Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
मला मारूं पाहणारेच उद्यां माझी स्तुति करूं लागतील !

running me to death, will be converted into my admirers.' हे ध्येय सतत पुढे ठेवून या थोर पुरुषानें आपले नांव दिगंत केलें यांत संशय नाही. परंतु हें सर्व झाले तरी त्यांच्या मनास पूर्ण शांतता लाभली नाहीं. त्यांच्या स्वतःच्या महाराष्ट्रांत तरी त्यांस फार सन्मान मिळाला नाहीं. परंतु जें खरें असतें तें केव्हां तरी खरे ठरणारच. त्यांच्या मार्गाची, त्यांच्या मतांची, त्यांच्या उणिवांची जरी टवाळी झाली तरी त्यांच्यांत असलेले सत्य थोडंच लपणार आहे? Minds may doubt and hearts may fail when called to face new modes of thought or points of view. But the time must come when what is false in all things will fade and what is true will no more seem strange'. हें इलिंगवर्थचें वाक्य किती खरे आहे? टिळक व गोखले दोघांहीमधील सत्य जर आपण नीट पाहू तर आपणांस आतां दिसेल. गोखल्यांस त्यांच्या उभ्या आयुष्यांत फारसे सुखवाद मिळाले नाहीत. ते इंग्लंडमध्ये म्हणालेच होते की 'Public life in India, has many discouragements and but few rewards.' आणि अखेर तेच खरें ठरलें. परंतु गोखल्यांनीं चिकाटी हा आपला गुण सोडला नाहीं. कौन्सिलमध्ये तेच तेच मागतांना ते लाजले नाहींत, की कचरले नाहींत. कार्लाईलने म्हटले आहे की, 'The characteristic of heroism is persistency'. देशसेवा करीत असतांना-

'निन्दन्तु नीति-निपुणा यदि वा स्तुवन्तु ।
लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् ॥
अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा ।
न्याय्यात्पथः प्रविचलन्ति पदं न धीराः ॥'

या धीर-व्रताप्रमाणे ते वागले. लोकांनी निंदा केली तरी ते तळतळले नाहीत. आपले म्हणणे सत्य असेल तर तें आज ना उद्यां लोकांस पटेल असें ते हृदयास संबोधीत. कॉल्डेनविषयी ब्राइट म्हणतो. 'He loved his people too well to be afraid of their frown.' हेंच गोखल्यांविषयीं म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाहीं. स्वार्थत्याग, व लोकांकडून गौरव न होणें याच दोन गोष्टींनी गोपाळरावांची कामगिरी फार शोभते.