पान:निवडक अंतर्नाद.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकदम नजरेत भरत गेले व मनात ठसत गेले. कवितेतील अनुभूती उसनी नव्हती. सवंग अनुकरणातून आलेली नव्हती. अभिव्यक्ती ही अशीच स्वतंत्र होती. तिच्यावर त्याच्या आगळ्या अस्तित्वधर्माची मुद्रा होती, रूढ चाकोरी नाकारून वेगळ्या दिशेने विचार करणाऱ्या त्याच्या मनाला कवितेच्या रूपाने मुक्त श्वासोच्छ्वास करण्याचे एक केंद्र उपलब्ध झाले. विशेष म्हणजे त्याने कवितेशी गळेपडूपणा केला नाही. कविताच जणू याच्या गळ्यात पडली. आपल्या सर्व विभ्रमांसह ती याला वश झाली. कवितेवर याचे खरेखुरे प्रेम जडले. तिची अकृत्रिम निसर्गावस्था याला लोभावून टाकू लागली. मग ती कविता जुनी असो की नवी असो, किंवा कोणत्याही भाषेतली असो, पण यावनी कविता याला विशेष मानवली. त्यातही इराणी इष्कातली नजाकत अधिक भावली. उर्दू शायरांचा निस्संग बेदरकारपणा याच्या पिंडाशी जुळणारा होता. प्राचीन भारतीय काव्यातील राधाभाव व गोपीबंध याला विलोभनीय वाटले. अवैध प्रेमात एक बेबंद धुंदी असते, निःशेष समर्पणाची ओढ असते व स्वेतर जगाविषयी एक उन्मत्त बेफिकिरी असते. परस्परांच्या भावव्यूहाला व देहसौंदर्याला न्याय देण्याची सहृदयता व मर्मज्ञता असते, उभय देहांच्या कणाकणाला कृतकृत्य करणारी आस्वादक क्षमताही असते. हे प्रेमविश्व निष्ठेच्या सरहद्दीपलीकडे असते. तिथे उत्कटता व हळुवारपणा यांचीच नांदणूक असते. दोबळपणा आला नाही. आपले मूळ घराणे त्याची कविता विसरली नाही. सर्वजनसुलभ होण्याच्या दृष्टीने तिने अर्थसुगमतेचे पथ्य सांभाळले. दाद मिळण्याजोगे प्रासांचे नादसौंदर्यही जपले. तिला आपोआपच सुभाषितप्रायता लाभली. आणि लोकांच्या ओठी रुळण्याची हमीही देता आली. पण यामुळे भावकवितेतली अलवार अनुभूती व तेवढीच सुकुमार अभिव्यक्ती उत्तरोत्तर दुर्मिळ होत गेली. हे सर्व जाणिवेच्या पातळीवरच असेल, असे नाही, पुष्कळदा हे नकळतही घडून येत असते. तरीही समूहाच्या तात्काळ प्रतिसादाचा मोह वाढत चालल्याची चाहून त्यातून मिळाल्याशिवाय राहत नाही. पण याचे वैशिष्ट्य असे की, याच्याबद्दलची रसलुब्धता निःशब्द राहण्यास राजी नव्हती. ती बोलघेवडी होती. आवडलेल्याची पुन्हा पुन्हा मोठमोठ्याने आवर्तने करण्याची तिला हौस होती, आवडलेल्या जागांवर दाद देण्यात व घेण्यात तिला खुशी होती. परिणामी कविता स्वसंवेद्यतेचे कुंपण ओलांडून स्वत:च एक रंगकला बनून गेली. याचे हेही कार्यक्रम तुफान यशस्वी झाले. व्यावहारिक दृष्ट्याही लाभदायक ठरावेत, इतकी लोकमान्यता त्याने एव्हाना संपादन केली होती. याचा अर्थ सर्वसाधारण समाजाची अभिज्ञतासुद्धा वाढवण्याचे काम याच्या काव्यदर्शनाला साधले होते. परिणामी भावकवीचा स्निग्ध उंबरठा ओलांडून याने लोककवीच्या विशाल प्रांगणात प्रवेश केला. हळूहळू तो तिथे स्थिरपद झाला, पण तरी त्याच्यामध्ये शाहिरीचा या वाढत्या प्रतिसादाची एक झिंग असते. ती मस्तकात जाऊन भिनली, की प्रौढत्वी निजशैशवास जपणे हा कवीचा बाणा हळूहळू सैल पडत जातो. तसे याचे झाले असेल काय? आपण जे निर्माण केले, जे भरभरून लोकांना