मदत मिळणे हे अशक्याहून अशक्य. बरें समजा एक वेळ हें शक्य झालें, सूर्य पश्चिमेस उगवला, तरी आपणांस हा पैसा घेणें रास्त नाहीं. चीनवर अफूचा व्यापार लादण्यांत जरी इंग्लंडने तोफबाजी दाखविली, तरी या व्यापारापासून येणारे उत्पन्न फक्त हिंदुस्तानला मिळते. आणि यासाठीं हा अन्याय्य व पापमूलक पैसा कोणाकडून ही न घेतां आपण सोडून देण्यास तयार झालें पाहिजे. 'For that would be only another name for charity- when in the interests of humanity this wretched traffic has got to be abolished.' नंतर ते सैन्य कमी करावें या नेहमीच्या प्रश्नाकडे वळले. हिंदुस्तानांतील सैन्यासंबंधी लक्षांत घेण्यासारख्या चार गोष्टी असतात. शिपायाला शक्य तितका पैसा मिळावा, कारण त्या योगें तो तडफदार व उल्लसित राहतो. नंतर हिंदुस्तानांतील गोऱ्या लोकांची सुरक्षितता. या गोऱ्यांस आपले संरक्षण कसे आहे इकडे लक्ष देण्यास फावते परंतु त्यासाठी गरीब लोकांवर करांचे ओझें किती पडते आहे इकडे लक्ष देण्यास त्यांस सवड नसते. नंतर एतद्देशीयांचा प्रश्न. त्यांस पैसा द्यावा लागतो, परंतु ह्या पैशांतून होणाऱ्या सुखसोयी, हक्क वगैरे बाबतीत त्यांच्या तोंडाला पानेंच पुसली जातात. आणि यानंतर हिंदुस्तानसरकारची दृष्टि- हे चार प्रश्न आहेत.
सैन्य व लष्कर यांसंबंधी उदार विचार परिस्थितीमुळे जे सुचावयास पाहिजेत ते सरकारास सुचत नसल्याने सुचविणें भाग होते. रशियाच्या स्वारीचा आतां मागमूसही उरला नसून जपानचा विजय, आणि चीन व इराण यांतील जागृति, या गोष्टींमुळे युरोपियनांस आपले पाय पूर्वीप्रमाणे जलदीनें पसरण्यास मिळणे शक्य राहिलेले नाही. १८ वे शतक आणि १९ वे शतक यांचा इतिहास जर तुलनात्मक दृष्टीने पाहिला तर असे दिसून येतें कीं, युरोपमधील जनता केवळ राजा आणि प्रधान यांच्या हाताखालीं वागणारी राहिली नाही. लढाई म्हणजे काय हें आतां जनतेस कळू लागलें आहे. यासाठी हिंदुस्तानांतील लष्कर कमी करून खर्च कमी करणें रास्त व प्रसंगोचित आहे. त्याचप्रमाणें लष्करचा कांहीं खर्च इंग्लंडने सोसला पाहिजे. लष्करमधला एतद्देशीय अधिकाऱ्यांचा दर्जा वाढविणें फार
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१७१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३९
अफूचा अन्याय्य व पापमूलक व्यापार बंद करा.