बंधूंचे सर्व कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे." नंतर कंठ भरून येऊन ते म्हणाले, 'त्यांची मी आजपर्यंत कांहींच तजवीज केली नाहीं, ही काळजी मला रात्रंदिवस चैन पडू देत नाही.' अशा रीतीने घरच्या चिंता वगैरे डोळ्यांआड करून या स्वार्थत्यागी वीरानें मरेपावेतों देशाचीच चिंता वाहिली. चिंता सरली नाहीं, परंतु आयुष्य मात्र संपून गेलें.
आपल्या मित्रांविषयीं सुद्धां ते पुढे यावे असे गोखल्यांस वाटे. हरिभाऊ आपटे यांस मुंबईच्या कौन्सिलांत निवडून येण्यासाठी उभे राहण्यास त्यांनीच आग्रह केला. हरिभाऊ निवडून येऊ शकले नाहींत तेव्हां त्यांस फार वाईट वाटले. स्वपक्षांतीलच नव्हे तर परपक्षांतील लोकांबद्दलही त्यांस आपलेपणा वाटे. त्यांच्याही गुणांचे चीज व्हावें, त्यांच्या गुणांच्या वाढीस, कर्तबगारीस अवसर मिळावा असे त्यांस फार फार वाटे. 'कोठेही स्पृहणीय गुण दिसला की, त्या विषयी आदरबुद्धि त्यांच्या मनांत उत्पन्न होत असे. या बुद्धीनें खऱ्या शिष्टांच्या, खऱ्या संभावितांच्या पंक्तीत त्यांस अग्रस्थानं मिळून ते प्रतिपक्ष्याच्याही आदरास पात्र झाले.' टिळकांमध्येही हा गुण होता. गोपाळराव देवधर, भांडारकर वगैरेंनी आपल्या ईश्वरी देण्याचा कसा उपयोग केला हे ते वारंवार सांगत. गोखल्यांविषयी त्यांनी किती सुंदर व उदार उद्गार काढले! नेहमीच्या झटापटीत ते गुण बाजूस ठेवीत. परंतु अंतरी दैवी देण्याविषयी आदर कोण दर्शविणार नाहीं? परंतु टिळकांविषयी सर्वदा वांकड्या नजरेनेंच पाहणारांस हें कसे दिसावे ? नरसोपंत केळकर कौन्सिलला उभे रहाण्यास अयोग्य आहेत असे फर्मान सरकारने त्यांच्या विरुद्ध काढले. परंतु या बाबतींत योग्य न्याय मिळावा म्हणून गोखल्यांनीच खटपट केली. दे. सावरकरांसारख्यासही त्यांनी योग्य उपदेश केला होता. परंतु भावनांच्या तीव्रतेने त्या तरुण बहाद्दरास तो पटला नाहीं. त्यांत दोष कोणाचाच नाहीं! प्रत्येक जण आपआपल्या मनादेवतेस साक्ष ठेवून वागला यांतच प्रत्येकाचा मोठेपणा आहे. ग. व्यं. जोशी हे सुरतच्या राष्ट्रीयसभेनंतर राष्ट्रीय पक्षाचे झाले. नंतर टिळक कैदेत गेले. जोशीही पुढे वारले. शेवटीं त्यांचे सर्व लेख छापून काढण्याचें, गोखल्यांनींच मनावर घेतलें खरें पाहिलें तर गोखल्यांनी या पुरुषाजवळ अर्थशास्त्राचा व आंकडेशास्त्राचा अभ्यास
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२९४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
चिंता सरली नाहीं, पण आयुष्य मात्र संपून गेलें !