पान:देशी हुन्नर.pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २९ ]

वाचा एक खनिज पदार्थ मिळतो तो पाण्यांत कालवून त्याची मडक्यांवर नक्षी काढून नंतर ती भट्टीत घालतात. अयोध्या प्रातांत सीतापूर शहरीं मडक्यांवर नक्षी काढतात ती फार सुरेख असते. नक्षीची जागा हिरवीगार असते व त्यावर निरनिराळ्या रंगाची फुलें काढलेलीं असतात तीं फारच सुरेख दिसतात.

 लांकडावर पाण्यांत कालविलेल्या रंगाने चित्रें काढून त्याजवर रोगण चढवितात त्या कामास पंजाबांत 'कमानगारी' नक्षी म्हणतात. कमान ह्मणजे धनुष्य, आणि प्राचीनकाळी असली नक्षी धनुष्यांवर काढण्याची प्रथम सुरुवात झाली म्हणून तिचें नांव 'कमानगारी' नक्षी असें पडलें असावें.या कामांत सोनेरीवर्खाचे वेल असतात. कधीं कधीं बेगडेची आणि केव्हां केव्हां घांसून चकचकीत केलेल्या कथिलाची नक्षी काढून त्याजवर रोगण चढवितात. त्यामुळें त्यांच्या अंगीं एका प्रकारची सोनेरी झाक मारते. अशा रीतीनें रंगविलेली धनुष्यें मुलतान प्रांती कोठें कोठें आढळतात. या कामाचे नवीन तऱ्हेचे पदार्थ ह्मणजे पलंगाचे खूर, थाळ्या, साहेब लोकांचे कपडे ठेवण्याच्या पेट्या वगैरे पदार्थ दिल्लीस तयार होतात. सुरतेस कांहीं जुन्या घरांच्या दरवाज्यांवर असली नक्षी काढलेली आढळते.

 कागदी काम--कागदाचे जाड डबे, पेट्या, कलमदानें कमळें, डब्या वगैरे पुष्कळ पदार्थ काश्मीरास तयार होतात. याजवर काढिलेली नक्षी इराण देशांतील नक्षीच्या धरतीवर असते. त्यामुळें हा हुन्नर त्याच देशांतून इकडे आला असावा असें म्हणतात. श्रीनगरगांवीं साहेब लोकांस विकण्याकरितां कागदाचे पुष्कळ नक्षीदार पदार्थ तयार करण्यांत येतात. त्याजवरील नक्षी काश्मिरी शाली वरील कैरीदार नक्षीसारखी असते. वायव्य प्रांतांत जानपूर, रामपूर, मंदावर, आणि मुजाफरनगर या गांवीं असलें काम होतें. पण कोणीं काश्मीरच्या मनुष्यानें तें या गांवीं तयार करण्याची सुरुवात केली असावी असें वाटतें. जानपूर गांवच्या कामांत गेल्या पांचचार वर्षांत पुष्कळ सुधारणा होत चालली आहे.

मातीचीं चित्रें.

मुंबईतील चित्रशाळेंतील असिस्टंट मास्तर मि. गोम्स, भावनगर येथील मेस्त्री वाला हिरा, व लाहोर येथील शिमोर पिन्टो याजविषयीं माहिती मागें