पान:निवडक अंतर्नाद.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाबा ज्या तऱ्हेने सांगायचे, ते मुलाला पटायचे. ते तसे काळजीत तर दिसायचे नाहीत. त्यांचा आवाजही साधा- समजुतीचा असतो नेहमी पण तरीही ते रात्रभर एका साध्या- अवघड अशा खुर्चीत बसून कसला विचार करतात, त्यांना काही चिंता आहे का असा विचार मुलाचा पिच्छा सोडत नाही. पुन्ह्य तेच प्रश्न, पुन्हा त्याला तशीच उत्तरे, बाबांची बुद्धी क्षीण होते आहे असे नाही, त्यांची प्रकृती उत्तम आहे, मित्रांत ते चांगले बोलतात. वर्तमानपत्र ते चवीने वाचतात. राजकीय घटनांबद्दल त्यांची स्वत:ची अशी मते असतात. कुठेच काही बिघडलेले नसते. कुटुंबाची आर्थिक स्थितीसुद्धा तशी बऱ्यापैकी असते. एवढे असताना बाबा रात्री का बरे एकटेच बसून असतात स्वयंपाकघरात अंधारात ? नुसतेच बसून एकदा अगदी तळमळीने तो बाबांना विचारतो - "काही बिघडलंय का बाबा?” "नाही बेटा, काहीच नाही." "मग तुम्ही इथे एकटे का बरं बसून असता? विचार करता उशिरापर्यंत...” "निवांत वाटतं बेटा, मला आवडतं. " मला कसे अधांतरी वाटत राहते. उद्या पुन्हा ते इथे बसतील. मी पुन्हा संभ्रमात पडेन. काळजी वाटेल मला. आता मी थांबणार नाही. आता मला राग येतोय. "ठीक आहे, तुम्ही कशाबद्दल विचार करता ते सांगा नं बाबा ! तुम्ही का असे बसून असता इथे ? तुम्हाला कशाची काळजी वाटते? काय विचार करता?" "मला कशाची काळजी नाही बेटा. मी व्यवस्थित आहे. निवांत आहे. जा, झोप जा." बाबा जे काही सांगतात, ते एवढेच एकदा मुलाला तान लागते. (त्याला फार तहान लागते, नेहमी पाणी प्यायला तो जात असतो.) स्वयंपाकघरात नेहमीप्रमाणे अंधार असतो. नळ हाताला लागत नाही, तसा तो दिवा लावतो आणि बाबा जणू धक्का बसल्यासारखे सावरतात. दिवा बंद करायला सांगतात. कारण हिंदी कथेतले वातावरण ओळखीचे आहे. आईबद्दल सगळ्यांचा असा अनुभव तसा सारखा असतो. मात्र इंग्रजी कथा... आपण दोन्ही कथांचा विचार करायला लागतो. सहसा कथेमध्ये, शेवटच्या भागात कथेला एक गती आलेली असते. काही उलगडा तरी होतो, किंवा घटनांना असे वळण लागते, की कथा संपल्यावर त्या सगळ्या मजकुराला एक छान असे कथारूप आलेले दिसते. आपण 'कथा' वाचली असा अनुभव येतो. (यानिमित्ताने मी नमूद करून ठेवलेले आहे, की कस्तुरीमृगाच्या बेंबीमध्ये जशी कस्तुरी असते जिथे असते, तसेच कथेचे असते. कस्तुरीचा जसा दरवळ, तसा त्या कथेच्या आशयाचा; ज्यामुळे ती कथा आपल्याला जाणवत राहते.) इंग्रजी कथा अशा स्वरूपाची आहे. यात कथेच्या उत्तरार्धात कथनाला तसे वळण लागले, आणि १७२ निवडक अंतर्नाद - विचारले, तेव्हा सांगतात, "हेच बरं वाटतं. मला प्रकाशात बसणं अवघड वाटतं. लहान असताना, आम्ही युरोपमध्ये होतो, तेव्हा आमच्याकडे वीज नव्हती...' " आणि तिथे या मुलाला अंधूक आठवते. तो सांगतो, - कथेच्या निवेदकाला काहीतरी '... ऑस्ट्रियामधल्या बाबांच्या लहानपणाच्या त्या हकिकती मला आठवू लागल्या... तांबड्या पेटलेल्या निखाऱ्यांची, रुंद अशी भट्टी असलेली ती खानावळ मला दिसू लागली. त्या भट्टीमागे माझे आजोबा उभे आहेत... रात्र वाढत चाललेली गिऱ्हाइकं निघून गेलेली.... आणि त्याला डुलकी लागत असलेली... विस्तवाचा तो गालिचा मला दिसतो आहे. भडकलेल्या ज्वालांचे आता विझत चाललेले ते निखारे... परिसर अंधाराचा अधिकच दाट अंधाराचा होत चाललेला... एक लहान पोरगा... पानांच्या डहाळ्या फांद्यांनी बनविलेल्या बिछान्यावर गुडघ्यात वाकून बसलेला... बाजूला ती मोठी- लांबट अशी भट्टी त्या विझत चाललेल्या विस्तवावर रोखलेली त्याची ती नजर... नजरेतली ती चमक... हा लहान पोरगा म्हणजेच माझे बाबा स्वैपाकघराच्या दाराशी उभं राहून बाबांकडे पाहताना हे सगळे भूतकाळाचे क्षण मला जाणवले.' गंमत अशी, की बाबांच्या तशा अंधारात बसून राहण्याच्या सवयीचा उलगडा आता झाला, तरी मुलाला एक प्रश्न अस्वस्थ करीत असतोच. आपल्या खोलीकडे जाताना, पोरगा परत फिरतो. पुन्हा दारात थांबतो, परत मुलाचे बाबाचे संवाद होतात, "पण तुम्ही कशाचा विचार करता बाबा?” मी विचारले. दूरवरून आल्यासारखा बाबांचा आवाज आला, शांत स्थिर असा... "काहीच नाही, काहीच तर नाही..." बाबा म्हणाले. आणि कथा तिथेच थांबते. बाबांच्या अंधारात बसून असण्याचे कारण मुलाला अंधूक का होईना, कळू लागले. तरीही बाबा कशाचा विचार करतात, हा प्रश्न शेवटी लेखकाने आपल्यावर सोडला आहे. - मला ही कथा आवडली, ती त्या कुतूहलापोटी ते वातावरण, बाबांचे व्यक्तिचित्रण – यांमुळे. पण त्यांच्या सवयीचा जो संदर्भ आहे, त्यांच्या लहानपणातल्या अनुभवाचा झोपेला आलेला, तो छोटा पोरगा, त्याची नजर भट्टीतल्या त्या विझत चाललेल्या विस्तवावर खिळून असलेली... त्याचा असा संबंध, हे सगळं 'रोमँटिक' वाटू लागले. नेटवर या कथेवर सविस्तर चर्चा आहे. इतकेच काय, -