या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६
आणखी उरलेली जवळजवळ १२ एकर जमीन काय करू असा प्रश्न श्रीमंत राजेसाहेबांनी केला. ही जमीन श्रीगुरुदेव रानडे यानां देण्यात यावी असें श्री. परूळेंकर यानी सुचविले आणि ही विनंती मान्य करून श्री. राजेसाहेबानीं ती जमीन श्री गुरूदेवांना दिली. त्याप्रमाणे बेळगावच्या कलेक्टरना आक्टोबर १९५० मध्ये कळविण्यात आले.
पुढें मार्च १९५२ मध्ये श्रीमंत राजेसाहेबानीं बेळगाव येथे या देणगीबद्दल जरूर ते कागदपत्र नोंद करून दिले. नंतर लगेच श्री गुरूदेवानीं या जमिनीबद्दल एक सार्वजनिक विश्वस्थनिधी ( Public Trust ) नोंद करून, त्या संस्थेस “अकॅडेमी ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी अन्ड रिलीजन, बेळगांव " असे नांव दिलें. आपण स्वतः त्या संस्थेचें ट्रस्टी झाले आणि संस्थेचें ध्येय व उद्देशही त्यानींच खालील प्रमाणें ठरवून टाकले.
(A) To work for the spiritual unity of