पान:निवडक अंतर्नाद.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दादा दत्तप्रसाद दाभोळकर दिवसभर दीनानाथ त्यांच्या जवळ असे. त्याने दादांना विचारले, "दादा, परमेश्वर आहे की नाही याबाबत आज तुम्हांला काय वाटतं?" दादांचा चेहरा एकदम फुलला. म्हणाले, "तू प्रथम तुझं मत सांग. तुझं जे मत असेल त्याच्या विरुद्ध माझं मत. मग त्यावर आपण एक छान चर्चासत्र करू या. घरात जे आहेत त्यांना बोलाव!" आपले ज्येष्ठ बंधू आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. देवदत्त दाभोळकर यांच्याबद्दल आणि त्या निमित्ताने आपल्या इतर भावंडांबद्दलही लिहीत आहेत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, माझी आई ९४ वर्षांची होऊन गेली. शेवटची वर्षं दोन वर्षे वॉटर बेडवर होती. त्यावेळी देवदत्त मुलाला म्हणाले, "मलासुद्धा असं जगावयास आवडेल ड्ढ शेवटी जगण्यामध्ये ब्रह्मानंद!” पण त्यांच्या बोलण्यात नेहमी ग्यानबाची मेख असे वा नाथांच्या घरची उलटी खूण! त्याचवेळी म्हणाले, "मात्र याला एक पूर्वअट आहे. माणूस गेल्यावर 'सुटलो एकदाचा' असं त्या माणसाला आणि 'सुटलो एकदाचे' असं मनातल्या मनात इतरांना वाटण्यापूर्वी त्याने जावयास हवं आणि एकमेकांत गुंतलेल्या त्याला आणि इतरांना एकमेकांची मनं न बोलता समजली पाहिजेत.” आम्ही एकूण दहा भावंडे - सात भाऊ, तीन बहिणी, आमची आई म्हणायची, "मला दहा मुलं आहेत. एकासारखं दुसरं नाही आणि माणसासारखं एकही नाही!” अर्थात याला कारण आई- वडीलच असणार. कारण माझे वडील दत्तभक्त होते. अगदी दरवर्षी गाणगापूरला जाऊन पारायण करायचे. आई कोल्हापूरची, मराठी चौथीपर्यंतच शिकलेली. पण चौथीच्या परीक्षेत ती संपूर्ण कोल्हापूर राज्यात पहिली आली होती. तिच्यावरचे संस्कार कोल्हापूरचे. छत्रपती शाहू महाराजांचे. ती त्या काळात घरी मंगळसूत्र घालायची नाही, कुंकू वगैरे लावायची नाही. मंगळागौर, हळदीकुंकू, सत्यनारायणाची पूजा वगैरे म्हणजे काय हे आम्हांला घरी कधी बघावयास मिळाले नाही. मात्र घरी वडिलांच्या पारायणाचे ती सर्व अगदी व्यवस्थित करायची- कुंकू न लावता, मंगळसूत्र न घालता. आज कळायला लागल्यावर या सर्वांचे आश्चर्यच वाटते. कारण आईवडिलांचे अगदी मेतकूट होते किंवा गुळपीठ. त्यांच्यात काही वैचारिक मतभेद असतील पण वैचारिक मतभेदामुळे ताणतणाव येणार, असे कुठे काहीच नाही. एक शक्यता जाणवते. अध्यात्म, देव, विज्ञान, पुरोगामी वृत्ती या गोष्टी जर मनात नीट कळलेल्या असतील तर माणूस सर्वप्रथम समोरच्या केवळ वेगळ्या नव्हे, तर विरोधी मत असलेल्या माणसाचाही आदर करावयास शिकणार आणि आपल्याला घर चालवायचेय, मुलांना वाढवायचेय, आयुष्यातील हे एकमेव किंवा प्रमुख ध्येय आहे, हे मनाशी पक्के केल्यावर असल्या फिजूल १९४ निवडक अंतर्नाद - गोष्टींची माणूस पर्वा करीत नसणार, आपले आचार्य अत्रे संयुक्त महाराष्ट्राच्यावेळी जे म्हणाले होते, 'चवलीच्या भांडणासाठी बंदा रुपया गमावू नका' हे मराठी माणसाला समजले पाहिजे - ते माझ्या आईवडिलांना समजलेले असणार. पण या अशा 'संस्कारां' मुळे आमच्या घरात गंमत आहे. नरेंद्र माझ्याहून धाकय भाऊ, तो काय करतो (किंवा काय करत नाही!) हे सर्वांना माहीत आहे डॉ. नरसिंह हा माझ्याहून लगेचचा मोठा भाऊ. तोपण एम्. डी. वगैरे आहे. मुंबईच्या सायन मेडिकल कॉलेजचा डीन वगैरे होता, पण नरेंद्र करतो त्याच्या संपूर्ण उलट तो करीत असतो. सर्व व्रतवैकल्ये निष्ठेने महाशिवरात्रीला या वयातही तो पूर्ण दिवस पाणीसुद्धा घेत नाही. देवदर्शनाच्यावेळी चैन करावयाची नसते, म्हणून दर महाशिवरात्रीला मुंबईहून एस. टी. ने सातारला येऊन, यवतेश्वरला जाऊन, शंभोचे दर्शन घेऊन, दुसरे दिवशी सकाळी पुन्हा तोंडात पाण्याचा थेंबही न घेता एस. टी. ने मुंबईला, तेथे घरी गेल्यावर मग पाणीग्रहण ! दत्तजयंतीला पुन्हा हेच सातारला येऊन माळावर वडील ज्या दत्ताच्या दर्शनाला जायचे त्या दत्ताचे दर्शन घेऊन परत. त्यातून सातारचा त्याचा मुक्काम नरेंद्राच्या घरी ! तो जगभर हिंडतो आणि आमचे वेद सारे मानवी शरीर आणि मन आधीच कसे अधोरेखित करून गेलेत हे इंग्रजीत समजावून देतो! मी या दोघांच्या मध्ये 'सॅन्डविच' होऊनही वाचलेला, पण आमच्या घरात हे असे वाचणेही खरे नव्हे. आमच्या थोरल्या बहिणीने मृत्यूपूर्वी तिच्या सर्व संपत्तीचा एक ट्रस्ट केलाय, बाकी उरलेले भाऊ-बहीण ट्रस्टी त्या आमच्या काऊचिऊच्या छोट्या ट्रस्टची वार्षिक सभा सुरू होती. देवदत्तांनी एक ठराव मांडला - "नरेंद्रला सा, रे पाटील यांनी मोटार दिली आहे. पण तो साधनेकडून मानधन घेत नाही. दर महिन्याला त्या गाडीचा चालक व इंधन यासाठी ट्रस्टने चार हजार रुपये द्यावेत." ठराव नरसिंहने व्हेटो वापरून फेटाळला, तो म्हणाला, "अं. नि. स. सारख्या समाजविघातक कृत्याला हा ट्रस्ट मदत करणार असेल तर मला विश्वस्तपदाचा राजीनामा द्यावा लागेल !” देवदत्तांची आठवण येताना हे सारे आठवण्याचे कारण