दिले, नामांकित कलावंतांनी आपल्या स्वर्गीय सुरांवर जे तोलून धरले आणि ज्यामुळे असंख्यांच्या गद्य जीवनाला रोमांचित होता आले, त्याची तृप्ती मनावर चढली असेल काय ? एक अलंबुद्धी उत्पन्न झाली असेल काय? त्याच्यामुळे वृत्ती अधिकाधिक बहिर्मुख होत गेली असेल काय ? वर्तमानावर अनाहुत भाष्य करण्याची सुरसुरी त्यातूनच वाढली असेल काय ? या गुणांमुळे याची कविता लोकप्रिय ठरू लागली. कविता न कळणाऱ्या लोकांनाही याच्यावरील प्रेमामुळे ती आवडू लागली, कविता कळणाऱ्यांना ( याच्या वागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे) आस्वादसमयी भुरळ घालू लागली. याचे कवितेचे सादरीकरणही सुरेल व प्रत्ययकारी असल्यामुळे त्याच्या लोकप्रियतेचे क्षेत्र विस्तीर्ण होत गेले. ते वाढायला याच्या लोकसंग्रहाची अर्थातच मदत झाली. काव्याच्या क्षेत्राबाहेरील लोक आशयाच्या व अभिव्यक्तीच्या आगळेपणामुळे याच्या कवितेवर फिदा होऊ लागले. त्या काव्यलुब्धांमध्ये राजकारणातील महनीयांचा समावेश झाल्यामुळे संपादकत्वाखाली 'युगवाणी'ने त्यांच्यावर विशेषांक काढला होता. याची लौकिक प्रतिष्ठाही ओघानेच उंचावत गेली. रसिकता एरवी मूक असते. घेतलेल्या आस्वादाची ती स्वतःशीच चर्वणा करीत असते. अशा रवंथ करण्यानेच तिच्या लेखी आस्वादाची लज्जत वाढत असते. कविता अधिकाधिक आपलीशी होत जाते. तिला आपल्या वशीकरणाचा व वशीभवनाचा बोभाटा व्हायला नको असतो. याच्या व्यक्तित्वाचे दोन भाग याच्या कवितेच्या शैशवापासून मी अनुभवीत आलो आहे. त्यावेळी याच्या कविता रचनासौंदर्याच्या दृष्टीने आकर्षक वाटत. पण त्यामध्ये जीवनाबद्दलची खोल उमज उमटायची होती. अनुभवाचा एकेरीपणाच त्यातून जाणवायचा, याची पहिली कविता मी १९५० च्या सुमारास केव्हातरी 'युगवाणी' मध्ये वाचल्याचे आठवते. आमच्या प्रा. दिवाणजींचा अपघाती मृत्यू झाला होता. विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय कार्यालय त्यावेळी अमरावतीला होते. दिवाणजी त्याचे सरचिटणीस होते. वामनराव चोरघड्यांच्या त्यात याची कविता मी पहिल्यांदा वाचली. त्या कवितेत दिवाणजींच्या मृत्युमुळे शारदेच्या पायातील पैंजण गळून पडल्याची कल्पना केली होती. त्या ओळीने या माणसाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. तोपर्यंत जगावर सतत थुंकणारा फाटक्या तोंडाचा एक पांगळा माणूस म्हणूनच मीही त्याच्याकडे पाहत होतो. पण या कवितेने त्याच्या अस्ताव्यस्त अस्तित्वावरील सहृदय मन मला दाखवले आणि त्याच्या माझ्यातील जवळीक वाढवली. त्यानंतर त्याच्यातील कवीशी जसजसे माझे सख्य वाढत गेले, तसतशी त्याच्या आडदांड व्यक्तिमत्त्वातील एका भाबड्या माणसाशी माझी सलगीही वाढत गेली. त्याच्या कुटुंबाशी घरोबाही वाढला. पुढे केशवराव भोळ्यांच्या आत्मचरित्रात याच्या वडिलांचे व्यक्तिचित्र वाचले. आणि याच्या राहण्याच्या व वागण्याचा उगम सापडला. याच्या कवितांचा मला नादच जडला. त्यांचा संग्रह मी माझ्या हस्ताक्षरात लिहून काढला. त्यातील काही ओळी मला अजून आठवतात : पुन्हा पातलो आज दारी तुझ्या जुनी बाळगोनि उराशी व्यथा निवडक अंतर्नाद १८३