२३ ह्मणून एकाएकी एक नवीन धर्म उपजला आहे असें नाहीं. जो धर्म मनुष्यमात्रांच्या हृदयक्षेत्रीं पेरलेला आहे; ज्याचा भास वेदग्रंथांत दृष्टो- त्पतीस येतो; ज्याचा उपदेश वेदांत व उप- निषदांमध्ये उपलब्ध आहे; असा जो आमचा सनातन आर्यधर्म त्याचें ब्राह्मधर्म हे फक्त नामांतर आहे. ह्या धर्माचा बीजमंत्र खालीं लिहिल्याप्रमाणे आहे. या जगाचा उत्पन्नकर्ता व रक्षणकर्ता फक्त एक अद्वितीय परात्पर जो परमेश्वर तो आहे. त्याच्या उपासनेपासून आमर्चे ऐहिक व पारलौकिक कल्याण आहे. त्याची उपासना ह्मणजे त्याच्याविषयी प्रेम, व त्यास प्रिय जी कार्ये त्यांचें अनुष्ठान होय; सारांश, ईश्वरभक्ति आणि ईश्वराचा आदेश संपाहून आपआपली कर्तव्यकर्मे करून घेणे होय. आम्हांस वाटतें की हा बीजमंत्र पृथ्वीवरील सर्व धर्माच्या मूळांशी आहे. आह्मी ज्या देवाची पूजा करितों त्याचें नांव आमच्या प्राचीन शा- स्त्रांत ब्रह्म अर्से आहे. ब्रह्माचे उपासक ह्मणून आह्मी ब्राह्म व ब्राह्ममंडळी मिळून जो समाज तो ब्राह्मसमाज.
पान:धर्मवासना.pdf/२३
Appearance