मुत्सद्दीपणास शोभेसे होते यांत शंका नाहीं. मॉर्निंग पोस्ट म्हणते :— "Mr. Gokhale has succeeded in proving to the people of this country that the Indian problem cannot be regarded purely from the local point of view. His sketch of the awakening of national consciousness in the East has come as a revelation to those who have hither-to turned deaf ears to the far-off murmur and stir of that awakening. India, says Mr. Gokhale is herself crying for labour." अशा युक्तिवादाने गोखल्यांनी आपल्या देशबांधवांची बाजू नीट सांवरून धरिली. त्यांचे म्हणणे शांतपणे सर्वानी ऐकले. त्यांनी सर्वांसच राजीखुषी करण्याचे काम केलें नाहीं. स्वाभिमान व सदसद्विचारबुद्धि जागृत ठेवून त्यांनी चोखपणाने आपले काम केलें. त्यांच्याविषयी एके ठिकाणी असे उदार निघाले- 'Truly public man who wishes to obey the voice of his conscience alone, has a difficult, if not an impossible task before him, if he wishes also to please all people,' I langa lase Natal हे वृत्तपत्र १५ नोव्हेंबरच्या अंकांत म्हणते "Mr. Gokhale has received the attention of our European section of the community not so much because of his personal ability- which is undoubted— as because of his position as an acknowledged spokesman and representative of the whole of the races in India. Those, who do not speak are, like the absent, usually forgotten. Those, who speak with authority, like Mr. Gokhale are always heard," हिंदुस्तानचा प्रमुख पुढारी, सकल जनतेचा विश्वासपात्र असा नेता अशा दृष्टीने त्यांच्याकडे तिकडील लोकांनी पाहिले. त्यांनी देशाची शिष्टाई शक्य तितकी समतोलपणे केली आणि नंतर इतर कामां- साठी ते माघारे वळले.
गोखले आपली कामगिरी आटोपून परत हिंदुस्तानास आले. मुंबईस त्यांच्या अभिनंदनार्थ जाहीर सभा भरली होती. थोड्याच दिवसांनी गोखले बंकीपूरच्या काँग्रेसला निघून गेले. १९१२च्या बंकीपूर काँग्रेसमध्ये गोखल्यांनी दक्षिण-आफ्रिका व इतर वसाहतीतील एतद्देशीय यांच्याविषयी ठराव
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२२३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३
हिंदुस्तानचे विश्वस्त प्रतिनिधि गोखले.