Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
वाढत्या अशांततेमुळेच सुधारणा-हक्क लवकर मिळतात.

कींसही हजर न राहणारे या वर्गातले गोखले नव्हते. ते 'होयबा' नव्हते; अगर 'जी सरकार' करणारेही नव्हते. म्हणूनच त्यांच्या हातून कौन्सिलांत अमोल कामगिरी घडली.
 कौन्सिलांतील कामगिरीनंतर त्यांनी बजाविलेल्या इंग्लंडांतील कामगिरीचा विचार करावयाचा. १९०५ साली त्यांनी जी चाळीस पन्नास व्याख्यानें इंग्लंडांत दिलीं त्या वेळेस हिंदुस्तानच्या हलाखीचें, दारिद्र्याचें, अज्ञानाचें, दडपेगिरीचं त्यांनी असे यथार्थ चित्र रेखाटलें कीं तें चित्र पाहून इंग्लिश लोक चकित झाले. शंभर वर्षे राज्यकारभार केला आणि शेकडा एकही मनुष्य अद्याप लिहू वाचू शकत नाहीं हें आठवें आश्चर्य नव्हे तर काय?
 मोर्लेमिंटो- सुधारणांसाठी त्यांनी किती धडपड केली ते मागें आलेच आहे. नाना मुत्सद्द्यांच्या मुलाखती घ्याव्या; त्यांच्याशी विचार- विनिमय करावा; आणि आपले विचार त्यांस समजावून सांगावे. परंतु या वेळेस गोखल्यांच्या भोळेपणाची एक गोष्ट मोर्ले साहेबांच्या 'आठवणीं'- वरून दिसून येते ती सांगतों. मोर्ले साहेबांस माहीत होते की, गोखल्यांचें 'रॅडिकल' लोकांवर वजन आहे. ते मिंटोस लिहितात कीं, "The British Radical now prominent in the House of Commons does not mean mischief and I think Gokhale does not mean to lead him that way, if the said Gokhale is rightly handled." मोर्ले साहेबांनी गोखल्यांस आपल्या हातांत घेतलें. जर हिंदुस्तानांत बंडाळी माजेल तर तुम्हांस कांहीं एक मिळणार नाहीं अशी मोर्ले यांनी गोखल्यांस धमकी दिली. गोखले चपापले व त्यांनी आपल्या मित्रांस हिंदुस्तानांत शांतता राखा असें लिहिलें. वास्तविक या अशांततेमुळेंच सुधारणा मिळत होत्या. अशांतता वाढेल तरच जास्त लवकर अधिकार-हक्क मिळतात. अशा वेळी गोखले सरळपणा दाखवीत. आणि या सरळपणाचा, मुत्सद्दी मात्र फायदा घेत. दक्षिण आफ्रिकेत असेंच झाले. पोकळ वचनावर गोखल्यांनी विश्वास ठेवला आणि बोथा साहेबांनीं चकविलें. 'The dictum of the Roman poet that prudence is an ever-present and all-potent divinity ought assuredly to be kept in mind by the patriotic Indian who aspires to lay the foundations of an empire-state.' असा मोठा पोक्तपणाचा सल्ला होल्डरनेस साहेबांनी दिला. या वेळी पॅरट