Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 याप्रमाणें माईचें मर्दन केलें. म्हणून रेवणसिद्ध हे त्या प्रांती ' काडसिद्ध' या नांवाने प्रसिद्ध झाले. “कानडींत 'काड' धातूचा अर्थ त्रास देणें, छळणे असा आहे. 'माईगे काडिदा ' म्हणजे माईस छळलें म्हणून त्यास ' काडसिद्ध' असें नांव पडलें ; " ( सन्मार्ग वैभव ). ' काडसिद्ध ' या शब्दाचा अर्थ कोणी 'काड म्हणजे वनांत राहून सिद्धदशेप्रत पावलेले असा करितात. ' सन्मार्गवैभव ' कर्त्यांनी असे म्हटले आहे कीं, रेवणसिद्ध व काडसिद्ध यांचा उल्लेख स्कंदपुराणांत शिवपार्वतीसंवादात आहे. प्रस्तुत लेखकानें तो ग्रंथ अद्याप पाहिला नसल्यानें त्याबद्दल विशेष कांहींच लिहितां येत नाहीं. रेवणसिद्धांपासून मरुळसिद्ध व मरूळसिद्धांपासून काडसिद्ध झाले, असे त्यांत वर्णन आहे असे म्हणतात. कांहीही असो, रेवणसिद्धच काडसिद्ध या नांवानें प्रसिद्ध झाले असोत, किवां रेवणसिद्धांपासून काडसिद्धांची उत्पत्ति झाली असो, एवढे निश्चित आहे की, रेवणसिद्ध व काडसिद्ध या उभयतांत परस्पर निकट संबंध आहे. यांच्या परस्परसंबंधाचा पूर्ण इतिहास पुढील पुस्तकांवर टाकणें जरूर आहे:

 वरील विवेचनावरून वाचकांच्या लक्षांत येईल कीं, मत्स्येंद्रनाथ व रेवणसिद्ध यांचाही परस्पर अत्यंत निकट संबंध आहे. मस्स्येंद्रनाथांच्या सांप्रदायांत गोरक्षनाथ, गंनीनाथ, निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, विसोबा खेचर, नामदेव इत्यादि प्रसिद्ध