पान:दूध व दुभते.pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बृहद्योगवासिष्ठसार. (३२ हजार श्लोकांचे सरळ गोष्टीच्या रूपाने मराठी भाषांतर.) चार भागांत संपूर्ण ग्रंथ. वासिष्ठ महारामायण' या नांवाचा वाल्मीकिमुनिप्रणीत, बत्तीस सहस्र श्लोकांचा एक सर्वोत्तम संस्कृत ग्रंथ आहे. त्यांत श्रीवसिष्ठांनी रामास केलेला विस्तृत अध्यात्म-उपदेश ग्रथित केला आहे. वसिष्ठमुनि वक्त व दाशरथिराम श्रोता, असा देवीयोग यांत आलेला आहे इतकें सांगितल्यावर त्याविषयी अधिक लिहिण्याची गरजच राहत नाही. या ग्रंथाची सहा प्रकरणे अमून, तो बृहद्योगवासिष्ट अथवा योगवासिष्ट या नावाने प्रसिद्ध आहे. त्या अद्वैतवेदान्त-सिद्धान्त प्रतिपादक ग्रंथाचे मराठी भाषांतर आचार्यभक्त विष्णु वामन बापट शास्त्री यांजकडून सोप्या मराठी भाषेत करविले आहे. या ग्रंथाच्या प्रथम भागांत वैराग्य, ममक्षु. व्यवहार व उत्पत्ति या तीन प्रकरणांचें ( म्हणजे बत्तीस सहस्र श्लोकांतील नऊ सहस्र श्लोकांचे) भाषांतर आले असून, दुसऱ्या भागांत स्थिति व उपशम या चवथ्या व पांचव्या प्रकरणाचे (म्हणजे आठ हजार श्लोकांचे) भाषांतर आले आहे आणि तिसऱ्या व चवथ्या भागांत १५००० श्लोकांचे भाषांतर घेऊन निर्वाणप्रकरण पुरे केले आहे. ग्रंथाचे शेवटी-या विस्तृत ग्रंथाचा मथितार्थ वाचकांस थोडक्यांत समजवा म्हणून त्याचे एक स्वतंत्र परिशष्ट, आणि कठीण पारिमाषिक शब्दाचा अक्षरानुक्रमाने स्पष्टार्थ, याचे एक परिशिष्ट, याप्रमाणे-दोन परिशिष्टें जोडली आहेत. एकंदरीत मराठी वाचकांस हा ग्रंथ सुलभ होईल, अशी व्यवस्था केली आहे. चारी भाग मिळून एकंदर पृष्ठसंख्या सुमारे १८०० च्या वर झाली असून टाईप व कागद चांगला वापरला आहे. दोन दोन भाग कापडी जाड पुठ्यांत बांधले आहेत चारी भाग मिळूस एकंदर किं. १० रुपये आहे, परंतु वर्गणीदारांस है चारी भाग एकत्र करून दोन व्हालुममध्ये सोनेरी नांव एम्बास केलेल्या संपूर्ण ग्रंथाची किं. ६ रु. पडेल. टपाल व्ही. पी. खर्च ११ रुपया होईल. AAS.. ज्योतीषासंबंधाने जे अनेक संस्कृत ग्रंथ आहेत, त्या ग्रंथाधारे हा ग्रंथ भार्यारूपाने मराठीत रा. बाळकृष्ण दत्तात्रय जोशी यांनी तयार केलेला आहे. या पुस्तकांत शुभाशुभप्रकरण, २ मिश्रप्रकरण, संस्कारप्रकरण, धटितप्रकरण, ५ प्रहप्रकरण,६रुषिप्रकरण, ७ यात्राप्रकरण, याप्रमाणे मख्य सात प्रकरणे घेऊन तत्संबंधी एकंदर मुहूते लोकांच्या तोडी सहज बसावे ह्मणून आर्यारूपाने दिले आहेत. शेवटी परिभाषा, नक्षत्र, राशी वगरेची परिशिष्टे जोडली आहेत. किंमत ४ आणे.