पान:दूध व दुभते.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दूध व दुभते. [प्रकरण जनावरे आणि त्यांचे महत्त्व. प्राण्यांची मदत व कर्तबगारी-याप्रमाणे विचार केला असता शेतकरी वांस किंबहुना सर्व मनुष्यजातीस पृष्ठवंशीय प्राणीच ज्यास्त प्रत्यक्ष उपयोगी आहेत असे आढळून येते. ह्या पृष्ठवंशीय प्राण्यांपैकी सस्तन प्राण्यांचा वर्ग मनुष्यजातीचे फारच उपयोगी आहे. त्यांपैकी तृणभक्षक प्राण्यांचा लवकर माणसाळण्याचा स्वभाव, अगदी साधी राहणी, त्यांचे मोठे शरीर, विलक्षण शक्ति आणि त्यांचा कंटकपणा ह्या सर्व गुणांवरच सर्व मनुष्यजातीचें जीवित्व आणि त्यांचे ऐषआराम अवलंबून आहेत. उदाहरणार्थ, गाई, म्हशी, बैल, घोडी, गाढवें, उंट वगैरे प्राणी सस्तनवर्गापैकीच आहेत व त्यांचा मनग्यांत किती उपयोग आहे हे सर्वश्रुतच आहे. तृणभक्षक वर्गाच्या पुष्कळ शाखा आहेत आणि त्यांची वाटणी त्या त्या देशाची नैसर्गिक स्थिति, हवामान वगैरे गोष्टींचे अनुरोधानेच झालेली आहे, असे आपणांस आढळून येईल. उदाहरणार्थ, आपण उंट घेऊ या. हा प्राणी वालुकामय उष्ण व पर्जन्यरहित प्रदशांतच फार करून असतो व त्याची चांगली पैदासही अशाच देशांत होत असते. त्याचे अंतर्बाह्य शरीराचे रचनेविषयी थोडासा बारकाईने विचार केला असता असे आढळून येईल की, अशा देशाच्या नैसर्गिक स्थितीला योग्यच ती असते. पाठीवर मोठी ओझी घेऊन लांब लांब मजला मारण्यास हा प्राणी उपयोगी पडतो. शिवाय पोषणास दूध आणि आवरणास आपली लोकर ही देतो. ह्यावरून अशा उष्ण प्रदेशांत राहणा-या मनुष्यांस उंट ही एक ईश्वराची देणगीच आहे, असें वाटावे ह्यांत आश्चर्य नाही. उंटाप्रमाणेच थंड देशांत मेंढ्या व हरिणे त्या देशांत राहणा-या मनुण्यांस उपयोगी आहेत. आपल्या ह्या हिंदुस्थानसारख्या देशांत गाई बैलांइतके दुसरे कोणतेच प्राणी हिंदुस्थान-वासियांचे उपयोगी नाहीत. एक तर त्यांचे जीवित शेतकीवरच अवलंबून आहे व शेतकीचा सर्व भार बैलाने आपले मानेवर घेतलेला आहे. अशा अत्यंत उपयोगी प्राण्यांस गोमाता जन्म देऊन आपल्या अमृततुल्य दुधाने हिंदुस्थानवासियांचे पोषण करिते म्हणन गोमातेस देवाप्रमाणे पूज्य मानिली आहे, ह्यांत नवल ते कोणते? परंतु अशा उपयोगी प्राण्यांची स्थिती आपले देशांत कशी आहे, ह्याचा प्रत्येकाने विचार करावा! ह्या प्राण्यापासून होणारे फायदे लक्षात घेऊन, ह्या पूज्य प्राण्यांच्या सध्यां चाललेल्या छलावरून व त्यांच्या पैदाशीविषयी चालू हेळसांडीने होणारे दुष्परिणाम व त्याबरोबरच शेतकरीवर्गाचे भयंकर नुकसान व अप्रत्यक्ष सर्व हिंदस्थानची हीनावस्था ह्यांवर नजर देऊन सर्व हिंदुस्थानवासी ह्या पूज्य प्राण्यांची हेळसांड न करिता चांगली निगा राखतील अशी आशा आहे.