पान:निर्माणपर्व.pdf/200

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आज राजस्थानातील जनताशासन नवीन आहे. उत्साही आहे. एरव्ही सुस्त असलेली नोकरशाहीही या शासनाने हलविली आहे; पण मूळ स्वभाव केव्हाही जागा होऊ शकतो. तो जागा होऊ द्यायचा नसेल तर नोकरशाही, लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक असा त्रिकोण जमला पाहिजे. वृत्तपत्रांचा सतत जागरूक पहाराही हवा. जयप्रकाशांना अभिप्रेत असलेला संपूर्ण क्रांतीचा दुसरा टप्पा ही योजना ठरणार असेल तर ही सर्व सांगड जमविली पाहिजे. नाही तर ही अन्त्योदय योजना म्हणजे बिरबल-बादशहाच्या गोष्टीतली ती खिचडीच ठरेल. भांडे वर आढ्याला, शेगडी जमिनीवर, आच पोचणार कशी, खिचडी होणार केव्हा, भूक भागणार की आणखी भडकणार ?

जुलै १९७८

मुक्काम जयपूर, राजस्थान । १९९