विद्यापीठामध्ये गेलो. तेथे सुप्रसिद्ध समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी हे विभागप्रमुख होते. डॉ. पठाण, डॉ. सुधीर रसाळ आणि डॉ. गो. मा. पवार हे इतर शिक्षक होते. येथे साहित्याकडे अधिक जागरूकपणे पाहण्याचे शिकता आले. आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे. आर्थिक परिस्थितीमुळे मी 'मराठवाडा साहित्य परिषदे' मध्ये कारकून म्हणून काम करू लागलो. माझ्या आवडीचे तेथील काम होते ते 'प्रतिष्ठान' या वाङ्मयीन नियतकालिकाचे. डॉ. रसाळ संपादक होते. महाराष्ट्राच्या सर्व भागांतून विविध प्रकारचे साहित्य येत असे. कविता, कथा, समीक्षा आणि इतर लेखन येई. मी ते नोंदवून घेऊन डॉ. रसाळ यांच्याकडे पाठवीत असे. (अर्थात ते मी वाचत असेच.) डॉ. रसाळांकडे जे साहित्य पाठविले जाई, मी माझ्या कविता आणि कथा पाठवू लागलो. त्यांतल्या काही कविता व कथा डॉ. रसाळ निवडत. पुढे यथावकाश हे साहित्य 'प्रतिष्ठान' मध्ये प्रकाशित होऊ लागले. त्याच वेळी 'सत्यकथे' मधून माझ्या कथा व कविता येऊ लागल्या. तो काळ असा होता, की 'सत्यकथा', 'प्रतिष्ठान' मधून छापून आले, की तो लेखक रातोरात महत्वाचा होऊन जायचा. विशेषत: 'सत्यकथे' चा दबदबा अधिक होता. १९७१ साली मी बीड येथे महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून रुजू झालो. मला कवी आणि कथाकार म्हणून बऱ्यापैकी नाव मिळालेले होते. तेथे असताना मी अनेक कथा लिहिल्या कविताही लिहिल्या. तेथे एक छोटा साहित्यिक मित्रांचा ग्रुप जमला, सोपान हाळमकर, वासुदेव मुलाटे, त्र्यंबक असरडोहकर आणि मी असे आम्ही साहित्यप्रेमापोटी एकत्र आलो. अधूनमधून भास्कर चंदनशीव बीडला येत. मग गप्पांना बहर येई. बीडच्या वास्तव्यात आणखी एक झाले. मी नव्या महत्त्वाच्या पुस्तकांवर 'प्रतिष्ठान', 'नवभारत', 'समाजप्रबोधनपत्रिका', 'अस्मितादर्श' या आणि इतर अनेक नियतकालिकांमधून परीक्षणे लिहू लागलो, एम. ए. ला असताना मोठे समीक्षक आम्हांला शिकवायला होते. त्यांच्यामुळे असेल अगर इतर कुठल्या कारणामुळे असेल, परंतु मी समीक्षा लिहू लागलो. त्या काळातील माझी समीक्षालेखनाची मुख्य प्रेरणा होती, नव्याने आलेल्या चांगल्या पुस्तकांचा परिचय वाचकांना करून द्यावा, मराठीमध्ये होते असे, की दरवर्षी किमान १५-२० पुस्तके महत्त्वाची ड्ढ लक्षणीय अशा स्वरूपाची असतात, परंतु त्यांची दखल घेतली जातेच, असे होत नाही. मला आठवते त्याप्रमाणे भ. मा. परसवाळे, सरिता पदकी, शरच्चंद्र चिरमुले, महावीर जोंधळे यांच्या नव्या आणि इतर अनेक पुस्तकांवर मी विस्ताराने लिहिले होते. तसेच बालकवी, तांबे यांच्या समग्र कवितेविषयीही लिहिले होते. बीडला पाच-सहा वर्षांची नोकरी पूर्ण झाली आणि जून १९७७ला मी मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात अधिव्याख्याता म्हणून रूजू झालो. बीडला असतानाच म्हणजे १९७६ साली माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला, माझ्यासारखेच अनेक नवे कवी आणि कथाकार होते, ज्यांना आपली निवडक अंतर्नाद २०३