पान:नित्यनेमावली.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७०

कायम वर्गणीदार असे आजमितीस १३० जण झाले आहेत. त्यांना आता विनावर्गणी हे त्रैमासिक मिळते. प्रत्येकी ३०० रु. देऊन या संस्थेचे तहहयात ( Life member ) असे आजमितीस १०१ समासद झाले आहेत; त्यांना संस्थेंचे त्रैमासिक विनावर्गणी मिळून दरवर्षी प्रसिद्ध प्रसिद्ध होणारी पुस्तकें ही विनामूल्य मिळतात. शिवाय ५०० रु. हून अधिक रक्कम देणगी रुपानें देऊन आश्रय दाते ( Donor ) असलेल्यांची संख्या ७५ आहे. त्याना तहहयात सभासदाप्रमाणें सर्व सवलती मिळतातच आणि त्याशिवाय त्यांच्यातर्फे ट्रस्टी म्हणून एक इसम निवडला जावून, तो व्यवस्थापनामध्येही भाग घेत असतो. किरकोळ देणगी देणाऱ्यांची संख्याही चांगलीच आहे. अशा रीतीनें जनतेकडून सहकार्य मिळत आहे आणि संस्थेच्या उद्देशास अनुसरून हळू हळू कार्य वाढत चालले आहे.

 श्री. काकासाहेब तुळपुळे यांच्यासारख्या श्रेष्ठ