भाऊसाहेबमहाराज उमदीकर
यांचें निर्याण.गुरुवार, माघ शुद्ध ३ शके १८३५.
(तारीख २९ माहे जानेवारी, सन १९९४).
संपलेसें वाटे अवतारकार्य । म्हणोनिया काय त्वरा केली ॥ १।।
जातों म्हणोनिया सागितलें आधी । सर्वही उपाधी त्यागियेली ॥२॥
शिष्य विनविती आपणासी जाणें । मागें भक्ति कोणें चालवावी ॥३||
तुम्हांसी हो त्याची काय चिंता | भक्ति चालविता देव असे ||४||
चिंता केली तरी होईल तें होतें | कदा चुकेना ते देवकाज ||५||
ऐसें वदोनिया वाणी बंद केली । आंत नामावळी चाललीसे ||३||
नाम चालवीलें एकादश दिन । भोजनजीवन त्यागियेलें ||७||
माघ शुद्ध तृतीया दिन गुरुवार | रात्र एक प्रहर झाली असे ||८||
शिष्य मिळोनिया करिती भजन | सप्रेम जीवन डोळां लोटें ।।९।।
भजनाचे अंती विठ्ठलगर्जना । अतिप्रेम जाणा चाललीसे ।।१०।।
कापुराची ज्योती निमतां देखोनि | टाळी वाजवूनी देह सोडी ॥ ११॥
सोडी देह आमुचा धन्य गुरुनाथ | ज्योतीमध्ये ज्योत गुप्त झाली ||१२||