Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
अखेर यु० चा कायदा पास झाला.

are and how easily swayed.' या पत्रांत गोखल्यांनीं त्या वेळच्या बंगालच्या राजकीय पुढाऱ्यांच्या मध्ये व आपल्याकडील पुढाऱ्यांच्या मध्ये असणारा फरक दाखविला आहे आणि बंगाली लोकांच्या भावनाप्रधान स्वभावाचें जातां जातां दिग्दर्शन केलें आहे.
 परंतु अखेर सर्व विरोधांस धाब्यावर बसवून- युनिव्हर्सिटी सुधारणा करण्यासाठी कमिटी नेमण्याचें बिल २ नोव्हेंबर १९०३ मध्ये मांडण्यांत आलें. थॉमस रॅले साहेबांनी 'कोणत्याही संस्थेस असें वाटत नसतें कीं, आपणामध्ये दोष आहेत आणि ते सुधारले पाहिजेत,' ('No corporate body cares to admit that its constitution needs improvement.') असें सांगितलें. सरकार शिक्षणाची खच्ची करीत आहे अशी ओरड करणाऱ्यांवर कर्झनसाहेबांनी तोंडसुख घेतलें. सरकारच्या मनांत लवमात्र पापबुद्धि नाहीं, तुमच्या कल्याणाचे मार्गच तें आंखीत आहे असे त्यांनी सांगितलें. गोपाळरावांनी डिसेंबरच्या बैठकीत या बिलास कसून विरोध केला. मुंबईस मेथांचें जोरदार भाषण झाले. परंतु अरण्यरुदनाला कोण विचारतो? इंग्लिशमन पत्रानें सुद्धां अशी कबुली दिली कीं 'One of the main objects of the proposed reforms was that the direction of University education should thenceforward be under the domination of the Government through such a new constitution as may be established by legislation.' शेवटी १९०४ मध्ये कायदेशीरपणे युनिव्हर्सिट्यांवर नवीन कायदे लादण्यांत आले. युनिव्हर्सिटी सरकारची हस्तक बनली. युनिव्हर्सिटीच्या सीनेटमध्ये आपणांस कोण दिसणार- तर चॅन्सलर, सरकारनियुक्त सभासद, हायकोर्टाचे न्यायाधीश, बिशप, एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलाचे सभासद, शाळा-खात्याचे प्रांतिक अधिकारी व सरकारी आणि मिशनरी विद्यापीठांतील आचार्य लोकांच्या प्रतिनिधीचें नांवही नको!
 १९०४ च्या जुलै महिन्यांत गोखले काँग्रेसचे जॉइंट सेक्रेटरी असल्यामुळें मद्रासच्या बाजूस गेले. मद्रासला त्यांचें जंगी जाहीर स्वागत करण्यांत आलें. मुंबईच्या प्रांतिक कौन्सिलांत दुष्काळग्रस्त लोकांची त्यांनी सांगितलेली कष्टप्रद कथा, म्युनिसिपल कायद्यासंबंधीं त्यांनी केलेले