Jump to content

पान:धर्मवासना.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपल्या वेदऋषींचें लक्ष्य गेले होतें अर्से ह्म- पण्यास हरकत नाही. जेव्हां त्यांच्या मनांत ह्या सृष्टीचे महत्व व सौंदर्य येऊं लागून ति- चीच पूजा ते करूं लागले, तेव्हां ह्या सृष्टीचा कर्ता जो. सर्व शक्तींची मूळशक्ति व सकल जगताचें आदिकरण देवाधिदेव त्याचीच पूजा ते करीत असेंच ह्मटले पाहिजे. इंद्रास "हे इंद्रा तुझ्या समान कोणी नाहीं " असे ह्मणून ते आळवीत हेही त्याच अ- थीने समजले पाहिजे. वैदिक देवतांमध्ये वरुण हा एक प्रधान देवता समजली जात असे. जी कित्येक स्तोत्रे त्याला उद्देशून केलेली आढळतात तीं सर्व पर- मेश्वरपर असल्याची दिसतात. फक्त नाम- निर्देशांत भेद असला ह्मणून काय झाले ? एके ठिकाणीं झटले आहे:- - “यस्तिष्ठति चरति यश्च वंचति यो निलायं चरति यः प्रतंकं । द्वौ संनिपद्य यं मंत्रयेते राजा तद् वेद वरुण स्तृतीय : ॥ " जो कोणी एके ठिकाणींच असतो, जो फिरतो, जो विश्रांति घेतो, जो दरीं-