Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
वचनें सर्व तोंडी होती, लेखी एकही नव्हतें.

statesman has made a triumphant progress from Kimberley to Johanesburg, and that his reception here has been striking beyond all expectations. जोहान्सबर्गला जातांना वाटेत क्लर्कस्डॉर्प, पॉट्चेफ्स्ट्रुम, क्रूजर्सडॉप् वगैरे ठिकाणीं त्यांचा सत्कार करण्यांत आला. जोहान्सबर्ग येथे पार्क स्टेशनवर तर फारच थाटमाट उडाला होता. गोखल्यांनी आपल्या भाषणांत स्पष्ट सांगितलें कीं, 'Indian in S. Africa must be made to feel that he lived under the protection of equal laws. On the view that Indians were mere hewers of wood and drawers of water to Europeans who were disposed to think that S. Africa existed only for them, England would find it difficult to hold India.' हें भाषण जोहान्सबर्ग येथे (Masonio Hall Banquet) दगडी दिवाणखान्यांत दिल्या गेलेल्या मेजवानीच्या प्रसंगी झाले. केप टाउन, बेच्चानालँड, प्रिटोरिया, ब्ल्यूमफाउन्टन् वगैरे शहरी गोखले गेले. ३० नोव्हेंबर रोजी ते मुंबासा येथे गेले होते. तेथे जीवनजी हॉलमध्ये त्यांस हिंदी लोकांनी मानपत्र दिलें.' Indians will decline to be treated as helots of the empire.' असा त्यांचा संदेश होता. गोखल्यांस जरी डोईपट्टी रद्द होण्याची वचने मिळाली व दरवर्षी कांहीं लोक कोणी धर्मोपदेशक, कोणी शिक्षक म्हणून येण्याची परवानगी दिली असें सांगितलें तरी अद्याप लेखी असें कांहीं नव्हतें. एकट्या जनरल बोथाच्या हातांत कांहीं नव्हतें. ऑरेंज रिव्हर कॉलनी म्हणून जे फ्री स्टेट आहे तेथील मुख्य प्रधान Fischer, हा या सर्वांच्या विरुद्ध होता. दुसऱ्यासाठी आपण झीज सोसावी अशी या लोकांस मुळींच इच्छा नव्हती. यांनीच पुनः पुनः हिंदूस थोडी फार सवलत देण्याविरुद्ध आजपर्यंत सतत हाकाटी केली. आणि गोखलेपुराणानंतर हे ताळ्यावर येतील असे थोडेच होते? स्टैंडर्डच्या २१ नोव्हेंबरच्या लेखांत स्पष्ट सांगितले आहे की, 'Equality as between Asiatics and Europeans is not regarded as within the range of practical politics in the country and while Mr. Gokhale's personality has charmed all who have met him, it is to be feared that his mission can have but small results. The imperial Government can, of course, exercise no sort of compul