पान:निवडक अंतर्नाद.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुटका विलास पाटील "कथाबीजातून कथा निर्माण होण्याची प्रक्रिया एवढी सूक्ष्म, तरल आणि धुक्याआडची असते, की त्याचा नेमका शोध घेणं लेखकालाही अवघड होऊन बसतं. पण एकमात्र खरं, की त्याच्या मनात जे कथाबीज पडतं, त्याचं स्वरूप आणि त्यातून निर्माण झालेली कथा या दोन्हींचं निरीक्षण नक्कीच मनोरंजक आणि काहीसं कुतूहलपूर्ती करणारं असू शकतं.” सुटका ही कथा आणि तिची निर्मितिप्रक्रिया. प्रास्ताविक लेखकाला कथा सुचते तरी कशी? याबद्दल वाचकाच्या मनात एक कुतूहल असतं. तसं ते लेखकाच्या मनातही असतं. पण त्याचा तो खोलवर शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्याची त्याला जरुरीही वाटत नाही, कारण, जेव्हा एखादी घटना, एखादा प्रसंग तो पाहतो, तेव्हा त्याच्या मनात खोलवर कुठेतरी एक बीज पडतं. या बीजाचं कथेत रूपांतर होत असताना लेखक सजग नसतो आणि तसा तो असणं जरुरीचंही नसतं. त्या बीजातून कथा आकार घेताना लेखकानं जर अभ्यासकाची भूमिका घेतली, तर त्याच्या कथालेखनाच्या तल्लीनतेला धक्का बसण्याची शक्यता असते. एकाच वेळेला तो कथालेखन करणारा निर्माता आणि तो सारा व्यापार दुरून न्याहाळणारा प्रेक्षक म्हणून वावरणं, त्याच्या एकतानतेला, तल्लीनतेला बाधा आणणारं ठरू शकतं. शिवाय, कथाबीजातून कथा निर्माण होण्याची प्रक्रिया एवढी सूक्ष्म, तरल आणि धुक्याआडची असते, की त्याचा नेमका शोध घेणं लेखकालाही अवघड होऊन बसतं, पण एकमात्र खरं, की त्याच्या मनात जे कथाबीज पडतं, त्याचं स्वरूप आणि त्यातून निर्माण झालेली कथा या दोन्हींचं निरीक्षण नक्कीच मनोरंजक आणि काहीसं कुतूहलपूर्ती करणारं असू शकतं, तेव्हा त्या दृष्टीनं माझ्याच एखाद दुसऱ्या कथेचं कथाबीज मला कसं गवसलं आणि त्यातून निर्माण झालेली कथा कशी होती हे वाचकाला कळावं, म्हणून वानगीदाखल एका कथेचा जन्म आणि प्रत्यक्षात ती कथा वाचकांपुढे ठेवणं मला अगत्याचं वाटतं, त्यासाठी मी निवडलेली कथा आहे 'हार्टफेल!' या कथेचं बीज कसं माझ्या मनात पडलं आणि त्यातून निर्माण झालेली कथा कशी होती हे इथं प्रत्यक्षातच मांडतो आहे. पुण्यात राहायला आल्यावर मी डेक्कनवर फ्लॅट घेतला. पेपरमध्ये जाहिरात पाहून मी फ्लॅट पाहायला गेलो, तेव्हा बांधकामाला नुकतीच सुरुवात झाली होती. ते १९९९ साल असावं, फ्लॅट तयार झाला आणि २००० साली मी राहायला आलो. खरं तर या अपार्टमेंटमध्ये निवासी रहिवासी मी एकटाच होतो. बाकी सारी ऑफिसेस होती. मला कोणी शेजारी नव्हता. 'निदंकाचे घर असावे शेजारी', असं जरी तुकोबांनी म्हटलं असलं तरी ते माझ्या भाग्यात नव्हतं. शेजारी नव्हता हे खरं; पण सोबत करायला वॉचमन होता आणि बिल्डरनं त्याला पत्र्याचं घर उभं करून दिलं होतं. त्यात तो सहकुटुंब राहत होता. त्यानं एक कुत्र्याचं पिल्लू पाळलं होतं. त्या पिलाला जन्मजातच शेपटी नव्हती, शेपटीच्या जागी खडूएवढा तुकडा होता. शेपटी कापलेले कुत्रे मी पाहिले होते; पण मुळातच शेपटी नसलेला कुत्रा मी प्रथमच पाहत होतो. कुत्र्याची शेपटी का कापतात हा माझ्यापुढचा प्रश्न होता. पण कुणीतरी सांगितलं, की पुढे जबरदस्त कुत्रा भांडायला आला की साधारण कुत्रा आपली शेपटी मागच्या दोन पायात घालतो आणि पळ काढायला बघतो. त्याची शेपटी ही त्याच्या शरणागतीची निशाणी असते. आपण पाळलेला कुत्रा असा शरणागतिप्रिय होऊ नये, म्हणून कुत्र्याचा मालक त्याची शेपटीच कापून टाकतो. परिणामी, तो कुत्रा शरण न जाता लायला सज्ज होतो. त्याच्यापुढे दुसरा पर्यायच नसतो. थोडक्यात, कुत्र्याला लढवय्या करण्यासाठी मालक त्याचे पळून जाण्याचे मागचे दोरच कापून टाकतो. हे दोर म्हणजेच कुत्र्याची शेपटी असते. या कुत्र्याच्या पिल्लाचं नाव वॉचमनने 'रॉकी' असं ठेवलं होतं. त्या पिल्लाला वॉचमन खाऊपिऊ घालून मोठा करत होता. आमच्या अपार्टमेंटमध्ये ऑफिसेस असल्यानं लोकांचा वावर होता. त्यांना चावून उपद्रव देऊ नये, म्हणून वॉचमन कुत्र्याला दिवसभर बांधून ठेवत असे. रात्री रॉकी साखळीतून मोकळा होई. हळूहळू लक्षात यायला लागलं की कुत्रा भलताच कडक आहे. तो कधी कुणाच्या अंगावर जाईल आणि पिंडरीचा लचका निवडक अंतर्नाद १३१