Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९७
कर्झनचें कुर्रेबाज उत्तर.

responsibilities of national defence?' परंतु राष्ट्र दुर्बल करण्याचेंच ज्यांचें व्रत ते सरकारी अधिकारी या गोष्टीकडे लक्ष कसें देणार? सुशिक्षित लोकांस तर लष्कर म्हणजे वावडेंच. लष्करांत घ्यावयाचे झालेच तर ज्यांस देशाची अगर स्वाभिमानाची चाड नाहीं, ज्यांचीं मनें सुसंस्कृत नाहीत अशा, सरकार सांगेल त्याच्यावर गोळी झाडणाऱ्या आडमुठ्या लोकांस, सरकार लष्करांत घेणार.
 १९०४ सालच्या काँग्रेसचे गोखले हे जॉइंट सेक्रेटरी होते. या वर्षीची राष्ट्रीय सभा मद्रासला भरावयाची होती. या सभेत गोखल्यांनी हिंदुस्तानसरकारच्या खजिन्यांत सहा वर्षांत जी तीस कोट रुपये शिल्लक पडली, त्या शिलकेच्या उपयोगासंबंधीं ठराव मांडला, सरकारने लोकांपासून मिळविलेल्या या लुटीवर त्यांनी कौन्सिलमध्ये तर वेळोवेळीं तडाखे दिलेच होते. या पैशांतून निरनिराळ्या शास्त्रांचा सांगोपांग अभ्यास युनिव्हर्सिटीतून व्हावा म्हणून देणग्या द्याव्या असे त्यांनी लॉर्ड कर्झन साहेबांस सुचविलें होते. परंतु कर्झन साहेबांचा कुर्रा कोणास माहीत नाहीं? सरकारच्या ताब्यांत युनिव्हर्सिटी देण्याविरुद्ध जर ओरडतां तर मग सरकारच्या तिजोरीवर तरी लक्ष का असे हे विद्वान् लॉर्ड साहेब उद्गारतात. Lord Curzon said (refering to Gokhale's observation). "Exactly. But will the Hon. member tell me, why? There is plenty of money among his own people. Then why does he not look to them, why does he look to the Government for the money which is needed for instituting University Chairs?" जणूं काय सरकारने गलबते भरभरून कोळशाच्या माहेरघराहून पैसा आणला! लोकांजवळचा पैसा लुटून पुनः त्या पैशाचा उपयोग सरकारच्या नवीन नवीन जांवईखात्यांत करावयाचा आणि शिक्षण, आरोग्य, उद्योगधंदे यांसाठीं भांडवल मागितले तर लोक श्रीमंत आहेत हें उत्तर? दादाभाई, रानडे या सर्वांनीं आंकडेमोड करून जे सिद्ध केलें तें कर्झन साहेबांच्या ब्रह्मवाक्यापुढें कांहींच नाहीं काय? ज्या परिस्थितीत नवीन कायदे केले ती परिस्थिति पालटली तरी कायदे कांहीं चुकत नाहींत. गोपाळराव विचारतात, 'What right has
 ७ - गो. च.