पान:निवडक अंतर्नाद.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल वि. स. खांडेकर यांचा सत्कार करताना खांडेकरांच्या डावीकडे वसंतदादा पाटील व उजवीकडे देवदत्त दाभोळकर सुरू केल्यावर खूप नंतर हे पुस्तक शरद जोशींनी वाचले, त्यांनी मला पत्र पाठवून "तुमच्या भावाने हा विचार शास्त्रीय पद्धतीने माझ्या आधी मांडलाय' असे कळवले! चारुदत्तचा आत्मविश्वास दांडगा. दादा कसे कसे चुकतात हे तो सांगत बसायचा, तो दादांच्या आधी वर्षभर गेला. पण त्याच्या वाटेला जायची माझी व नरेंद्रची कधी हिंमत झाली नाही. नरेंद्र- नरसिंहप्रमाणेच मुकुंद व चारुदत्त यांच्यातही सतत खटके उडत असत. मुकुंद मोठा शेतीतज्ज्ञ, प्रयोग- परिवारचा जनक, तासगावच्या द्राक्षक्रांतीचा प्रणेता. सगळे त्याला मानत, पण चारुदत्त त्यांच्याशी सतत वाद घालत असे. तोही शेतीतज्ज्ञ होता, पुढे आरे मिल्क कॉलनीचा प्रमुख बनला, शेती तोट्यातच का चालते हे त्याला उमजले होते. मुकुंदचे सगळे विचार कसे चुकीचे आहेत, शेतकऱ्यांना मागे नेणारे आहेत, हे तो दादांना पटवून द्यायचा! खरे तर मुकुंद व चारुदत्त यांची शेतीबाबतची मते एकमेकांना पटावयास हवी होती. पण नाही! नरेंद्र व नरसिंह परवडले ! दुसऱ्याच्या मांडणीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अपरंपार नुकसान कसे होईल हे ते दोघेही दादांना साक्षी ठेऊन सांगायचे! पण चारुदत्तचा मुकुंदला विरोध का हे मला ठाऊक होते! चारुदत्तचा खरा दादांना विरोध आणि दादांना मुकुंदचे भारी कौतुक, म्हणून चारुदत्तचा मुकुंदलाही विरोध ! दादा विचारस्वातंत्र्य आणि समन्वय या दोन गोष्टींचा आजन्म आदर करीत होते. दादा पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, पण आणीबाणीला 'अनुशासन पर्व' म्हणणाऱ्या विनोबाजींच्या आचार्य कुलाचेही आमंत्रित ज्येष्ठ सदस्य, पण आणीबाणीला विरोध म्हणून सुमनवहिनींनी आणि मेडिकल कॉलेजला शेवटच्या वर्षांला असलेल्या त्यांच्या मुलाने (म्हणजे प्रसन्नने, आता तो सायकिअॅट्रिस्ट आहे. हा मे. पु. रेगे यांचा जावई) सत्याग्रह करून तुरुंगवास पत्करला तेव्हा त्या दोघांना त्यांनी १९६ निवडक अंतर्नाद अजिबात विरोध केला नाही, हे तसे समजण्यासारखे होते. हा आणीबाणीविरुद्धचा सत्याग्रह त्यांच्या विचारात बसणारा होता. पण १९४८ साली दादा विलिंग्डन कॉलेजात प्राध्यापक होते त्यावेळी माझा भाऊ दीनानाथ हा त्यांच्याकडे राहून, कॉलेजात जात होता, तो संघाचा 'सेकंड इयर ट्रेंड वगैरे, परीक्षा जवळ आली असताना वर्ष बुडवून संघबंदीला विरोध म्हणून तो सत्याग्रहात उतरला. त्याने काही चूक केले असे तेव्हाही दादांना वाटले नाही. समन्वय शोधण्याची त्यांची अखंड धडपड मला आठवते. मी दिल्लीचा मुक्काम संपवून सातारला आलो होतो. क्षेत्र माहुली येथे प्रतिष्ठेचा न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार न्यायमूर्ती धर्माधिकारी यांना प्रदान होणार होता. पृथ्वीराज चव्हाण प्रमुख पाहुणे होते आणि अध्यक्ष होते दादा. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी आपल्या भाषणात कळत न कळत पृथ्वीराज चव्हाण यांच्या भाषणावर काही टीका केली. जमलेले खेडूत अस्वस्थ झाले. दादा अध्यक्ष म्हणून बोलायला उठले. हसतखेळत, संतवाङ्मयातले व विनोबाजींचे आधार देत, पृथ्वीराज चव्हाण व न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी नेमकी एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कशी समजावून दिली आहे हे सांगितले श्रोत्यांत बसलेले मी व नरेंद्र एकमेकांना म्हणालो, "आज दादांना मानले. आपल्या आयुष्यात हे जमायला हवे.” शेवटचे एक वर्ष दादा 'वॉटरबेड वर होते. बहुतेकवेळ गुंगीत असत. मात्र जो थोडा वेळ जागृतीचा असे त्यावेळी मेंदू सतेज व तल्लख असे. तरल विनोदबुद्धी कायम होती. वर्षांपूर्वी सांगली येथील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजचे निवृत्त प्राचार्य व प्राध्यापक त्यांना भेटावयास आले. म्हणाले, "तुम्ही सांगलीच्या चिंतामणराव कॉलेजचे प्राचार्य होता, त्यावेळी आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजात विद्यार्थी होतो. पण तरीही तुम्हांला ओळखतो. अधून मधून तुमच्या कॉलेजात यायचो.” देवदत्त शांतपणे म्हणाले, "तुम्ही माझ्या कॉलेजात येणारच ! तुमच्या कॉलेजात मुली नव्हत्या, माझ्या कॉलेजात होत्या!” एक किस्सा तर भन्नाट आहे. सहा महिन्यांपूर्वी आमच्या दाभोळकर परिवाराचे दोन दिवसांचे गेटटुगेदर होते. पारिवारिक गेटटुगेदर म्हणजे दाभोळकरी पद्धतीने व त्यात दाभोळकरी पद्धतीचे फिशपॉड्स दादांनी मला जवळ बोलावले. म्हणाले, "बंड्या, मला आता लिहिता येत नाही. तूच आता माझा एक फिशपॉड लिहून घे. फिशपाँड असा - दाभोळकरांच्या घरातील द्रौपदी कोण?” खरे सांगतो, फिशपाँड ऐकून मी हादरलो. माझा गोंधळलेला चेहरा पाहून दादा म्हणाले, "तू का चिंता करतो आहेस, त्या फिशपाँडच्या खाली मी सही करणारे!” - मी अजून हादरलेलाच होतो, मी म्हटले, "दादा, तुमची सही वगैरे ठीक आहे. पण कोण ही ? जरा अंदाज द्या, आपण उत्तरावर जरा चर्चा करू, " दादा म्हणाले, "तू या घरातला, उत्तर तुला माहीत पाहिजे, " मी जरा सावध झालो, म्हटले, "दादा, आपलं खटलं मोठं. तुमच्यात आणि नरेंद्रच्यात २६ वर्षांचं अंतर आहे. तुम्ही पहिले, तो दावा, मी आठवा. त्यामुळे मी बाहेर नेहमी सांगतो, देवदत्त माझे लांबचे सख्खे भाऊ आणि नरेंद्र माझा जवळचा सख्खा भाऊ! आता या