Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कै. ना० गोखले
यांचें चरित्र.

उपोद्घात.

 "Hope, faith and chairty- these are the three graces we must all cultivate, and if we keep them ever in mind and hold steadily by them we may be sure that we may still regain our lost position and become a potent factor in the world's history."

M. G. RANADE.
1894. Madras.

 कोणतीही परिस्थिति फार वेळ टिकत नसते. काळ हा बहुरूपी आहे. तो क्षणांत उग्र रूप धारण करितो तर क्षणांत फुलाप्रमाणें हंसतो. कांहीं राष्ट्रे अवनतीच्या खोल दरीत लोटून देतो तर दुसरीं राष्ट्र उन्नतीच्या उत्तुंग शिखरांवर चढवितो. त्याचा हा नेहमींचा खेळ आहे. त्याची ही लीला अगम्य व अगाध आहे. त्याची स्वतःची एकरूपता असली तरी त्यास इतरांची पाहवत नाहीं. कोणतीही वस्तु एकाच स्थितीत ठेवणें हें त्याच्या जिवावर येते. लोकांस रडविणें वा खुलविणें, दोन्ही कामांत त्यास सारखाच आनंद वाटतो; दोन्ही कृत्यांत तो रमतो. परंतु काळ हा स्वतः निर्विकार असला, त्याला सुखदुःख वाटत नसले तरी राष्ट्रांची स्थिति तशी नाहीं. राष्ट्रें सुखदुःखातीत नसून तदधीनच असतात. जे राष्ट्र पद