पान:तुतीपासून रेशीम.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ किडे पिकल्यावर ते आपल्या तोंडांतून तंतु काढून कोसले तयार करीत असतात. हवा सुकी असल्यास किडे तोंडांतून तंतु काढतात न काढतात, तोंच तो बऱ्याच प्रमा- णांत वाळून गेल्यानें कोसले सुके होतात. पण तीच हवा -दमट असल्यास तंतु लागलीच न वाळल्याने कोसले चिकटे होतात, व असल्या कोसल्यांचे रेशीम चांगले निघत नाहीं. ओलसर ह्मणजे दमट दिवसांत ओलसर ठिकाणीं बुरसा चढत असतो, हें बहुतेकांस माहीत असेलच. असा बुरसा किड्यांचे घरांत चढल्यास किंवा किड्यांशीं संसर्ग असलेल्या सामानास चढल्यास त्याचे लवेचा किड्यांस संसर्ग होण्याचा बराच संभव असतो. व यानें किड्यांस बुरशीचा रोग होतो, व त्यापासून किडे पाळणारास नुकसान सोसावें लागतें. . पावसाळ्यांत वरीलप्रमाणें जरी बऱ्याच गैरसोई आहेत, तरी योग्य काळजी घेतल्यास त्या गैरसोईंपासून किड्यांचें पीक संभाळतां येतें. फक्त थोडी विशेष काळजी घेतली ह्मणजे झालें. पाल्यावरील पाण्याचा अंश नीट तन्हेनें वाळ- वून त्या पाल्यावर किड्यांची जोपासना केल्यानें, चंदरकीत- किडे सोडल्यावर घरांतील हवा सर्व दरवाजे बंद करून व चुन्याच्या कळ्या उघड्या ठेवून सुकी केल्यानें, व कि- ड्यांशीं संसर्ग असलेलें सर्व सामान नीट वारंवार पुसून झटकून साफ ठेवल्यानें, वरील गैरसोई टाळतां येतात. आतां येथें असा प्रश्न उद्भवतो की, एकसारखें पाणी पडत असल्यानें नेहमींपेक्षां लागवडीतील पाला जो अतिशय रसदार