पान:निवडक अंतर्नाद.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कमळी माझी दोस्त कशी झाली? तिचा तिरपागडेपणा माझ्यात नावालाही नाही. मी सरळ सगळ्यांसारखा विचार करणारा, सगळ्यांच्या भाषेत सगळ्यांना समजेल असं बोलणारा, लिहिणारा. ती ज्या प्रकारची लेखिका, त्यातला मी नव्हतो. स्वीकारलंय बरं का?' हे तिचं फॅड मी हसलो. ती म्हणाली, 'अरे, खरंच सांगते. असं असतंच. घरही आपल्याला स्वीकारतं किंवा नाकारतं. ' मी त्यावरनं थट्टा केली, पण ती बधली नाही. म्हणाली, 'तसं एखादं गावही आपल्याला स्वीकारतं किंवा नाही स्वीकारत.' तिनं उदाहरण दिलं. 'धुळ्याला होते, तर मी धुळ्याला स्वीकारलं होतं, पण धुळ्यानं मला स्वीकारलं नव्हतं. पुढे भिवंडीला आले, तर भिवंडीनं मला स्वीकारलं, पण मी नाही तिला स्वीकारलं.' असा सगळा वेडपटपणा! आणि त्या भावनांवर त्या ती नोकरी सोडत, ते गाव सोडत, कुठं एका ठिकाणी त्या टिकल्याच नाहीत. नोकरी पेन्शनीला पात्र व्हायच्या अगोदरच सोडली. अनेक ठिकाणी नोकऱ्या झाल्या. त्यामुळे सोडल्यावर कसल्याही तऱ्हेचे फायदे मिळाले नाहीत, काय म्हणावं या अव्यवहारीपणाला ? पुढे त्यांनी पुणं सोडलंच. सांगलीला गेल्या. भाच्यानं जुनी इमारत पाडून नवी बनवलेली. त्यात कमळीला स्वतंत्र खोली. सांगलीला तिचं बस्तानच बसलं. तिथल्या तरुण कविलेखकांमध्ये ती जाऊ- येऊ लागली. त्यांच्यात बसून चर्चा करू लागली. अधून- मधून त्या बाजूला जाणं झालं की वाकडी वाट करून भेटून यायचो. तिकडे त्यांचा पंचाहत्तरीनिमित्त सत्कार झाला. मी, विरूपाक्ष, उमाताई खास पुण्याहून गेलो होतो. मी तिचे वेळोवेळी फोटो काढलेले. ते मोठे करून संयोजकांकडे पाठवले. ते त्यांनी २०० • निवडक अंतर्नाद हौसेने हॉलबाहेरच्या भिंतीवर लावून छोटे प्रदर्शनच भरवलं. इतके लोक बोलले अगदी भरभरून तिचा खरा गौरव सांगली - मिरजकरांनी केलाय. महाराष्ट्र त्याबाबतीत मागेच राहिला. मी अनेक फाउंडेशन्स, अॅकॅडम्या, सरकार यांना सुचवून पाहिलं. पण यश आलं नाही. (हे अर्थात कमळीच्या नकळत हां. नाहीतर तिनं मारलंच असतं!) तर तो कार्यक्रम मोठा हृद्य झाला. सुमित्रा - सुनीलने शूट केलेली ती मुलाखतही दाखवली. शेवटी या सगळ्याला कमळी काय उत्तर देते, त्याची उत्सुकता होती. पण ती बोलेचना. कुणी आग्रह केला तर म्हणाली, इतका वेळ (त्या फिल्ममध्ये) मी बोललेच ना, आणखी काय बोलायचं? परत गप्प, एखादीने ७५ वर्षांचा सुखदुःखांचा आढावा घेतला असता गुरुजनांविषयी कृतज्ञता, वगैरे, पण कमळी गप्पच, शेवटी म्हणाली, 'सगळं काय शब्दांतूनच व्यक्त होतं काय?' अशी ती कमळी, तेजस्वींच्या 'कर्वांलो' या कादंबरीच्या प्रेमात त्या पडल्या. आणि तेव्हापासून त्यांची उमा-विरूपाक्षांशी घट्ट मैत्री झाली. आम्ही बरोबर फिरायला जायचो. आमचा ग्रुपच जमला. मी त्याला 'चांडाळ चौकडी' म्हणायचो. कमळीच्या लग्न न करण्यावरूनही थट्टामस्करी व्हायची. ती म्हणायची, 'कोणी योग्य भेटला असता, तर केलं असतं लग्न,' मी म्हणालो, 'पण योग्य कोण ? एखादं उदाहरण ?' ती म्हणाली, 'महाभारत लिहिणारा व्यासच एक माझ्यासाठी योग्य