यांची निस्तरानिस्तर मिंटो साहेबांस करावी लागली. लॉर्ड कर्झनच्या योग्य गुणांची गोपाळरावांनी तारीफ केली. परंतु त्या गुणांचें चीज झालें नाहीं. 'But the gods are jealous and amidst such lavish endowments, they withheld from him a sympathetic imagination without which no man can ever understand an alien people.' सुशिक्षितांचें मत बाजूला लोटणें मुत्सद्देगिरीचे होणार नाहीं असें म्हणणारे कर्झन त्याच मताची कायदेबाज पायमल्ली करण्यांत सर्वांवर ताण कसे करते झाले याचें त्यांनीं उत्कृष्ट चित्र रेखाटलें. कर्झन साहेबांनी मुंबईच्या चरम भाषणांत असे उद्गार काढिले कीं, मी शिक्षणांत जास्त पैसा खर्च केला. परंतु शिक्षणांत अडीच लक्ष रुपये जास्त खर्च करण्यास दिले तर लष्कराकडे पन्नास लक्षजास्त खर्च केले! युरोपियन लोकांसाठीं तर इतक्या नवीन जागा निर्माण केल्या की बोलून सोय नाहीं. आधींच नौकरीवर होते त्यांचे पगार वाढविले. आणि हें सर्व कां? तर 'He did not regard it as wisdom or statesmanship in the interests of India itself to do so (to do so means— offering political concessions to the people of India.)' नंतर बंगालच्या फाळणीकडे गोखले वळले. या बाबतीत सरकारशीं नित्य सहकार्य करणाऱ्यांचीं मतेंही सरकारने कशीं धुडकावली, सर्व जनतेचें मत कसें तृणवत् लेखलें हें सांगून गोपाळरावांस खालील उद्गार काढावे लागले:-
'If men, whom any other country would delight to honour are to be thus made to realize the utter humiliation and helplessness of their position in their own, if the opinions of such men are to be brushed aside, if all Indians are to be treated as no better than dumb, driven cattle, then all I can say is "Good-bye to all hope of co-operating in any way with the bureaucracy in the interests of the people." शत संवत्सर राज्य चालवून जर हाच शेरा या राज्यपद्धतीवर मारावा लागतो तर ही राज्यपद्धति किती घातुक, किती दुष्ट असेल याची कल्पना करा.
बंगालची विभागणी करण्याची तीन मुख्य कारण त्यांनी सांगितलीं.
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१४६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४
हिंदूंस पशूंहूनही कमी लेखणार तर सहकारितेला रामराम !